Home >> Maharashtra >> North Maharashtra >> Jalgaon

Jalgaon News

 • धुळ्यात अडीच लाखांचा मद्यसाठा जप्त; दिवसभर छापासत्र
  धुळे - शहरात अवैध दारूची विक्री माेठ्या प्रमाणात वाढली अाहे. एकाच दिवसात पोलिसांनी दोन ठिकाणी छापे मारून अडीच लाखांचा मद्यसाठा तसेच वाहने जप्त केली. हायवेवरील बंदीनंतर बनावट मद्याची तस्करीही वाढली अाहे. ९० दिवसांत पाेलिसांनी तब्बल ४२ वेळा कारवाई केली. यात ३७ वाहनांसह दीड काेटीची दारू जप्त करण्यात अाली अाहे. शहर परिसरात अवैध दारूप्रकरणी दरराेज एक तरी कारवाई हाेत अाहे; परंतु पाेलिसांची कटकट यामुळे वाढली अाहे, तर उत्पादन शुल्क विभाग मात्र कुठलीही कारवाई करताना दिसत नाही. शहर परिसरातून...
  June 28, 09:41 AM
 • केळीचा ट्रक-बसची धडक; दाेन्ही चालकांसह 5 जखमी, तासभर वाहतूक विस्कळीत
  चाेपडा- चाेपडा-धरणगावराेडवरील रेलच्या मारुती मंदिरासमाेरील वळणावर केळी भरलेला भरधाव ट्रक धुळे अागाराच्या बसची समाेरा-समाेर धडक झाली. यात दाेन्ही वाहनांच्या चालकांसह पाच प्रवासी जखमी झाले. ही घटना मंगळवारी सायंकाळी वाजता घडली. अपघातामुळे दाेन्ही दिशेकडील वाहतूक तासभर ठप्प झाली हाेती. वळण रस्त्यावर गतिराेधक नसल्याने हा अपघात घडला. चाेपड्याकडे येणारी धुळे आगाराची बस (एम.एच. ४०, ९०२९) समाेरून केळी भरलेला ट्रक (एम.एच. ४३-ई-४१९) हे समाेरा-समाेर धडकले. यात ट्रकचालक जाकीर शेख फत्तू शेख (वय ५०,...
  June 28, 09:37 AM
 • विज्ञान, वाणिज्य शाखांकडे विद्यार्थ्यांचा वाढता कल, अकरावीसाठी पहिल्याच दिवशी 900 पेक्षा अधिक प्रवेश
  जळगाव - इयत्ता अकरावीची मंगळवारपासून प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. यंदा विद्यार्थ्याचा विज्ञान, वाणिज्य शाखेकडे कल अधिक अाहे. प्रवेशासाठी अवधी कमी असल्याने विद्यार्थी, पालकांची झुंबड महाविद्यालय परिसरात दिसून आली. ही गर्दी कमी करताना महाविद्यालय कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. मंगळवारी सुमारे ९००पेक्षा अधिक प्रवेश झाल्याचे महाविद्यालयांच्या प्रतिनिधींनी सांगितले. विद्यार्थ्यांची होणारी गर्दी लक्षात घेता महाविद्यालय व्यवस्थापनाने विद्यार्थांच्या सोयीसाठी समुपदेशन...
  June 28, 09:30 AM
 • जळगावचा तरुण हरिपुरा धरणात बुडाला
  यावल - तालुक्यातील हरिपुरा गावाजवळील धरणात जळगाव येथील २१ वर्षीय तरुण पोहताना बुडाला. वसियोद्दीन साबुद्दीन कुरेशी (रा.कासमवाडी, जळगाव) असे त्याचे नाव असून मंगळवारी सायंकाळी ही दुर्घटना घडली. वसियोद्दीनचा शोध घेण्यासाठी रात्री उशिरापर्यंत मोहीम चालली. मात्र, पावसामुळे त्यात व्यत्यय आला. हरिपुरा हे सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले आदिवासी गाव आहे. या गावाजवळ हसनबाबा यांचा दर्गा आहे. रमजान ईदनिमित्त जळगाव येथील सहा तरुण रिक्षाद्वारे या दर्ग्यावर दर्शनासाठी आले होते. जवळच...
  June 28, 08:52 AM
 • दीर-भावजयचे होते एकमेकांवर प्रेम, करायचे होते लग्न; पाच पानांची चिठ्ठी लिहून केले असे
  चाेपडा- माेबाइलवरील संवादातून बहरलेल्या प्रेमाचे रूपांतर लग्नात हाेऊ शकत नसल्याने विवाहित जेठ व भावजईने झाडाला एकाच दाेरीने समांतर गळफास घेऊन अात्महत्या केली. चाेपडा तालुक्यातील बाेरअजंटी येथे मंगळवारी (दि. २७) सकाळी ही घटना उघडकीस अाली. शिवदास भिका काेळी (वय २८) व त्याच्या लहान भावाची पत्नी भारती राेहिदास काेळी (वय २१) यांचे एकमेकांवर प्रेम हाेते. त्यांची दाेघांची लग्ने मनाविरुद्ध झाल्यापासून जवळच वन विभागाच्या हद्दीत त्यांनी झाडाला एकाच दाेरीने समांतर गळफास घेऊन त्यांनी...
  June 28, 04:10 AM
 • नालेसफाईची कामे न झाल्याने शहरात ओढवणार गंभीर स्थिती, बहुतांश गटारी कचऱ्याने भरल्या पूर्ण
  जळगाव - पावसाळ्यापूर्वीच शहरातील नालेसफाईची कामे झाल्याने मुंबईसारखी स्थिती उद्भवण्याची भीती व्यक्त होत आहे. शहरातील बहुतांश ठिकाणी गटारी, नाले गाळ कचऱ्याने पूर्ण भरल्या आहेत. याबाबत वारंवार ओरड होऊनही पालिकेने केवळ कागदी घोडे नाचवत सफाईचा अाव आणला जात आहे. लवकरच प्रशासनाचे पितळ उघडे पडणार असल्याची टीका नागरिकांमधून होत आहे. शहरातील प्रमुख पाच नाले उपनाल्यांची साफसफाईची जबाबदारी प्रभाग अधिकारी अाराेग्याधिकाऱ्यांवर सोपवण्यात अाली हाेती. मात्र, अजूनही शहरात नाले साफसफाईच्या...
  June 27, 09:15 AM
 • सलग तीन सुट्यांमुळे एटीएम ‘कॅशलेस’, नो कॅशचे लागले बोर्ड
  जळगाव - बँकांना शनिवारपासून सलग तीन दिवस सुट्या असल्याने शहरातील एटीएमसमोर पैसे काढण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. कॅश टाकल्यानंतर काही तासांतच ती संपून जात असल्याने एटीएमसमोर नो कॅशचा बोर्ड लावण्यात आले. निम्याहून अधिक एटीएममध्ये कॅश नसल्याने ती बंद होती. चौथा शनिवार रविवारच्या सुटीमुळे बँका बंद होत्या. तर सोमवारी रमजान ईदच्या सुटीची भर पडली. बँका बंद असल्याने दैनंदिन व्यवहारासाठी लागणाऱ्या पैशांसाठी नागरिकांची एटीएमवरच भिस्त होती. नेहरू चौकातील अायडीबीआय, कोर्ट...
  June 27, 09:09 AM
 • शहरामध्ये चाेरीच्या प्रमाणात वाढ; चाेरट्यांवरील पाेलिसांचा वचक कमी
  जळगाव - शहरात मोठ्या चोऱ्या, घरफोड्यांवर थोड्या प्रमाणात नियंत्रण आल्यानंतर आता भुरट्या चोरट्यांनी उच्छाद मांडला अाहे. गेल्या चार दिवसांत चार घटनांमध्ये चोरट्यांनी सोने, पैसे, मोबाइल लंपास केले अाहेत. या घटनांमुळे चाेरट्यांवर पाेलिस प्रशासनाचा वचक कमी झालेला दिसत अाहे. रामानंदनगर, जिल्हापेठ एमआयडीसी या तीन पोलिस ठाण्यांच्या हद्दीत चाेरीच्या घटना घडल्या अाहेत. २२ जून रोजी रात्री एमआयडीसीत राहणाऱ्या सागर जाधव या सुरक्षारक्षकाची पत्नी दीपालीच्या गळ्यातील मंगळसूत्र पळवण्याचा...
  June 27, 09:06 AM
 • जीएसटीमुळे अकाउंटंटला येणार आता ‘अच्छे दिन’, पूर्णवेळ अकाउंटंटचा येणार ट्रेण्ड
  जळगाव - देशात 1 जुलैपासून लागू होणाऱ्या वस्तू आणि सेवा करामुळे उद्योजक व्यापाऱ्यांना त्यांनी विक्री केलेला माल, बिले, विवरणपत्रांबाबत नियमित शासनाला माहिती द्यावी लागणार आहे. हे काम अचूक नियमित करण्यासाठी आता अकाउंटंटची गरज भासणार आहे. त्यामुळे अकाउंटटला अच्छे दिन येणार असून अर्धवेळ ऐवजी पूर्णवेळ अकाउंटंटचा ट्रेण्ड बाजारपेठेत रुजणार आहे. जीएसटीमुळे व्यापाऱ्यांना उद्योजकांना दैनंदिन व्यवहाराच्या नोंदी ठेवताना चांगलीच दमछाक होणार आहे. वर्षभरात अनेक प्रकारे फाॅर्म शासनाकडे...
  June 27, 09:02 AM
 • ट्रक-रिक्षा अपघात; युवक गंभीर
  जळगाव - शहरातील इच्छादेवी चौफुलीवर सोमवारी दुपारी भरधाव ट्रकने रिक्षाला जोरदार धडक दिली. यात रिक्षातील तरुण बाहेर फेकला जाऊन गंभीर जखमी झाला. नागरिकांनी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. ट्रकसह चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आकाशवाणी चौकाकडून सावद्याकडे जाणारा ट्रक (एमएच- १९, झेड- ४२९५) इच्छादेवी चौफीलीजवळून भरधाव वेगाने जात होता. याचवेळी मेहरूण मधून येणारी रिक्षा (एमएच- १९, व्ही- ८८९५) सिंधी कॉलनीकडे जात होती. ट्रकने या रिक्षाला धडक देताच रिक्षातील प्रवासी रवींद्र...
  June 27, 09:00 AM
 • भुसावळातील गाेळीबाराचा जळगावात रचला कट; शहरातील दाेघे ताब्यात
  जळगाव - भुसावळ शहरातील पवननगर आणि भारतनगरात रविवारी रात्री सहा टवाळखोरांनी दहशत माजवत गोळीबार करून दोन युवकांना जखमी केल्याची घटना घडली. धुडगूस घालण्यापूर्वी सहा जणांनी रविवारी सायंकाळी जळगावात वेगवेगळ्या ठिकाणी दारू रिचवली. त्यानंतर एकमेकांना संपर्क करून सर्व जण शिवतीर्थ मैदानाजवळ एकत्र अाल्यानंतर पुन्हा दारू प्यायला गेले. या वेळी एकाने त्याच्याजवळील गावठी कट्टा दाखवल्यानंतर नशेत तर्रर्र असलेल्या टावळखाेरांनी धटिंग करण्याच्या उद्देशाने दोन दुचाकींवरून भरधाव वेगात भुसावळ...
  June 27, 08:48 AM
 • अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या नवजात बालिकेचा खून करून मृतदेह पुरला घरात
  यावल- अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या नवजात बालिकेचा खून करून तिचा मृतदेह घरातच पुरल्याची गंभीर घटना रविवारी जळगाव जिल्ह्यातील किनगाव खुर्द येथे उघडकीस आली. याप्रकरणी पीडित युवतीसह तिचे आई-वडील आणि भाऊ अशा चौघांविरुद्ध यावल पोलिसांत गुन्हा दाखल झाला. किनगाव खुर्द येथील २० वर्षीय अविवाहित युवती अनैतिक संबंधातून गर्भवती राहिली. तिच्या कुटुंबीयांना ही बाब उशिरा कळाल्याने गर्भपात करणे शक्य नव्हते. दरम्यान, १४ जून राेजी या युवतीने मुलीला जन्म दिला. मात्र, बदनामीच्या भीतीपोटी दाेन...
  June 27, 01:42 AM
 • जळगाव : 166 वर्षे जुनी जामा मशिदीत पैगंबरांच्या दाढीचा केस
  जळगाव : सुन्नी पंथाची भिलपुरातील जामा मशीद (मरकज) १६६ वर्षे जुनी अाहे. १८५१ ला अफगाणिस्तानातून अालेल्या राेहिले पठाणांनी शेती विकत घेऊन शनिपेठेत ही मशीद बनविल्याचे सांगितले जाते. त्यानंतर १८६०, १९२०, १९६० अाणि १४ वर्षांपूर्वी म्हणजे २००३ मध्ये या मशिदीचा विस्तार दुरुस्ती करण्यात अाली अाहे. या मशिदीचे वैशिष्ट्य म्हणजे हजरत मोहंमद पैगंबरांच्या दाढीचा केस (माेह मुबारक शरीफ) येथे ठेवण्यात अाला. तसेच साैदी अरेबियातील मक्का येथून काबा शरीफचा जलाफे काबा (पवित्र कापड) स्वातंत्र्यापूर्वी...
  June 26, 12:47 PM
 • धुळे: नरडाणा पोलिस ठाण्याच्या हद्दीत अनोळखी मृतदेह सापडला
  कापडणे : नरडाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंदाजे ५० वय असलेल्या इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. किशोर गजमल देवरे यांचे पिंपरखेडा शिवारात शेत आहे. या शेतातील विहिरीत हा मृतदेह आढळून आला पोलिसांचा अंदाजानुसार हा मृतदेह सुमारे १५ दिवस विहिरीत पडला असावा असा अंदाज आहे. विहिरीला आजूबाजूला कठडे नसल्याने व बाहेर मोठी काटेरी झुडुपे असल्याने लक्षात आले नाही. मात्र दिनांक २५ रोजी दुपारी विहिरीत पाणी किती आहे हे बघण्यासाठी गेलेल्या शेतकर्याच्या लक्षात आले की विहिरीत काहीतरी तरंगताना दिसत आहे....
  June 26, 12:36 PM
 • प्रवेश घेेतानाच मतदार यादीत नाव नोंदणीसाठी विद्यार्थ्यांचे घेणार अर्ज
  धुळे - निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार १८ वर्षे पूर्ण झालेल्या युवक-युवतींची नावे मतदार यादीत नांेदण्यासाठी ते ३१ जुलै दरम्यान विशेष नोंदणी मोहीम राबवली जाणार आहे. या कालावधीतच काही वरिष्ठ महाविद्यालयांसह तंत्रनिकेतनमध्ये प्रवेशप्रक्रिया होईल. त्यामुळे या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून प्रवेश अर्जासोबतच मतदार यादीत नाव नोंदणीसाठी अर्ज भरून घेतले जाणार आहेत. त्यासाठी महाविद्यालयांच्या प्राचार्यांची बैठक झाली. या वेळी मतदार यादीत नाव नोंदणीसाठी...
  June 26, 09:11 AM
 • भुसावळसह १० रेल्वे स्थानकांवर वाय-फाय
  भुसावळ - भुसावळ जंक्शनसह विभागातील १० रेल्वेस्थानकांवर मोफत वाय-फाय सुविधा पुरवण्यासाठी रेल्वे प्रशासनाने प्रक्रिया सुरू केली अाहे. त्यादृष्टीने भुसावळ जंक्शनवर कामाला गती देण्यात अाली अाहे. आठवडाभरात वाय-फाय यंत्रणेला सुरूवात होणार आहे. रेल्वे मंत्रालयाने अत्याधुनिकतेकडे वाटचाल सुरू केली अाहे. रेल्वे स्थानकावर येणाऱ्या प्रवाशांना माेफत वायफास सुविधा देण्याची घाेषणा २०१४ मध्ये सादर झालेल्या रेल्वे अर्थसंकल्पात करण्यात आली होती. त्यामुळे या घाेषणेची अंमलबजवणी केव्हा हाेते...
  June 26, 09:09 AM
 • पथसंचलनाआधीच शहर पोलिस ठाण्याबाहेर दोन गटात वाद
  जळगाव - ईद सणाच्या निमित्ताने रविवारी पोलिस कर्मचाऱ्यांच्या पथसंचलनाची तयारी सुरू असताना शहर पोलिस ठाण्याबाहेर दुपारी वाजता दुचाकीचा कट लागल्याने दोन गटात वाद झाला. या वादामुळे मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊन कलह वाढला होता. तसेच जोरदार शिवीगाळ सुरू झाली होती. सुमारे १५ मिनिटे चाललेला हा वाद मिटण्याच्या अखेरच्या क्षणाला पोलिसांनी एन्ट्री केली. उरल्या-सुरल्या जमावावर दमबाजी करीत, शिट्ट्या फुकत पोलिसांनी पथसंचलनाआधी शक्तिप्रदर्शन केले. सुदैवाने रस्त्यावरील नागरिकांनी हा वाद...
  June 26, 09:01 AM
 • दुकान फोडणाऱ्यांचा पाठलाग; गाडी नाल्यात सोडून चोरटे पसार
  जळगाव - दुचाकी चोरून तिच्यावरच स्वार होत मोबाइलचे दुकान फोडून पळून जात असलेले दोघे चोरटे पोलिसांना दिसले. त्यांचा पोलिसांनी पाठलाग केल्यानंतर त्यांनी चोरीची दुचाकी सोडून पळ काढला. रविवारी पहाटे ३.४५ वाजता मू.जे.महाविद्यालयाच्या परिसरात हा थरार घडला. ही दुचाकी शनिवारी रात्री खान्देश सेंट्रल मॉल परिसरातून चोरण्यात आली होती. चोरट्यांनी शनिवारी रात्री खान्देश सेंट्रल येथून एक दुचाकी (क्र.एमएच-१९/बीएस-२०००) लांबवली. नंतर हीच दुचाकी घेऊन त्यांनी पहाटे ३.३० वाजता मू.जे.महाविद्यालयाच्या...
  June 26, 08:58 AM
 • ‘जीएसटी’च्या पार्श्वभूमीवर ग्राहकांवर ऑफर्सचा पाऊस
  जळगाव - जीएसटीची जुलैपासून अंमलबजावणी सुरू हाेणार असून, अजूनही बहुसंख्य व्यापाऱ्यांमध्ये मात्र संभ्रमाची स्थिती अाहे. २००पेक्षा जास्त वस्तूंबाबत अद्यापही उलगडा हाेऊ शकलेला नाही. त्यात जुन्या मालाची प्राधान्याने विक्री करण्याचे धाेरण व्यापाऱ्यांनी अवलंबले अाहे. यासाठी विविध वस्तूंवर ग्राहकांना भरमसाट सूट देण्यात येत असून, इलेक्ट्राॅनिक्स फर्निचर खरेदीवर १० ते ३५ टक्क्यांपर्यंत डिस्काउंट अाॅफर दिली जात असल्याने ग्राहकांची नेहमीपेक्षा गर्दी वाढली अाहे. संपूर्ण देशभरात एकच...
  June 26, 08:53 AM
 • भुसावळात गाेळीबार; दाेन गंभीर, रात्री ११ वाजेची घटना
  भुसावळ - शहरातील भारतनगर पवननगरात अाठ ते नऊ टारगटांनी गाेंधळ घालून हवेत गाेळीबार केला. त्यात दाेन युवक गंभीर जखमी झाले. ही घटना रविवारी (दि.२५) रात्री ११ वाजता घडली. घटनास्थळी चाेख पाेलिस बंदोबस्त तैनात केला अाहे. भारतनगरात रात्री ११ वाजता तीन दुचाकींवर ट्रिपलसीट नऊ युवक अाले. त्यांनी जाेरजाेरात अारडाअाेरड करून एका घरात घुसून कुलर, तर दुसऱ्या घरासमाेर लावलेल्या दुचाकीची माेडताेड केली. त्यानंतर पिस्तुलातून दाेन राउंड हवेत गाेळीबार केला. त्यानंतर ते पवननगरात अाले. या ठिकाणी माेकळ्या...
  June 26, 08:49 AM
 
जाहिरात
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
जाहिरात
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 

हास्ययात्रा