Home >> Maharashtra >> Western Maharashtra >> Ahmednagar

Ahmednagar News

 • प्रेयसीच्या खुनानंतर आरोपी पोलिसांपुढे, लग्नाला नकार दिल्याने खून केल्याची कबुली
  नगर - लग्न करण्यास नकार दिल्यामुळे चिडलेल्या युवकाने अल्पवयीन युवतीचा खून केला. नंतर तो स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर झाला. आपण खून केल्याची कबुली त्याने दिली. ज्या हत्याराने त्याने खून केला, तो कोयताही त्याने पोलिसांच्या स्वाधीन केला. हा प्रकार शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास बुरुडगाव रस्त्यावरील आठरे निवास येथे घडला. प्रदीप माणिक कणसे (२४, तळिणी, ता. देनापूर, जि. लातूर) असे आरोपीचे नाव आहे. कोतवाली पोलिसांनी त्याला अटक केली. मोहिनी तान्हाजी सूर्यवंशी (१७ वर्षे) असे खून झालेल्या युवतीचे...
  May 28, 09:51 AM
 • दलित वस्त्यांची ६९ कोटींची कामे, समाजकल्याण विभाग मागवणार प्रस्ताव
  नगर - अनुसूचित जाती नवबौद्ध घटकांचा विकास करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत २०१६-२०१७ मध्ये सुमारे ६९ कोटी रुपये खर्च करण्याचे नियोजन आहे. या निधीचे सप्टेंबरपूर्वीच नियोजन करण्यासाठी गट विकास अधिकाऱ्यांना वेळापत्रक ठरवून दिले जाणार आहे. जिल्ह्यात दलित वस्त्यांची संख्या मोठी आहे. २०११ मधील शासन निर्णयानुसार लोकसंख्येच्या आधारावर दलित वस्त्या घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार २०१२ मध्ये ग्रामपंचायतीच्या शिफारशीनुसार जिल्हा समाजकल्याण...
  May 28, 09:47 AM
 • नगर -नगर शहरातील स्टेशन रस्त्यावरील प्रस्तावित उड्डाणपुलाचे भूमिपूजन जुलै किंवा ऑगस्टमध्ये करण्यात येईल. कुठल्याही परिस्थितीत हे काम त्वरित मार्गी लावण्यात येईल, अशी माहिती खासदार दिलीप गांधी यांनी गुरुवारी दिली. केंद्रातील सरकारने दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्याबद्दल भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत गांधी बोलत होते. सरचिटणीस सुनील रामदासी, नगरसेवक सुवेंद्र गांधी, माजी उपमहापौर गीतांजली काळे, जगन्नाथ निंबाळकर, गौतम दीक्षित, किशोर बोरा, बाळासाहेब पोटघन, बाबासाहेब वाकळे,...
  May 27, 09:21 AM
 • वाहनाच्या धडकेने हरीण जखमी, नगर-पुणे वळण रस्त्यावरील घटना
  नगर -नगर-पुणे बायपासवर गुरुवारी सकाळी नेप्ती उपबाजार समितीच्या कार्यालयाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेने चिंकारा जातीच्या हरणाचा प्रौढ नर जखमी झाला. त्याच्यावर उपचार करून त्याला वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले. सकाळी त्या भागात फिरायला गेलेल्या अमित शिंदे, सूरज लुणावत, शुभम जाधव, सोमनाथ भोजने, सिद्धार्थ बाहुले या निसर्गप्रेमी तरुणांना हा चिंकारा जखमी अवस्थेत पडून असलेला दिसला. त्यांनी निसर्गप्रेमी मंदार साबळे यांच्याशी संपर्क साधला. साबळे तेथे आले. त्यांनी जखमी चिंकारास नगरच्या...
  May 27, 09:17 AM
 • सदाशिव अमरापूरकर यांच्या निवासस्थानी उद्या नीलफलक
  नगर -नगरचे सुपुत्र प्रसिद्ध अभिनेते (कै.) सदाशिव अमरापूरकर यांच्या माणिक चौक येथील निवासस्थानी शनिवारी (२८ मे) नीलफलक लावण्यात येणार आहे. फलकाचा अनावरण समारंभ सकाळी १० वाजता होणार असल्याची माहिती रसिक ग्रूपचे अध्यक्ष जयंत येलूलकर यांनी गुरुवारी दिली. नगर शहराच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले अाहे. जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्या हस्ते नीलफलकाचे अनावरण करण्यात येईल. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी आमदार संग्राम जगताप असतील. यावेळी महापालिका स्थायी...
  May 27, 09:09 AM
 • प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून देशात सर्वाधिक कर्जवाटप नगर जिल्ह्यात
  नगर -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या पंतप्रधान मुद्रा बँक योजनेतून देशात सर्वात जास्त कर्जाचे वाटप नगर जिल्ह्यात झाले अाहे. जिल्ह्यातील २० हजार लाभार्थींना आतापर्यंत २०० कोटींचे कर्ज या योजनेतून वाटण्यात अाले आहे. महाराष्ट्रातच नव्हे, तर देशात मुद्रा योजनेतून सर्वाधिक कर्जवाटपात नगर जिल्हा अव्वल ठरला आहे. भाजपने मोदींच्या नेतृत्वाखाली सत्ता स्थापन केल्यानंतर या सरकारने अनेक योजना सुरू केल्या. त्यातील पंतप्रधान मुद्रा बँक योजना प्रमुख आहे. वाढती...
  May 26, 10:16 AM
 • सावित्रीच्या लेकींचीच पुन्हा बारावीत आघाडी
  नगर -राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत जिल्ह्यातील नियमित विद्यार्थ्यांपैकी ८७.१२ टक्के उत्तीर्ण झाले. नेहमीप्रमाणे निकालावर मुलींचा वरचष्मा आहे. नियमित परीक्षार्थींमध्ये उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ८३.३६ टक्के, तर मुलींची टक्केवारी ९२.४६ टक्के आहे. मुलांच्या तुलनेत तब्बल टक्के अधिक मुलींनी या परीक्षेत बाजी मारली. उत्तीर्ण मुलांच्या टक्केवारीत जिल्ह्यात कर्जत तालुक्याने अव्वल स्थान पटकावले. नियमित...
  May 26, 10:12 AM
 • ५२६ व्या शहर स्थापना दिनानिमित्त एेतिहासिक वास्तूंचे चित्रप्रदर्शन
  नगर -शहराच्या ५२६ व्या स्थापना दिनानिमित्त चित्रकार योगेश हराळे अहमदनगर प्रेस क्लबच्या वतीने एेतिहासिक वास्तूंचे चित्रप्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. २८ २९ मे रोजी सकाळी १० ते रात्री पर्यंत सावेडीतील रावसाहेब पटवर्धन स्मारकामध्ये हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असेल, अशी माहिती प्रेस क्लबचे प्रभारी अध्यक्ष मन्सूर शेख चित्रकार हराळे यांनी बुधवारी दिली. या प्रदर्शनाचे उदघाटन २८ रोजी सकाळी साडेअकरा वाजता जिल्हाधिकारी अनिल कवडे, बद्रिनाथ तनपुरे महाराज, आमदार अरुण जगताप संग्राम जगताप,...
  May 26, 10:02 AM
 • वर्षभरात २१ हजार श्वानदंशाच्या घटना; पालिका, ग्रामपंचायती, जिल्हा परिषद सुस्त
  नगर -जिल्ह्यातील ग्रामीण भागात वर्षभरात २१ हजार श्वानदंशाच्या घटना घडल्याची नोंद जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे आहे. नगर शहरातही मोकाट कुत्र्यांचा ताप वाढला आहे. यापार्श्वभूमीवर मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याचे आव्हान सर्वच ग्रामपंचायतींसह नगरपालिका महापालिकांसमोर आहे. जिल्ह्यात मोकाट कुत्र्यांचा वाढता उपद्रव लहान बालकांसह वृद्धांची डोकेदुखी वाढवणारा आहे. जिल्ह्यात कोणत्याही ग्रामपंचायतीकडे कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची यंत्रणा नाही. शहरी भागात ज्या नगरपालिका,...
  May 25, 10:31 AM
 • जिल्ह्यातील दहा पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या
  नगर -महाराष्ट्र पोलिस दलातील पोलिस निरीक्षक सहायक पोलिस निरीक्षकांच्या सार्वत्रिक बदल्यांचा अादेश मंगळवारी दुपारी निघाला. राज्यातील एकूण ३६८ पोलिस निरीक्षक ४०० सहायक पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांचा आदेश जारी करण्यात आला आहे. यामध्ये नगर जिल्ह्यातील पोलिस निरीक्षक सहायक निरीक्षकांचा समावेश आहे. चार पोलिस निरीक्षक जिल्ह्यात नव्याने बदलून आले आहेत. जिल्ह्यातील महामार्ग पोलिस दलाचे निरीक्षक राजेंद्र मायणे यांची ठाणे शहरात, सुरेश बेंद्रे यांची विशेष सुरक्षा विभागात, संपत भोसले...
  May 25, 10:25 AM
 • ६४ जोडप्यांना प्रत्येकी ५० हजाराचे धनादेश
  नगर -सरकारने जातिभेद नष्ट करण्यासाठी सुरू केलेल्या प्रोत्साहन अनुदान देण्याच्या योजनेंतर्गत अांतरजातीय विवाह करणाऱ्या ६४ जोडप्यांना जिल्हा परिषदेत मंगळवारी प्रतिजोडपे ५० हजारांचे धनादेश देऊन गौरवण्यात आले. सदृढ अपंग व्यक्तींच्या जोडप्यांनाही ५० हजारांचे धनादेश वितरीत करण्यात आले. समाजातील जातीभेद कमी होऊन सर्व घटकांनी एकोप्याने राहावे, या उद्देशाने १९५८ पासून आंतरजातीय विवाहितांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याची योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत अनुसूचित जाती,...
  May 25, 10:20 AM
 • महापौरांचा स्वीय सहायक बाबू चोरडिया 'लाचलुचपत'च्या जाळ्यात
  नगर -महापौर अभिषेक कळमकर यांचा प्रभारी स्वीय सहायक सोहनलाल ऊर्फ बाबू सुखलाल चोरडिया याला हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास केली. महापालिकेतील महिला बालकल्याण सभापतींच्या कक्षातच चोरडियाने लाच घेतली. प्रभाग १२ मधील नगरसेविका कलावती शेळके यांच्या मुलाने याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. प्रभागातील विजेच्या खांबाच्या विकास भार निधीबाबत चोरडियाने लाच...
  May 24, 09:31 AM
 • पदवीधरसाठी भाजपकडून भानुदास बेरड यांचे नाव?
  नगर -नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांचे नाव पुढे आले आहे. कोअर कमेटीच्या बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे समजते.जानेवारी-फेब्रुवारीत नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होणार आहे. त्यासाठी आतापासून भाजपसह अन्य प्रमुख पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. या निवडणुकीची तारीख अद्याप निश्चित झाली नसली, तरी पूर्वतयारी म्हणून भाजपने बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. केंद्रात राज्यात भाजपची...
  May 24, 09:27 AM
 • बेलापूर-परळी रेल्वेमार्गाला गती द्या, आमदार मुरकुटे यांची रेल्वेमंत्री प्रभूंकडे मागणी
  नेवासे -आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेऊन बेलापूर-परळी रेल्वेमार्गाच्या कामाला गती देऊन तो मार्गी लावण्याची मागणी केली. आमदार मुरकुटे यांनी मुंबईत मंत्री प्रभू यांची भेट घेऊन याप्रश्नी चर्चा करून यासंदर्भात निवेदन दिले. श्रीरामपूर-नेवासे-शेवगाव, गेवराई-बीड या रेल्वेमार्गांचा सर्व्हे झाला आहे. त्यासाठी संपादित केलेल्या जमिनींचा मोबदला संबंधितांना देण्यात आलेला आहे. या मार्गावर अनेक ठिकाणी रेल्वेमार्गाचे भराव देखील टाकण्यात आले आहेत....
  May 24, 09:21 AM
 • ऊस उत्पादकांना ३१ मेपूर्वी अदा करणार २५ कोटी : राजेंद्र नागवडे
  श्रीगोंदे -चालू वर्षाच्या गाळप हंगामात नागवडे कारखान्याने लाख ६४ हजार ६५७ मे. टन उसाचे गाळप केले. रास्त वाजवी दर किमतीपोटी ४०१.३१ रुपये प्रतिटनाप्रमाणे होणारी एकूण रक्कम २५ कोटी ६६ लाख रुपये ऊस उत्पादकांच्या बँक खात्यावर ३१ मे पूर्वी वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी दिली. या संदर्भात बोलताना नागवडे म्हणाले, साखर निर्यात अनुदानाची केंद्र सरकारकडून मिळणारी प्रतिटन ४५ रुपयेप्रमाणे होणारी एकूण रक्कम दोन कोटी ५४ लाख रुपये सरकार ऊस...
  May 24, 09:15 AM
 • आपण पाहिले नसतील शिर्डीच्‍या साईबाबांचे हे सर्वात दुर्मिळ 20 फोटो
  अहमदनगर -उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये शिर्डीच्या साईबाबा मंदिरात भाविकांची गर्दी वाढत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन यांनी शुक्रवारी शिर्डीमध्ये साईबाबांच्या चरणी माथा टेकवला. अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी हे आधुनिक भारतातील तीर्थक्षेत्र बनले आहे. साईबाबांच्या वास्तव्याने पावन झालेल्या या संतनगरीत देश-विदेशातून दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक येत असतात. या संग्रहात आम्ही आपल्याला संत साईबाबांचे काही दुर्मिळ फोटो दाखवत आहोत. जे याआधी आपण पाहिले नसतील....
  May 23, 09:32 PM
 • अहमदनगरचा वाढदिवस
  अहमदनगर, प्रेमानं ज्याला आपण नगर म्हणतो, त्या शहराचा ५२६ वा वाढदिवस येत्या २८ मे रोजी साजरा होत आहे. नगरच्या संस्थापकानं जहांगीरखानाविरूद्ध निर्णायक लढाई जिंकली, तो दिवस होता २८ मे १४९०. सध्या जिथं किल्ला उभा आहे, तिथे ही जंग-ए-बाग लढाई झाली. या शहराच्या स्थापनेची ती मुहूर्तमेढ! पुढे मुख्यालय म्हणून हे ठिकाण बादशहानं मुक्रर केलं आणि १४९४ मध्ये ही राजधानी उभी राहिली. सव्वापाचशे वर्षांच्या वाटचालीचे साक्षीदार असलेल्या अनेक वास्तू आजही शहर आणि परिसरात उभ्या आहेत. तथापि, या वास्तूंचं...
  May 23, 09:13 AM
 • कांदा उत्पादकांची दिल्लीगेटजवळ निदर्शने
  नगर -जिल्ह्यात भीषण दुष्काळी परिस्थिती असताना, थोड्या फार पाण्यावर घेतलेल्या कांद्याला कवडीमोल बाजार भाव मिळत असल्याने संतप्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी रविवारी सकाळी दिल्लीगेट वेशीला काद्यांचा फास लटकवून आक्रोश आंदोलन केले. या वेळी उपस्थित कांदा उत्पादक शेतकऱ्यांंनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून जोरदार निदर्शने केली. केंद्र सरकारने कांदा निर्यातीचा निर्णय घेऊन त्याची तातडीने अंमलबजावणी करावी, राज्यसरकारने एकाधिकार पद्धतीने कांदा खरेदी करून तो निर्यात करावा कांदा चाळीसाठी...
  May 23, 09:10 AM
 • महापौर निवडणूक: युती-आघाडीचे पारडे सध्या तरी समानच...
  नगर -पुढील महिन्यात होणारी महापौरपदाची निवडणूक चांगलीच अटीतटीची रंगतदार हाेणार आहे. युती आघाडीकडे समान संख्याबळ आहे. त्यामुळे त्यांची सर्व भिस्त बंडखोर मनसे नगरसेवकांवरच आहे. युतीला गटबाजीची, तर आघाडीला नाराजीची मोठी भीती आहे. त्यामुळे संख्याबळ समान असले, तरी ऐनवेळी समीकरणे बदलण्यात कोण बाजी मारणार याविषयी उत्सुकता आहे. उघडपणे बंडखोरी केलेले तीन मनसेचे तीन अशा सहा मतांचा विचार करता युती आघाडीकडे सध्यातरी ३४-३४ असे समान संख्याबळ आहे. राष्ट्रवादीचे बाळासाहेब बोराटे, काँग्रेसचे संजय...
  May 23, 09:01 AM
 • नगर -तेराव्या वित्त आयोगातील किती निधी पाणी योजनांची बिले भरण्यासाठी खर्च झाला, तसेच हा निधी विकासकामांसाठी पुन्हा भरला किंवा नाही, याची माहिती अद्याप जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाला मिळालेली नाही. हा प्रकार अनियमितता लपवण्याचा असल्याचीही चर्चा जिल्हा परिषदेत सुरू झाली आहे. जिल्ह्यातील पाणी योजना चालवल्या जात असताना नागरिकांकडून वसूल होणाऱ्या पाणीपट्टीच्या रकमेतून योजनेच्या दुरुस्ती देखभालीसह वीजबिलाचा खर्च केला जातो. तेराव्या वित्त आयोगातून ग्रामीण विकासासाठी...
  May 23, 08:59 AM
 
जाहिरात
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
जाहिरात
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 

हास्ययात्रा