Home >> Maharashtra >> Western Maharashtra >> Ahmednagar
 • युवकांना व्यवसायासाठी कर्ज देऊ, आमदार शिवाजी कर्डिले यांचे आश्वासन
  नगर - सर्वांच्या सहकार्यामुळे शेतकऱ्यांची कामधेनू असलेल्या जिल्हा बँकेच्या संचालकपदी माझी बिनविरोध निवड होऊ शकली. बँकेच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकऱ्यांचा विकास साधण्याचा आतापर्यंत प्रयत्न केला. पुढील काळात युवकांना व्यवसाय, उद्योगासाठी बँकेकडून कर्जरूपी मदत देण्याचा प्रयत्न करेन, असे आश्वासन आमदार शिवाजी कर्डिले यांनी दिले. जिल्हा बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल कर्डिले यांचा बुऱ्हाणनगर येथे नागरी सत्कार करण्यात आला त्या वेळी सत्काराला उत्तर देताना ते...
  10:05 AM
 • नगरमध्ये रुजतेय
  नगर - शहरात दररोज जमा होणाऱ्या सुमारे सव्वाशे टन कचऱ्यापैकी केवळ ७० ते ८० टन कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते. उर्वरित ४५ ते ५५ टन कचरा तसाच पडून राहतो. त्यामुळे नगरकरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासंदर्भात महापालिका प्रशासन सत्ताधाऱ्यांनी बघ्याची भूमिका घेतली असली, तरी हरियालीसारख्या पर्यावरणप्रेमी संस्थेने मात्र नगर शहर कचरामुक्त करण्यासाठी पाऊल उचलले आहे. संस्थेच्या माध्यमातून शहरात गेल्या वर्षभरापासून शून्य कचरा संकल्पना राबवण्यात येत आहे. या संकल्पनेच्या...
  10:00 AM
 • जिल्हा बँकेच्या दोन्ही गटांचे पॅनल निश्चित, आज होणार चिन्हांचे वाटप
  नगर - जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याची खेळी फिसकटल्यानंतर आता १५ संचालक निवडण्यासाठी मे रोजी मतदान होत आहे. पारंपरिक प्रतिस्पर्धी राधाकृष्ण विखे बाळासाहेब थोरात यांचे गट या निवडणुकीत आमने-सामने आहेत. दोन्ही गटांचे पॅनल निश्चित झाले असून सोमवारी (२७ एप्रिल) चिन्हांचे वाटप होणार आहे. अर्ज माघारीच्या शेवटच्या मुदतीपर्यंत विविध कार्यकारी सेवा सोसायटी मतदारसंघातील १४ पैकी जागा बिनविरोध झाल्या. उर्वरित १५ जागांसाठी मे रोजी मतदान होणार आहे. या १५ जागांसाठी ३४ उमेदवार...
  09:55 AM
 • ..अन्यथा शिर्डी संस्थान ‘तिरुपती’कडे द्या, राज ठाकरेंची सरकारवर उपरोधिक टीका
  शिर्डी - देश-विदेशातून रोज लाखो साईभक्त शिर्डीला येत असल्यामुळे या शहराच्या विकासासाठी विकास आराखडा तयार करावा. तसेच विकासासाठी आवश्यक तितका निधी उपलब्ध करून द्यावा. हे जर राज्य सरकारला जमत नसेल तर साईबाब संस्थान तिरुपती देवस्थानच्या हवाली करावे, अशी उपरोधिक टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी राज्य सरकारवर केली. राज ठाकरे आपल्या मुलांसह हेलिकॉप्टरने रविवारी साई दर्शनासाठी आले होते. दर्शनानंतर पंधरा मिनिटे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शिर्डीला लाखो साईभक्त येत असतात,...
  06:02 AM
 • नगर - मोटारसायकली इलेक्ट्रिक मोटारी चोरून कमी किमतीत त्यांची विक्री करणारे रॅकेट स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उघडकीस अाणले. अमोल नवनाथ कणसे (दिवटे, ता. शेवगाव) गणेश काजळे (वाडेगव्हाण, ता. शेवगाव) अशी पोलिसांनी अटक केलेल्या दोन आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून एकूण लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. शेवगाव हद्दीत फरार आरोपींची शोधमोहिम सुरु असताना गुन्हे शाखेच्या पोलिसांना या रॅकेटची कुणकुण लागली. हे दोघे आरोपी मोटारसायकली इलेक्ट्रिक मोटारींची चोरी करत....
  April 26, 11:06 AM
 • जलयुक्त शिवारामुळे महाराष्ट्र हेडमास्तर बनेल - अण्णा हजारे यांचा विश्वास
  नगर - जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्र पुन्हा देशाच्या जलसंधारणचा हेडमास्तर बनेल, असा विश्वास ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शनिवारी व्यक्त केला. राळेगणसिध्दी येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. जलसंधारण रोहयो सचिव प्रभाकर देशमुख,जिल्हाधिकारी अनिल कवडे, विभागीय कृषी सहसंचालक विजय इंगळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल, सरपंच जयसिंग मापारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अंकुश माने, दिलीप देवरे,...
  April 26, 11:00 AM
 • जिल्हा बँक निवडणूक: नाराजीचा फटका राष्ट्रवादीला बसणार?
  नगर - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट झाल्यानंतर कार्यकर्ते कामाला लागले असून मतदारांशी संपर्क वाढवला जात आहे. राष्ट्रवादी आणि थोरात गटाची बाजू जड ठरेल, अशी चर्चा असली तरी राष्ट्रवादीतील काही नाराज कार्यकर्त्यांची वाढती फौज छुप्या पद्धतीने विखेंच्या गोटात सामील झाली, तर त्याचा फटका या गटाला बसू शकतो. त्यामुळे सत्तेची गणिते आखताना नाराज कार्यकर्त्यांची मनधरणी करायला सुरुवात झाली आहे. जिल्ह्याची अर्थवाहिनी असलेल्या जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणूक...
  April 26, 10:56 AM
 • नाहाटांची राजेंद्र नागवडेंवर कुरघोडी, शब्द न पाळल्याने राेखला नागवडेंचा जिल्हा बँकेत जाण्याचा मार्ग
  श्रीगोंदे - विधानसभेच्या वेळी जिल्हा बँकेची उमेदवारी नागवडे यांच्याकडे राहील, असा शब्द कुंडलिकराव जगताप यांच्याकडून नागवडे यांनी घेतला होता, तर श्रीगोंदे कारखान्याच्या निवडणुकीत बाळासाहेब नाहाटा यांना उमेदवारी देण्याचा शब्द नागवडे यांनी दिला होता. जगतापांनी दिलेला शब्द पाळण्यासाठी पिता-पुत्रांनी आपल्या उमेदवाऱ्या मागे घेतल्या. नागवडे यांनी नाहाटा यांना दिलेला शब्द पाळल्याने त्यांनी राजेंद्र नागवडे यांच्यावर कुरघोडी करून त्यांना बँकेत जाण्याचा मार्ग रोखला. श्रीगोंदे...
  April 26, 10:09 AM
 • आदित्यवर अवघड शस्त्रक्रिया यशस्वी
  शेवगाव - तालुक्यातील खरडगाव येथील कामगार भीमराज मच्छिंद्र लबडे यांचा मुलगा आदित्य (७) याच्या श्वासनलिका टॉन्सिलच्या शस्रक्रियेस येथील जनशक्ती श्रमिक संघाच्या प्रयत्नातून चाळीस हजारांची मदत मिळाली. या मदतीमुळेच आदित्यवर नेवासे येथे यशस्वी शस्रक्रिया झाली. खरडगाव येथील लबडे हे इमारत क्षेत्रातील कामगार आहेत. त्यांची अार्थिक परिस्थिती हलाखीची आहे. त्यांचा मुलगा आदित्य यास श्वासनलिका टॉन्सिलचा त्रास होता. त्यांनी अनेक रुग्णालयांत त्याच्यावर उपचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र,...
  April 26, 09:58 AM
 • नगर - महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या राज्य अधिवेशनाला शनिवारी (२५ एप्रिल) स्वस्तिक चौकातील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात सुरुवात होत आहे. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे-पालवे पालकमंत्री राम शिंदे यांच्या उपस्थितीत रविवारी अधिवेशनाचा समारोप होणार असल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष अॅड. सुभाष लांडे यांनी दिली. महासंघाचे हे दहावे राज्य अधिवेशन आहे. शनिवारी दुपारी वाजता अधिवेशनाला सुरुवात होईल. दीड वाजता तीन हजार कर्मचाऱ्यांची रॅली शहरातून काढण्यात येणार...
  April 25, 11:38 AM
 • जिल्हा बँक निवडणूक : तडजोडीच्या नावाखाली परस्परांवर कुरघोडी, सहा संचालकांची निवड
  नगर - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सत्तेच्या राजकारणात पारंपरिक विरोधक असणारे बाळासाहेब थोरात राधाकृष्ण विखे यांच्यात राखीव सात जागांवर शुक्रवारी दुपारपर्यंत तडजोड झाल्याचे निश्चित मानले जात होते. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांच्या उपस्थितीत विखे थोरात यांच्यात सुमारे दोन तास खलबत झाले. मात्र, तडजोडीच्या नावाखाली परस्परांवर कुरघोडी करण्याचाच प्रयत्न झाल्याचे अर्ज माघारीच्या शेवटच्या मुदतीनंतर स्पष्ट झाले. एका जागेवर समाधान मानत तडजोड करत असल्याचे भासवून...
  April 25, 11:34 AM
 • नगरी कलाकाराचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज होणार गौरव
  नगर - येथील प्रसिद्ध शिल्पकार चित्रकार प्रमोद कांबळे यांच्या कलाक्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी त्यांना गौरवणार आहेत. बालाजी तांबे फाउंडेशनच्या वतीने हा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मावळ तालुक्यातील आत्मसंतुलन व्हिलेज कार्ला येथील स्काय सेंटर ऑडिटोरियममध्ये हा दिमाखदार सोहळा रंगणार आहे. बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. माहिती, ज्ञान आणि नवनिर्मितीच्या माध्यमाद्वारे...
  April 25, 11:29 AM
 • कार्यकारी अभियंत्याच्या चौकशीचा पुन्हा फार्स
  नगर - नगर-कोल्हाररस्त्याचे काम अपूर्ण असतानाही पूर्णत्वाचा दाखला ठेकेदाराला बहाल करणारे तत्कालीन कार्यकारी अभियंता आर. एस. रहाणे यांची विभागीय चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश नाशिकस्थित मुख्य अभियंत्याला देण्यात आले आहेत. तक्रारदार शशिकांत चंगेडे यांची तक्रार पाठपुराव्यानंतर बांधकाम विभागाच्या कार्यासन अधिकाऱ्याकडून हे आदेश निर्गमित करण्यात आले. विशेष म्हणजे महिनाभरापूर्वीच मुख्य अभियंत्याने चौकशीचा फार्स करून रहाणे यांना क्लिन चिट देण्याचा प्रयत्न केला होता....
  April 24, 11:50 AM
 • नगर - शहरासाठी उपद्रवी ठरणारे नागरिक लहान-मोठ्या व्यावसायिकांवर नजर ठेवण्यासाठी महापालिकेचा एनडी स्क्वॉड (उपद्रव शोधपथक) तयार झाले आहे. त्यात १४ माजी सैनिकांचा समावेश असून त्यांचे दोन पथके येत्या सोमवारपासून कार्यान्वित होणार आहेत. त्यापूर्वी शुक्रवारी (२४ एप्रिल) उपायुक्त अजय चारठाणकर या माजी सैनिकांची कार्यशाळा घेणार आहेत. शहरासाठी उपद्रवी ठरणाऱ्या प्रत्येकावर दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार या पथकाला देण्यात आले आहेत. महापालिका उपायुक्त चारठाणकर यांनी नांदेड...
  April 24, 11:46 AM
 • निर्लेखन होण्यापूर्वीच नवीन वास्तूला मंंजुरी, शेंडी येथील आरोग्य केंद्राची इमारत वादात
  नगर - अकोले तालुक्यातील शेंडी येथील धोकादायक झालेल्या आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या निर्लेखनाला अधीक्षक अभियंत्यांकडून मंजुरी मिळाली नसताना तेथे नवीन इमारत बांधण्यास जिल्हा परिषदेने मंजुरी दिली. जुनी इमारत पाडल्याशिवाय नवीन कामच सुरू करता येत नाही. यासंदर्भात बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जे. एस. नागापुरे यांनी माहिती देण्यास नकार दिला. आरोग्य विभागाने निर्लेखनासाठी हा विषय सर्वसाधारण सभेसमोर ठेवला होता. त्याला सभेने मंजुरी दिली आहे. जुनी इमारत पाडण्यासाठी अधीक्षक...
  April 24, 11:41 AM
 • नगर - नगरच्या औद्योगिक प्रगतीसाठी हातभार लावण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जर्मनीतील भेटीत उद्योजकांच्या शिष्टमंडळाला दिले. जर्मनीतील हॅनोव्हर येथे भरलेल्या औद्योगिक प्रदर्शनासाठी नगरच्या आमी संघटनेच्या नेतृत्वाखाली ४५ उद्योजकांचे शिष्टमंडळ गेले होते. केंद्रीय उद्योग वाणिज्य मंत्री निर्मला सीतारामन, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची नगरच्या उद्योजकांनी भेट घेतली. नगरसारख्या औद्योगिकदृष्ट्या मागे पडलेल्या शहरातून ४५...
  April 24, 11:29 AM
 • अवघ्या सहा हजार मतदार कार्डांना आधार
  नगर - निवडणुकीत होणारे बोगस मतदान टाळण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदान आेळखपत्र आधार कार्डशी लिंक करण्याचा निर्णय घेतला अाहे. नगर जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यात अवघी सहा हजार मतदान अोळखपत्रे आधार कार्डशी लिंकिंग झाली आहेत. येत्या तीन महिन्यांत उर्वरित तब्बल ३२ लाख मतदान कार्डे आधार कार्डशी लिंक करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात बोगस मतदान होते. ते टाळण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने ठोस उपाययोजना हाती घेतल्या आहेत. बोगस...
  April 23, 10:49 AM
 • नगरमध्ये आठ दिवसांत महापौर बदल? राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याचा ठाम दावा
  नगर - महापौर बदलाच्या चर्चेने शहरातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. पक्षश्रेष्ठींकडून आदेश आला, तर आपण पदाचा राजीनामा देण्यास तयार असल्याचे आमदार तथा महापौर संग्राम जगताप यांनी यापूर्वी अनेकदा स्पष्ट केले आहे. जगताप यांच्या राजीनाम्याबाबत पक्षश्रेष्ठींकडून अद्याप काहीच आदेश नाहीत, परंतु महापौर बदलाचा निर्णय येत्या आठ दिवसांत होईल, असा दावा राष्ट्रवादीच्या एका वरिष्ठ नेत्याने दिव्य मराठीशी बोलताना केला. आमदार झाल्यावर महापौरपदाचा राजीनामा देईल, असे आश्वासन जगताप...
  April 23, 10:46 AM
 • रिलायन्स, सातपुते चौकशी अहवालांबाबत मनपा आयुक्तांचे मौन
  नगर - रिलायन्स खोदकाम, तसेच अभियंता आर. जी. सातपुते यांचे चौकशी अहवाल आयुक्त विजय कुलकर्णींच्या दालनात अनेक दिवसांपासून धूळखात पडून आहेत. दोन्ही प्रकरणांचे अंतिम चौकशी अहवाल उपायुक्तांनी अायुक्तांकडे सादर केले आहेत, परंतु आयुक्त त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. विशेष म्हणजे याप्रकरणी आंदोलनाचा इशारा देणारे नगरसेवकही आता गप्प आहेत. त्यामुळे हे चौकशी अहवाल त्याबाबतच्या आयुक्तांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रिलायन्स जीओ इन्फोकॉम कंपनीने शहरातील ३६ मार्गांवर फोर जी...
  April 23, 10:40 AM
 • लेक लाडकी अभियानाने जिल्ह्यात वाढणार मुलींची संख्या
  नगर - घसरणारा स्त्रीजन्म दर वाढवण्यासाठी दलित महिला विकास मंडळाच्या वतीने जिल्ह्यात लेक लाडकी अभियान राबवले जाणार आहे. प्रत्येक आरोग्य केंद्रातून तीन याप्रमाणे २८८ जणांना संस्थेच्या वतीने ट्रेनिंग दिले जाईल. या प्रशिक्षित व्यक्ती प्रत्येकी नऊ गावांतील ग्रामपातळीवरील आरोग्य, पोषण स्वच्छता समिती सदस्यांच्या माध्यमातून कृती आराखडा तयार करणार आहेत. मुलगी नको, या नकारात्मक भूमिकेतून गर्भाशयातच मुलींचा शोध घेऊन त्या नष्ट केल्या जातात. देशभरात दरवर्षी सहा लाख मुली गर्भपातामुळे...
  April 22, 11:43 AM
 
जाहिरात
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
जाहिरात
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 

हास्ययात्रा