Home >> Maharashtra >> Western Maharashtra >> Ahmednagar
 • जिल्हा परिषदेच्या भरतीत अनुकंपावर येणार गंडांतर, खर्च कमी करण्याचे धोरण
  नगर- जिल्हापरिषदेत नोव्हेंबरमध्ये भरती प्रक्रिया होणार आहे. एकूण रिक्त पदांच्या १० टक्के जागा अनुकंपा तत्त्वावर भरण्याचे शासनाचे निर्देश आहेत. परंतु या भरती प्रक्रियेत एकूण रिक्त पदांच्या ५० टक्के अथवा संवर्गातील रिक्त पदांच्या टक्के यापैकी जी संख्या कमी असेल तेवढीच पदे भरण्याचे संकेत ग्रामविकास विभागाने दिले. त्यामुळे अनुकंपा तत्त्वावरील जागा नेमक्या किती भरायच्या याबाबत जिल्हा परिषद प्रशासनात संभ्रम आहे. शासकीय सेवेत असताना कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास किंवा कायमचे...
  11:48 AM
 • वाहनमालक शोधताना पोलिसांची दमछाक, २४ मोटारसायकली जप्त
  नगर- मोटारसायकली चोरणारी तीन युवकांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेने गजाआड केली. अथक परिश्रमानंतर आरोपींच्या ताब्यातून तब्बल २६ मोटारसायकली पोलिसांनी जप्त केल्या. आता या मोटारसायकलींचे मूळ मालक शोधताना पोलिसांची चांगलीच दमछाक झाली आहे. कारण मोटारसायकल कंपन्यांनी पोलिसांना मूळ मालकांची माहिती देण्यास टाळाटाळ चालवली आहे. त्यामुळे जप्त केलेल्या मोटारसायकलींचे करायचे काय, नेमके कोणत्या गुन्ह्यामध्ये आरोपींना वर्ग करायचे, असे प्रश्नचिन्ह पोलिसांपुढे उभे ठाकले आहेत. चोरीच्या...
  11:43 AM
 • नगर- युनियनच्याविरोधात पोलिस ठाण्यात फिर्याद का दिली, याचा राग मनात धरुन सात जणांनी एमआयडीसीतील क्लासिक व्हील्स कंपनीतील एका कर्मचाऱ्याला लाकडी दांडके लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली, तसेच कानाजवळ रिव्हॉल्व्हर रोखून जीवे मारण्याची धमकीही दिली. हा प्रकार बुधवारी रात्री एमआयडीसी परिसरात घडला. जखमी झालेल्या कर्मचाऱ्याने रुग्णालयात नोंदवलेल्या जबाबानुसार एमआयडीसी पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. हरिभाऊ केरु रौंदळ (३७, रेणुकानगर, बोल्हेगाव) असे जखमी कर्मचाऱ्याचे...
  11:38 AM
 • आता धोका समन्यायी पाणीवाटप धोरणाचा, जायकवाडीला जाणार पाणी
  नगर- जलसंपत्ती अधिनियमन प्राधिकरण अधिनियमातील तरतुदींचे दुष्परिणाम गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्याला भाेगावे लागत आहेत. यंदा जिल्ह्यात पावसाभावी खरीप पिके वाया जाऊनही मुळाचे आवर्तन मिळाले नाही. भंडारदरा धरणातून उशिरा आवर्तन सोडल्याने त्याचा फायदा झाला नाही. धरणातील साठे पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवल्याचे कारण पुढे करून लाभक्षेत्रात पिण्याच्या पाण्यासाठी अडवणूक सुरू आहे. या पार्श्वभूमीवर अधिनियमातील समन्यायी पाणीवाटपाच्या धोरणाचा फटका जिल्ह्याला बसणार आहे. १५...
  11:32 AM
 • गृहराज्यमंत्री पाटील यांच्याविरोधात समता संघर्ष समितीची निदर्शने
  नगर; कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणात गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ गोविंद पानसरे समता संघर्ष समितीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. समितीचे बन्सी सातपुते, सुभाष लांडे, सुरेश संत, शंकरराव घुले, रमेश नागवडे, भगवान गायकवाड, कारभारी वीर, रमेश नागवडे, संजय नांगरे, सीताराम लांडे, अर्शद शेख, लक्ष्मण नवले, चक्रधर ससाणे, नानासाहेब कदम, कमल दोंता, अनिल कढणे, चंद्रकांत मुगनेल, सीताराम रहाणे, व्यंकटेश बोगा,...
  11:32 AM
 • बिबट्याशी दाेन हात करत वर्षाच्या तान्हुल्याला वाचवले
  संगमनेर (जि. नगर) - पोटच्या गोळ्याच्या जिवावर उठलेल्या बिबट्याशी प्राणपणाने झुंज देत वर्षभराच्या तान्हुल्याला मातेने वाचवल्याची हृदयस्पर्शी घटना संगमनेर-अकोले रस्त्यावर कोकणेवाडी शिवारात घडली. गुरुवारी रात्री दुचाकीवरून जाताना हा थरार घडला. धांदरफळ खुर्द येथील भाऊसाहेब खताळ पत्नी रूपाली व एक वर्षाच्या कृष्णाला घेऊन सुगावहून (अकोले) गावी परतत होते. डोंगराळ व गर्द झाडीतून येताना भैरवनाथ मंदिराजवळ अचानक आडवे आलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढवला. भीतीने दुचाकीवरून जमिनीवर...
  01:30 AM
 • रुग्णांना अाधुनिक सेवा सुविधा पुरवा
  अकोला - रुग्णसेवाही ईश्वरसेवा असून, प्रत्येक रुग्णालयातील अधिकारी, कर्मचाऱ्याने प्रामाणिकपणे वैद्यकीय सेवा सुविधा दिल्या पाहिजे, असा सल्ला वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी दिला. जिल्हा स्त्री रुग्णालय सर्वोपचार रुग्णालयात दुपारी ३.३० वाजता त्यांनी भेट देऊन कामाची पाहणी केली. त्या वेळी ते बाेलत हाेते. या वेळी त्यांच्यासोबत खासदार संजय धोत्रे, अामदार रणधीर सावरकर, आरोग्य उपसंचालक डॉ. अविनाश लव्हाळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आर. एच. गिरी, जिल्हा आरोग्य...
  October 9, 10:41 AM
 • जीवघेण्या
  नगर - अवजड वाहतुकीमुळे शहरात निर्माण होणारी वाहतूक कोंडी आता नित्याचीच झाली आहे. त्यामुळे अपघातांची संख्या वाढली आहे. अपघातानंतर वाहतूक पोलिसांच्या निलंबनाची मागणी केली जाते. त्यासाठी एकापाठोपाठ एक संघटना रस्त्यावर उतरतात, पण नगरकरांना वाहतुकीची शिस्त लावण्यासाठी कोणीही पुढे येत नाही. त्यामुळे बेशिस्त वाहतूक अंगवळणी पडलेेले वाहनचालक आता सर्रास जीवघेणे शॉर्टकट अवलंबत आहेत. ही बाब पोलिसांची नजर चुकवून होत असल्यामुळे अशा शॉर्टकटमुळे अपघात होऊन त्यात कोणाचा जीव दगावला, तर त्याला...
  October 9, 10:22 AM
 • ई-टेंडरिंग टाळण्यासाठी झेडपीत लागली फिल्डिंग
  नगर - पाणी योजनांच्या दुरुस्ती देखभालीसाठी जिल्हा नियोजनकडून नऊ दिवसांपूर्वी कोटी ७२ लाखांचा निधी उपलब्ध झाला. मात्र, ई-टेंडरिंग टाळण्यासाठी काही मंडळींनी फिल्डिंग लावल्याने हा निधी अद्याप खर्च झाला नसल्याची जिल्हा परिषदेत चर्चा आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांनी ई-टेंडरिंग करण्याचा आग्रह धरल्याने ठेकेदारांसह काही पुढाऱ्यांची गोची झाली आहे. जिल्हा वार्षिक योजनेच्या एकूण निधीपैकी टक्के निधी जिल्ह्यातील महत्त्वाच्या पाणीपुरवठा योजनांवर खर्च करण्याची तरतूद आहे....
  October 9, 10:18 AM
 • चार पोलिसांना १३ पर्यंत कोठडी
  नगर - बहुचर्चित नितीन साठे खूनप्रकरणी आरोपी असलेले चार पोलिस गुरुवारी सकाळी स्वत:हून कोतवाली पोलिस ठाण्यात हजर झाले. न्यायालयाने या पोलिसांना १३ ऑक्टोबरपर्यंत पोलिस काेठडी दिली. याच गुन्ह्यात आरोपी असलेले एक पोलिस निरीक्षक उपनिरीक्षक मात्र अजून फरार आहेत. संशयास्पद म्हणून ताब्यात घेतलेल्या नितीन बाळू साठे (२२, जवळा, ता. पारनेर) या युवकाचा कोतवाली पोलिसांनी केलेल्या बेदम मारहाणीमुळे मृत्यू झाला होता. याप्रकरणी दलित संघटनांनी आक्रमक आंदोलनाचा पवित्रा घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी...
  October 9, 10:15 AM
 • १४८ कर्मचारी अडकले चौकशीच्या फेऱ्यात...
  नगर - महापालिकेचे अधिकारी तब्बल १४८ कर्मचारी गेल्या आठ वर्षांपासून चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. त्यांच्यावर कामातील अनियमितता गैरव्यवहारांचे आरोप आहेत. विशेष म्हणजे त्यांच्यावरील कारवाई टाळण्यासाठी महापालिका प्रशासन केवळ कागदी घोडे नाचवत आहे. कामगार अधिकारी आर. एस. खोलम यांनी वर्षभरात वर्ग तीन चार मधील ६५ कर्मचाऱ्यांच्या चौकशा निकाली काढल्या आहेत. मात्र, उर्वरित अधिकारी कर्मचाऱ्यांच्या चौकशांचा फार्स अजून सुरूच आहे. महापालिकेत सुमारे हजार ३०० कर्मचारी, तसेच ३२ अधिकारी काम...
  October 9, 10:06 AM
 • जलआराखड्यावरील हरकतींसाठी मुदतवाढ, ३१ ऑक्टोबर अंतिम मुदत
  नगर- गोदावरीखोऱ्यातील पाण्याचे नियोजन करणाऱ्या जलआराखड्याविरोधात हरकती मागवण्यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. यापूर्वी १६ सप्टेंबरपर्यंत हरकती मागवण्यात आल्या होत्या. त्याचवेळी मुदतवाढीचे संकेत देण्यात आले होते. मात्र, १६ सप्टेंबरची मुदत संपल्यानंतर तीन आठवड्यांनी राज्य सरकारला उपरती झाली. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण अधिनियम २००५ नुसार गोदावरी खोऱ्यातील पाण्याचे नियोजन करणारा जलआराखडा ऑगस्टमध्ये प्रसिद्ध करण्यात आला. अधिनियम लागू झाल्यानंतर...
  October 8, 09:05 AM
 • ४० कोटींच्या कामात नगरसेवकाचा खोडा, प्रस्तावात बोगस कामे दाखवल्याचा अारोप
  नगर- तीनवर्षांपासून मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेला मूलभूत सुविधांचा ४० कोटींच्या कामांचा प्रस्ताव पुन्हा ऐरणीवर आला आहे. विभागीय आयुक्त कार्यालयात मंजुरीसाठी पाठवलेल्या या प्रस्तावात महापालिकेने बोगस कामे दाखवून शासनाची फसवणूक केली आहे. त्यामुळे कामांची समक्ष पाहणी केल्याशिवाय प्रस्तावास मंजुरी देऊ नका, अशी तक्रार नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी बुधवारी नगरमध्ये आलेले विभागीय आयुक्त एकनाथ डौले यांच्याकडे केली. त्यामुळे ४० कोटींच्या कामांबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्हं निर्माण...
  October 8, 09:02 AM
 • स्वत:च्याच घरात केली घरफाेडी, घरात पाऊल ठेवू नका; न्यायालयाचे आदेश
  जळगाव- लाखाेंचेकर्ज फेडण्यासाठी स्वत:च्याच घरात घरफाेडी करणाऱ्या जीवननगरातील युवक त्याच्या पत्नीला मंगळवारी न्यायाधीश प्रतिभा पाटील यांच्या न्यायालयात हजर करण्यात अाले हाेते. या वेळी दाेघांना न्यायालयीन काेठडी सुनावण्यात अाली. त्यानंतर दाेघांनी जामिनासाठी अर्ज केल्यावर त्यांना अटी-शर्तींवर जामीन मंजूर करण्यात अाला. जीवननगरातील सेवानिवृत्त कृषी अधिकारी पंढरीनाथ गुंजन इंगळे यांचा लहान मुलगा तेजस इंगळे सून नम्रता या दांपत्याने संगमताने अापल्याच घरात घरफाेडी केली हाेती....
  October 7, 10:01 AM
 • फसलेले
  नगर- नगरशहरात प्लॉट इमारतींचे दर गगनाला भिडले आहेत. याचाच गैरफायदा घेत जागेची खरेदी-विक्री करून फसवणूक करणारे रॅकेट शहरात पुन्हा सक्रिय झाले आहे. याप्रकरणी अनेक तक्रारी पोलिसदप्तरी दाखल आहेत. परंतु ज्यांची फसवणूक झाली, त्यांनाच आत टाकून दोषींना अभय देण्याचे काम सध्या कोतवाली पोलिसांकडून सुरू आहे. मनमाड रस्त्यावरील हुंडेकरी लॉनशेजारी असलेल्या जागेच्या खरेदी-विक्रीत असाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तब्बल आठजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असला, तरी पोलिस मात्र ज्यांची...
  October 7, 09:51 AM
 • नदी-तलाव जोड प्रकल्पामुळे एक हजार एकर क्षेत्राला लाभ
  नगर- दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या पारनेर तालुक्यातील कापरी नदीच्या पाणलोटातील पाडळीतर्फे कान्हूर या गावातील तलावातून वाया जाणारे पाणी नैसर्गिक उताराने बंद पाइप टाकून हजार ६५० मीटरवर असलेल्या इनामांचा ओहुळ (पाडळी कान्हूर) या तलावात सोडण्यात आले. त्यामुळे अनेक वर्षांपासून भरलेला इनामांचा ओहूळ आता ओव्हर फ्लो झाला आहे. या प्रकल्पाचा फायदा सुमारे हजार एकर क्षेत्राला होणार आहे. या मिनी नदीजोड प्रकल्पासाठी अवघा २२ लाख खर्च आला असून राज्यातील सर्वाधिक कमी खर्चाचा नदीजोड प्रकल्प...
  October 7, 09:47 AM
 • जिल्ह्यासह राज्यात पुन्हा वादळी पावसाची शक्यता, बी. एन. शिंदे यांचा अंदाज
  नगर- मान्सूननिघून गेला असला, तरी अरबी बंगालच्या समुद्रात वादळे तयार होत आहेत. या वादळाचे रुपांतर लवकरच चक्रीवादळात होणार अाहे. त्यामुळे नगर जिल्ह्यासह राज्यात पुन्हा वादळी पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान अभ्यासक प्रा. बी. एन. शिंदे यांनी मंगळवारी व्यक्त केला. निरभ्र आकाशामुळे राजस्थानमधील तापमान सुमारे ३८ ते ४० सेल्सिअसपर्यंत वाढले आहे. सध्याच्या पावसामुळे केरळ तामिळनाडूचे तापमान २८ ते ३२ सेल्सिअसपर्यंत कमी झाले आहे. त्यामुळे वादळे महाराष्ट्राकडे ओढली जात आहेत. एक-दोन दिवसांत...
  October 7, 09:47 AM
 • लघू पाटबंधारेचे वर्षात अवघे तीन बंधारे पूर्ण, पदाधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाने रखडली केमे
  नगर- जिल्ह्यातगंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असताना जलसंधारणासाठीचा निधी खर्च करण्यात जिल्हा परिषदेच्या लघू पाटबंधारे विभागाला स्वारस्य नसल्याचे समोर आले आहे. मागील दोन वर्षात मंजुर असलेल्या ४३ बंधाऱ्यांपैकी अवघ्या बंधाऱ्यांचीच कामे पूर्ण झाली आहे. तसेच चार कामे अजुनही निविदा प्रक्रियेत अडकली आहेत. पदाधिकाऱ्यांनीही या विभागाकडे दुर्लक्ष केल्यामुळेच जलसंधारणाची कामे अपूर्ण असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहे. जिल्ह्यात मागील चार वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती निर्माण...
  October 6, 09:06 AM
 • अहमदनगर मर्चंटस् बँकेवर मुनोत यांचे वर्चस्व अबाधित
  नगर- मर्चंटस् बँकेच्या निवडणुकीत बँकेचे संस्थापक हस्तीमल मुनोत यांच्या नेतृत्वाखालील जनसेवा पॅनेलने १७ पैकी १६ जागा जिंकून बँकेवरील सत्ता अबाधित राखण्यात यश मिळवले. विरोधकांपैकी संजय चोपडा पुन्हा एकदा अपक्ष म्हणून निवडून आले. संचालक मंडळासाठी रविवारी (४ ऑक्टोबर) ८० टक्के मतदान झाले होते. सोमवारी सकाळी वाजेपासून पटेल मंगल कार्यालयात मतमोजणीला सुुरुवात झाली. दोन उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने उर्वरित १५ जागांसाठी मतदान झाले होते. सर्वसाधारण मतदारसंघातून हस्तीमल चांदमल मुनोत...
  October 6, 09:02 AM
 • मनपाचे पाणी चोरांना हजार रुपयात अभय, अनधिकृत नळधारकांवर प्रशासन मेहेरबान
  नगर- अनेकवर्षांपासून पाण्याची चोरी करत असलेल्या शहरातील अनधिकृत नळजोडधारकांना महापालिका प्रशासनाने पुन्हा एकदा अभय दिले आहे. केवळ एक हजार रुपयांचा दंड भरून अनधिकृत नळजोड अधिकृत करा, असा फतवा प्रशासनाने काढला आहे. पाण्याची वर्षानुवर्षे चोरी करणाऱ्यांवर प्रशासने दाखवलेली ही मेहेरबानी नियमित पाणीपट्टी भरणाऱ्यांसाठी मात्र अन्यायकारक आहे. प्रशासनाच्या या चुकीच्या धोरणामुळे शहरातील अनधिकृत नळजोडांची संख्या कमी होण्याऐवजी त्यात आणखी भरच पडणार आहे. एक हजार रुपयांचा दंड भरून...
  October 6, 09:01 AM
 
जाहिरात
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
जाहिरात
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 

हास्ययात्रा