Home >> Maharashtra >> Western Maharashtra

Western Maharashtra

 • अंगणवाडी सेविकांचा पाथर्डीत रास्ता रोको, शासन दुर्लक्ष करत असल्‍याच्‍या निषेधार्थ आंदोलन
  पाथर्डी -मागील सात दिवसांपासून राज्यभर सुरू असलेल्या काम बंद आंदोलनाकडे शासन गांभीर्याने पाहत नसल्याच्या निषेधार्थ येथील साईश्रद्धा अंगणवाडी संघटनेच्या वतीने सोमवारी शहरातील नाईक चौकात शेकडो अंगणवाडी सेविकांच्या उपस्थितीत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शासनाच्या विरोधात त्यांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. मानधनवाढीसह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी संघटनांनी ११ सप्टेंबरपासून राज्यभर आंदोलन सुरू केले आहे. याचाच एक भाग म्हणून साईश्रद्धा अंगणवाडी...
  09:48 AM
 • मोकाट बैलाच्या हल्ल्यात 11 जखमी, महापालिकेचा ढिसाळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर
  नगर -मोकाट कुत्रे जनावरांमुळे नगरकर अक्षरश: रडकुंडीला आले आहेत. कुत्र्यांपाठोपाठ आता मोकाट जनावरांची शहरात दहशत वाढली आहे. माळीवाडा परिसरातील कोहिनूर गार्डन अपार्टमेंटजवळ एका बैलाने सोमवारी दिवसभर धुमाकूळ घातला. बैलाने तब्बल १४ जणांना आपल्या शिंगावर घेतले. त्यात ११ जण जखमी झाले असून जणांना गंभीर दुखापत झाली आहे. रात्री उशिरापर्यंत हा थरार सुरू होता. यानिमित्ताने महापालिकेचा ढिसाळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. सकाळी ११ ची वेळ एक मोकाट बैल कोहिनूर अपार्टमेंटमध्ये शिरला....
  09:46 AM
 • जवखेडे हत्याकांड खटला: प्रशांत जाधवच्या घरातच सापडली होती हत्यारे, सरकारी पंचाची साक्ष
  नगर -पोलिसांनी न्यायालयाची परवानगी घेऊन केलेल्या झडतीमध्ये आरोपी प्रशांत जाधव (तत्कालीन फिर्यादी) याच्या घरात धारदार शस्त्रे सापडली होती, अशी महत्वपूर्ण बाब सरकारी साक्षीदार अमर शेंडे यांनी आपल्या सरतपासणीत सांगितली. कामगार तलाठी असलेले शेंडे या पंचनाम्याला उपस्थित होते. या पंचनाम्याची सविस्तर तपशील त्यांनी न्यायालयात कथन केला. विशेष सरकारी वकील उमेशचंद्र यादव यांनी जवखेडे तिहेरी हत्याकांड खटल्यात शेंडे यांच्यासह एका पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची सरतपासणी घेतली. प्रधान जिल्हा सत्र...
  09:46 AM
 • ‘लॉरेन्स’च निघाला खंडणीखोर टोळीचा ‘स्वामी’, सूत्रधार लॉरेन्स स्वामीसह ठेकेदारही आरोपी
  नगर -नगर-सोलापूर रस्त्यावर टोलनाक्यांवर ट्रकचालकांकडून सक्तीची खंडणीवसुली करणाऱ्या टोळीचा मुख्य सूत्रधार लॉरेन्स स्वामी असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे लॉरेन्स स्वामी टोलनाक्यावरील ठेकेदार जयंत खळदकर यांनाही आरोपी केले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा या गुन्ह्याचा तपास करत आहे. या तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. अटकेत असलेल्या ११ आरोपींचे जामीन न्यायालयाने फेटाळले...
  09:44 AM
 • शिक्षणमंत्र्यांच्या अंगावर निवेदन फेकून, भंडारा उधळून निषेध
  सोलापूर- शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी भाषण करण्यास सुरुवात केली. तेवढ्यात धनगर समाजाच्या चार -पाच कार्यकर्त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठास नावे द्यावे, या मागणीचे निवेदन भंडार शिक्षण मंत्र्यांच्या अंगावर टाकला. येळकोट येळकोट जय मल्हारच्या घोषणा दिल्या. त्यावेळी पोलिसांनी त्या पाच कार्यकर्त्यांना सभागृहाच्या बाहेर काढले. अहिल्यादेवी होळकर की सिद्धेश्वर विद्यापीठ नाव द्यायचे, हा वाद चिघळण्याची शक्यता आहे. गत महिन्यामध्ये धनगर समाजातर्फे अहिल्यादेवी होळकर...
  09:33 AM
 • दसरा मेळावा बैठकीत पंकजा समर्थकांकडून ‘सुपारी’ची भाषा; समर्थकावर कारवाईची मागणी
  पाथर्डी -ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत श्रीक्षेत्र भगवानगड येथे दसरा मेळावा घ्यायचाच, असा चंग त्यांच्या समर्थकांनी यंदा बांधला अाहे. त्यामुळे मुंडे व महंत नामदेवशास्त्री समर्थकांमध्ये तणाव वाढत अाहे. दरम्यान, या मेळाव्याच्या तयारीसाठी रविवारी पाथर्डीत अायाेजित बैठकीत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सोमनाथ खेडकर यांनी थेट सुपारी घेण्याची भाषा केल्यामुळे महंतांच्या भक्तांमध्ये तीव्र पडसाद उमटले अाहेत. याबाबत योग्य ती कारवाई करण्याची मागणी भगवानगडाच्या वतीने...
  09:32 AM
 • मंत्र्यांच्या नातलगांची पर्स शोधण्यास लोहमार्ग पोलिसांची तीन पथके
  सोलापूर- केंद्रीय मनुष्यबळ मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या नातलग असलेल्या महिला प्रवाशाची पर्स दोन दिवसांपूर्वी हावडा ते पुणेदरम्यान धावणाऱ्या आझाद हिंद एक्स्प्रेसमधून चोरीला गेली. मंत्र्यांचे नातलग असल्याचे समजल्यावर पोलिसांनी तीन पथके तयार करून चाेरांचा शोध घेण्यास सुरुवात केली. दरम्यान लोहमार्ग पोलिसांनी एका संशयिताला चौकशीसाठी ताब्यात घेतले. नंतर मात्र जामिनावर त्याची सुटका करण्यात आली. मीना सुभाष हारपुरे (रा. पुणे) या आपल्या आईसमवेत शनिवारी हावडा-पुणे आझाद हिंद...
  09:27 AM
 • देवपूजेला पाणी आणण्यासाठी गेलेला तरुण पुजारी भीमेत बुडाला
  दक्षिण सोलापूर- पूजेसाठी भीमा नदीत पाणी आणण्यासाठी गेलेला तरुण पुजारी भीमा नदीत बुडाला. त्याचा शोध लागला नाही. साेमवारी (दि. १८) सकाळी साडेसहाच्या सुुमारास मंगळवेढा तालुक्यातील अरळी येथे ही घटना घडली. सायंकाळपर्यंत शोधाशोध करण्यात आली. अशोक तुकाराम पुजारी (वय २३) असे त्याचे नाव आहे. गेल्या आठवडाभरात जिल्ह्यात घडलेली ही तिसरी दुर्घटना आहे. अरळी येथील नृसिंह देवाच्या पूजेचा मान पुजारी कुटुंबाकडे आहे. गेल्या पाच वर्षांपासून त्यांच्याकडे पूजा आहे. अशोक हा दररोज सकाळी संध्याकाळी नृसिंह...
  09:23 AM
 • ‘सोलापूर विद्यापीठाला शिवयोगी श्री सिद्धेश्वर महाराजांचे देईपर्यंत लढा’
  सोलापूर- सोलापूर विद्यापीठाची स्थापना झाल्यानंतर शिवा संघटनेने विद्यापीठास सिद्धेश्वर विद्यापीठ नाव देण्याची मागणी केली आहे. गेली १३ वर्षे आम्ही यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करीत आहोत. मात्र काही राजकीय मंडळी आपली पोळी भाजून घेण्यासाठी लिंगायत धनगर समाजात संघर्ष पेटवण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र कोअर कमिटीतील सदस्य काळात धनगर समाजातील नेतेमंडळींशी चर्चा करतील. यानंतर कपिलधारा येथे नोव्हेंबर रोजी शिवा संघटनेच्या राज्यस्तरीय बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाईल. हा लढा आता...
  09:09 AM
 • विद्यापीठ नामांतरासाठी शिक्षणमंत्र्यावर उधळला भंडारा; लिंगायत संघटनांचाही माेर्चा
  साेलापूर-साेलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी हाेळकर यांचे नाव देण्याची मागणी धनगर संघटनांतून हाेत असतानाच साेमवारी लिंगायत समाजातील काही संघटनांनीही विद्यापीठाला सिद्धेश्वरांचे नाव देण्याच्या मागणीसाठी शहरात माेर्चा काढला. त्यामुळे विद्यापीठ नामांतराचा विषय चिघळण्याची चिन्हे अाहेत. दरम्यान, अादर्श शिक्षक पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमासाठी शहरात अालेले शिक्षणमंत्री विनाेद तावडे यांच्या अंगावर भंडारा उधळत व नामांतर मागणीचे निवेदन फेकून धनगर समाजातील काही कार्यकर्त्यांनी...
  06:06 AM
 • अजित पवारांना फारसे कोणी सीरिअस घेत नाही; तावडेंचे बोगस डिग्रीच्या टीकेला प्रत्युत्तर
  सोलापूर- मुंबई विद्यापीठाच्या निकालाच्या दिरंगाईवरुन अजित पवारांनी केलेल्या टीकेला शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी प्रत्युत्तर दिले आहे. अजित पवारांना फारसे कोणी सीरिअस घेत नाही असे विनोद तावडे यांनी म्हटले आहे. मुंबई विद्यापीठाच्या निकालाच्या दिरंगाईप्रकरणी आज राष्ट्रवादी नेते आणि आमदार अजित पवार यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावर सडकून टीका केली होती. बोगस डिग्री असलेली व्यक्ती राज्याचा शिक्षणमंत्री कसा असू शकतो?, असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला होता. पुणे जिल्हा...
  06:04 AM
 • विद्यापीठांचा अभ्यासक्रम पाच वर्षांनी बदलणार; सावित्रीबाई फुले पुरस्काराचे वितरण
  सोलापूर-राज्यातील विविध विद्यापीठांमध्ये बी. कॉमच्या अकाउंटन्सी व अर्थशास्त्र अभ्यासक्रम बदलाविषयी विचारणा केली. विविध कुलगुरूंनी अॅकॅडमी कौन्सिलची बैठक व्हायची आहे अशी उत्तरे दिली. देशात जीएसटी लागू झाली तरी विद्यापीठामध्ये सेल्स टॅक्स शिकवला जातोय. जीएसटी येणार आहे हे दहा वर्षांपासून चर्चा आहे तरीदेखील अभ्यासक्रमात समावेश केला नाही. काळानुरूप शिक्षण बदलणे गरजेचे असून अाता दर पाच वर्षांनी अभ्यासक्रम बदलणार आहे. त्याची सुरुवात विद्या प्राधिकरणाच्या माध्यमातून केली आहे, असे...
  04:06 AM
 • सोलापूर विद्यापीठास श्री सिद्धेश्वर नाव देण्यासाठी लिंगायतांचा मोर्चा, तावडेंवर फेकला भंडारा
  सोलापूर- सोलापूर विद्यापीठाला ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज यांचे नाव देण्यासाठी सोमवारी सर्वपक्षीय जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. वीरशैव व्हीजन, शिवा संघटना यांच्यासह काही संघटनांनी यात सहभाग घेतला. सकाळी अकराला महात्मा बसवेश्वर पुतळ्यापासून सुरुवात झाली त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिल्यानंतर होम मैदानावर जाहीर सभा झाली. धनगर समाजाला आरक्षण मिळवून देऊ, अशी भ्रामक आशा दाखवून ही अफूची गोळी त्यांना देण्यात येत असल्याचे शिवा संघटनेचे राष्ट्रीय...
  September 18, 03:46 PM
 • कोल्हापुरात सिमेंटच्या पाईपमध्ये बाईक घुसून 2 सख्ख्या भावांचा जागेवरच मृत्यू
  कोल्हापूर- कोल्हापुरातील नागाळा पार्क येथील कसबा बावडा रोडवरील खानविलकर पेट्रोल पंपासमोरकोल्हापूर महानगरपालिकेच्या अर्धवट सोडलेल्या कामातील रस्त्याकडेलापडलेल्या मोठ्या सिमेंटपाईपमध्ये भरधावदुचाकीघुसल्याने दुचाकीवर स्वार असलेल्यादोघ्या सख्ख्या भावांचा जागीच मृत्यु झाला. ही घटना काल (रविवार) सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली. तेजस महादेव घाटगे (वय32),योगेश महादेव घाटगे (वय28,दोघेही रा. पिंपळगाव खुर्द ता. कागल) अशी मयत झालेल्यादुर्दैवीभावांची नावे आहेत. या घटनेने पिंपळगाव...
  September 18, 11:51 AM
 • भाजपच्या शहराध्यक्षांनी प्रदेश कार्यालयास अहवाल पाठवला, पालकमंत्री हतबल
  सोलापूर- महापालिकेच्या व्यापारी संकुलातील गाळ्यांच्या लिलाव प्रश्नावरून झालेल्या मतदानावेळी भाजपचे काही नगरसेवक ऐनवेळी सभागृहाबाहेर गेले. तसेच अपशब्द वापरल्याच्या कारणावरून महापौर शोभा बनशेट्टी यांनी स्थायी समिती सभापती संजय कोळी यांना निलंबित केले. याप्रकरणी अहवाल प्रदेश कार्यालयास पाठवण्यात आल्याची माहिती भाजप शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी यांनी दिली. या प्रकरणात भाजपचे ते १६ नगरसेवक मतदानावेळी बाहेर का गेले? स्थायी समिती सभापतींनी महापौरांबद्दल अपशब्द काय आणि का...
  September 18, 09:17 AM
 • 192 पोलिसांनी निधी जमवून अनाथाश्रम, पाखर संकुलात केली मदत
  सोलापूर- सोलापूर ग्रामीण पोलिस दलात २००७ मध्ये १९२ तरुण भरती झाले. अाज त्यांच्या सेवेला १० वर्षे पूर्ण झाली. त्याबद्दल वर्दीतली माणुसकी हा वेगळा उपक्रम घेतला. सेवा काळात दोन मित्रांचे निधन झाले. त्यांच्या मुलांसाठी प्रत्येकी ५१ हजार याप्रमाणे एक लाखाची बँकेत ठेव ठेवली. पंढरपूर माढा येथील वृध्दाश्रम अनाथाश्रम शहरातील पाखर संकुलात चादरी फ्रीज अन्य साहित्य भेट दिले. अाई, वडील, पत्नी, मुले, पोलिस अधिकारी यांच्यासोबत स्नेहमिलन. स्नेहभोजन रक्तदान शिबिर झाले. रविवारी ग्रामीण पोलिस...
  September 18, 09:10 AM
 • चांदणी नदीत पोेहताना भोवऱ्यात तरुण बेपत्ता, रात्री उशिरापर्यंत शोधकार्य अपयशी
  बार्शी- दुथडी भरून वाहणाऱ्या चांदणी नदीत पोहण्यासाठी गेलेला युवक पाण्याच्या भोवऱ्यात सापडून बेपत्ता झाला. रविवारी (दि. १७) दुपारी तीनच्या सुमारास ही दुर्घटना घडली. रात्री उशिरापर्यंत गावातील तरुणांना शोधूनही सापडला नाही. श्रीकांत उर्फ पप्पू युवराज नवले (वय २४, रा. कांदलगाव, ता. बार्शी) असे त्याचे नाव आहे. शोधकार्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाचे पथक उशिरापर्यंत पोहोचले नव्हते. १५ दिवसांपासूनच्या पावसामुळे चांदणी नदीला पूर आला होता. दोन दिवसांनंतर पाणी आेसरले. तरीही नदी दुथडी भरून वाहत आहे....
  September 18, 09:06 AM
 • गुन्हा मागे घे; अन्यथा विनयभंगात अडकवू... जातपंचायतीविरुद्ध लढणाऱ्या युवकाला धमकी
  नगर- तिरमली जातपंचायतीतील २५ जणांविरुद्ध नोंदवलेला गुन्हा मागे घे, नाहीतर तुला विनयभंगासारख्या खोट्या गुन्ह्यात अडकवू, जीवे ठार मारुन टाकू, अशी धमकी काही जणांनी जातपंचायतीविरुद्ध आवाज उठवणाऱ्या युवकाला दिली. नगर तालुका पोलिस ठाण्यात सामाजिक बहिष्कार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्ह्याची नोंद आहे. या गुन्ह्यातील सर्व आरोपींना अटक झालेली असून त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत आहे. त्यामुळे चिडलेल्या आरोपींच्या समर्थकांनी फिर्यादी युवकालाच पुन्हा एकदा धमकी दिली आहे. तिरमली...
  September 18, 08:51 AM
 • भाजपला खटकतेय पालकमंत्री शिंदेंची शिवसेनेशी जवळीक, काँग्रेसमध्ये मात्र सन्नाटा
  नगर- सत्तेवर असलेल्या शिवसेना-भाजपचे प्रदेश स्तरावर जमत नसताना नगर जिल्ह्यात मात्र पालकमंत्री नगर शहरातील शिवसेना नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मस्त चाललंय आमचं सुरू आहे. पालकमंत्र्यांचे शिवसेनेचे चांगले सूत जमल्यामुळे शहर भाजपमध्ये मात्र अस्वस्थता पसरली अाहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शिवसेना नेत्यांच्या पालकमंत्र्यांशी भेटी वाढल्याने नेमके काय गौडबंगाल? याची चर्चा सध्या सुरु झाली असून, शहर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मात्र यावर मौन पाळणेच पसंत केले आहे. राज्यात...
  September 18, 08:46 AM
 • श्रीगोंदे तालुक्यातील पहिल्या शिवसैनिकाचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
  श्रीगोंदे- तालुक्यातील पहिला शिवसैनिक म्हणून ओळख असलेल्या नंदकुमार ताडे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करून भाजपचा रस्ता धरला आहे. तब्बल ३३ वर्षे पक्षाशी एकनिष्ठ राहूनसुद्धा दखल घेतली जात नसल्याने आपण दुःखद अंतःकरणाने सेनेला रामराम करत असल्याचे ताडे यांनी रविवारी दिव्य मराठीशी बोलताना सांगितले. १९८४ मध्ये तालुक्यात शिवसेनेची स्थापना ताडे यांच्या पुढाकारातून झाली. जिल्ह्यातील ही दुसरी शाखा. त्यावेळी शिवसेना म्हटले की लोक बिचकत. तरूणांनी शिवसेनेत जाऊ नये, म्हणून वडीलधारी मंडळी...
  September 18, 08:41 AM
 
जाहिरात
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
जाहिरात
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 

हास्ययात्रा