May 21, 11:04
नगर - मान्सून जवळ आला आहे, असे सांगणार्या ढगांनी सोमवारी आकाशात गर्दी केली होती, पण पाऊस काही झाला नाही. दिवसभर आकाश अभ्राच्छादित होते.
नगरसह राज्यातील शेतकर्यांचे डोळे आता आकाशाकडे लागले आहेत. मागील काही दिवसांत श्रीरामपूर, संगमनेर या भागात वळवाचा पाऊस झाला. नगर शहरातही पावसाळी वातावरण तयार होते, पण पाऊस गुंगारा देतो.
नैऋत्य मान्सूनचे शुक्रवारी अंदमान आणि बंगालच्या...