Home >> Maharashtra >> Western Maharashtra >> Ahmednagar

Ahmednagar News

 • 2853 शौचालये बांधूनही नगर राहिले अस्वच्छच... 5 कोटींच्या खर्चावर प्रश्नचिन्हं
  नगर- स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशातील ४३४ शहरांमधून नगर शहराला १८३ वा, तर राज्यातील ४४ शहरांमधून २२ वा क्रमांक मिळाला. शहर हगणदारीमुक्त झाल्याचे कागदोपत्री दाखवण्यात आले, प्रत्यक्षात मात्र शहराच्या विविध भागात नागरिक उघड्यावर शौचास बसतात. अभियानांतर्गत शहरात सुमारे पाच कोटी खर्च करून दोन हजार ८५३ शौचालये बांधण्यात आले, तरीही शहराच्या विविध भागात उघड्यावर शौचास बसण्याचे प्रकार सुरूच आहेत. यावरून महापालिकेचे स्वच्छता अभियान केवळ कागदोपत्री असल्याचे स्पष्ट झाले. मोठा...
  11:04 AM
 • स्वाइन फ्लूसदृश आजाराने राजेंद्र भंडारी यांचा मृत्यू
  कुकाणे - येथील व्यापारी शेतकरी संघटनेचे नेते राजेंद्र हरचंद भंडारी (५८) यांचा मंगळवारी स्वाइन फ्लूसदृश आजाराने मृत्यू झाला. त्यांच्यावर आॅगस्टपासून सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मंगळवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी, तीन भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. हवामानातील बदलामुळे तालुक्यात विविध आजारांनी नागरिक त्रस्त आहेत. खासगी दवाखाने रुग्णांनी भरले आहेत. काही खासगी दवाखान्यांत नेमका काय आजार झाला आहे, याची माहिती रुग्णांना लवकर देण्यात...
  10:58 AM
 • शेवगाव हत्याकांडातील संशयित आरोपीची आत्महत्या, नेवासे पोलिस स्टेशनच्या कोठडीत घेतला गळफास
  अहमदनगर - शेवगाव येथे एकाच कुटुंबातील चौघांची हत्या केल्याच्या प्रकरणात अटकेत असलेल्या संशयित आरोपीने नेवासे पोलीस ठाण्याच्या कोठडीत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अमोल उर्फ ईश्वर पिंपळे असे आरोपीचे नाव आहे. पिंपळे याने नेवासे हद्दीत काही घरफोड्या केल्याचे पोलिसांचे म्हणणे होते, त्यामुळे त्याला घरफोडीच्या गुन्ह्यात वर्ग करून घेतलेले होते. मंगळवारी मध्यरात्री किंवा बुधवारी पहाटे त्याने टॉवेलने गळफास घेऊन आत्महत्या केली. विशेष म्हणजे ज्या बराकीत पिंपळेला ठेवलेले होते, तेथे...
  08:35 AM
 • संभाजीराजे देणार मृत हर्षदच्या कुटुंबास लाखाची मदत, मुंबई मोर्चाहुन परतताना झाला होता अपघात
  ओतूर- मुंबई मराठा क्रांती मोर्चाहून परतत असताना अपघातात दगावलेल्या रोहोकडी येथील हर्षद घोलप याच्या कुटुंबीयांची छत्रपती संभाजी राजेंनी प्रत्यक्ष भेट घेऊन सांत्वन केले. छत्रपती संभाजी राजेंनी सांत्वन करतानाच वैयक्तिक एक लाख रुपये मदतीचे आश्वासन दिले. तसेच मुंबई मराठा क्रांती मोर्चातील या सर्व अपघातात मृत्यू पावलेल्या तरुणांच्या कुटुंबीयांना सरकारकडून प्रत्येकी दोन लाख रुपये मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन यावेळी दिले. मृत हर्षदच्या कुटुंबाची...
  August 22, 10:41 AM
 • नवोदय रुग्णालयावरील कारवाई दरम्यान मनपा कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की
  नगर- जीवामहाले (प्रेमदान चौक)चौकातील नवोदय रुग्णालयाचे बेकायदा बांधकाम पाडण्यासाठी गेलेल्या महापालिका कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की शिवीगाळ करण्याचा प्रकार सोमवारी दुपारी घडला. त्यामुळे कारवाईसाठी गेलेल्या संतप्त कर्मचाऱ्यांनी रुग्णालयासमोरच ठिय्या दिला. रुग्णालयाचा परवाना रद्द करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी या कर्मचाऱ्यांनी केली. आयुक्त घन:श्याम मंगळे यांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान, धक्काबुक्की शिवीगाळ करणाऱ्या...
  August 22, 10:37 AM
 • नगरकरांसाठी गुरुवारपासून खुले होणार मूळ विशाल गणेशाचे दर्शन
  नगर- शहराचे ग्रामदैवत असलेल्या विशाल गणेश मंदिराचा गाभारा २६ महिन्यांनंतर उघडला जाणार आहे. त्यामुळे विशाल गणेशाचे दर्शन गुरुवारपासून (२४ ऑगस्ट) सर्वांना खुले होणार आहे. त्यासाठी २२ ते २४ ऑगस्ट दरम्यान धार्मिक विधी प्राण प्रतिष्ठा सोहळा होणार आहे, अशी माहिती माळीवाडा पंचमंडळ धर्मफंडचे अध्यक्ष अॅड. अभय आगरकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. या सोहळ्याबद्दल माहिती देताना आगरकर म्हणाले, की साडे नऊ कोटींचा खर्च करून मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. मंदिराच्या आत बाहेर शुभ्र...
  August 22, 10:34 AM
 • एकमेकांना आधार देत नदी ओलांडणार वृध्द गेले वाहून, त्यानंतर घडले असे काही
  अहमदनगर- नेवासा तालुक्यातील एका गावात नदी ओलांडणारे 2 वृध्द गावकऱ्यांच्या नजरेसमोर वाहून गेले. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. दोन साहसी युवकांनी या वृध्दांना वाचवले आहे. पोलिस काय म्हणाले - भेंडे गावात हे दोघे वृध्द राहतात. ते जेव्हा नदीकिनारी आले. त्यावेळी नदीला पूर आला होता. - गावकऱ्यांनी त्यांना नदीच्या पाण्यात न उतरण्याचा सल्ला दिला पण त्यांनी ऐकले नाही. - ते नदीत थोड्याच अंतरावर गेल्यावर वाहून जाऊ लागले. एकमेकांना वाचविण्याचा ते प्रयत्न करत होते. - त्यानंतर दोन...
  August 21, 09:40 PM
 • भुईकोट किल्ला विकासाचा आराखडा तत्काळ सादर करा, पर्यटनमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश
  नगर- ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याच्या सुशोभिकरण विकासाचा आराखडात पंधरा दिवसांत सादर करा, सरंक्षण, राज्याचा पर्यटन विभाग जिल्हा प्रशासनाने संयुक्तपणे हा आराखडा सादर करावा, असे आदेश पर्यटन रोजगार हमी मंत्री जयकुमार रावल यांनी जिल्हाधिकारी अभय महाजन यांना रविवारी दिले. साईशताब्दी आराखड्यात नगरच्या पर्यटन विकासाला स्थान देण्याचे संकेतही रावल यांनी दिले. ऐतिहासिक भुईकोट िकल्ल्याला मंत्री रावल यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी खासदार दिलीप गांधी, जिल्हाधिकारी अभय महाजन,...
  August 21, 10:37 AM
 • धनगर समाजास अनुसूचित जमातीचे अारक्षण देणारच, पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांचे आश्वासन
  जामखेड- भाजप सरकारच्या माध्यमातून धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळणार म्हणजे मिळणारच असा ठाम विश्वास राज्याचे पर्यटनमंत्री जयप्रकाश रावल यांनी व्यक्त केला. तसेच सोलापूर विद्यापीठास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यासंदर्भात कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २२२ व्या पुण्यतिथीनिमित्त तालुक्यातील चोंडी येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री प्रा. राम शिंदे, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे,...
  August 21, 10:32 AM
 • नगर जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी; खरिपाला जीवदान, रब्बीची पायाभरणी
  नगर- सुमारे दीड महिन्याहून अधिक काळ दडी मारलेला पाऊस महाराष्ट्रात परतला असून दोन दिवसांत राज्यातील बहुतांश भागांत चांगला पाऊस झाला. विशेषत: नगर तसेच मराठवाड्यात रविवारी चालू हंगामातील चांगला पाऊस झाल्याने अनेक भागांत पिकांना आधार झाला आहे. नगर शहर तसेच जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात रविवारी चांगला पाऊस झाला. जिल्ह्यात सरासरी ४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. संततधार पावसामुळे ढोरजळगावशे येथे घराची भिंत कोसळून गोपाळ लक्ष्मण देशमुख (६५) या वृध्दाचा मृत्यू झाला. पावसामुळे जिल्ह्यातील...
  August 21, 10:24 AM
 • दंडात्मक कारवाई करा, पण बांधकामे पाडू नका; डॉक्टरांची मागणी
  नगर- शहरातील रुग्णालयांवर सुरू असलेली महापालिकेची कारवाई चुकीची आहे. रुग्णालयांची बांधकामे पाडावीत, असे न्यायालयाच्या आदेशात कोठेही म्हटलेले नाही. अनियमित बांधकामे नियमित करण्याचे अधिकार आयुक्तांना आहेत. आयुक्तांनी दंडात्मक करावाई करून बांधकामे नियमित करावीत, तसा अहवाल न्यायालयासमोर सादर करणे आवश्यक आहे, असे मत डॉक्टर संघटनेने दैनिक दिव्य मराठीकडे शनिवारी व्यक्त केले. न्यायालयाच्या आदेशानुसार शहरातील पार्किंगखाऊ रुग्णालयांवर महापालिकेने कारवाई सुरू केली आहे. पहिल्या...
  August 20, 11:40 AM
 • लोणी मावळा बलात्कार खटल्यात अंतिम युक्तिवाद सुरू
  नगर- लोणी मावळा (ता. पारनेर) येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिचा खून केल्याच्या खटल्यात सरकार पक्षाचा अंतिम युक्तिवाद सुरू झाला आहे. ऑगस्ट २०१४ मध्ये शाळकरी मुलीवर तिघा नराधमांनी बलात्कार करुन तिचा खून केला. या खटल्याची सुनावणी जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्यासमोर सुरू आहे. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी सव्वादोन तास युक्तिवाद केला. या खटल्यात सरकार पक्षाने एकूण ३२ साक्षीदार तपासले आहेत. घटनाक्रम पाहणारे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसले,...
  August 19, 12:17 PM
 • जिल्ह्यात या वर्षी धान्याचे उत्पादन 70 टक्के घटणार, दरही कडाडण्याची भीती
  नगर- खरिपाच्या काळात पावसाने दडी मारल्याने यंदा जिल्ह्यातील अन्नधान्याचे उत्पादन ७० टक्क्यांनी घटण्याची शक्यता आहे. पावसाअभावी बाजरीसह मूग, उडीद, तूर, सोयाबीन, मका, भुईमूग या पिकांची वाढ खुंटली असल्याचे कृषी विभागाच्या अहवालात म्हटले आहे. उत्पादन घटणार असल्यामुळे अन्नधान्याच्या किमतीत वाढ होण्याचीही शक्यता आहे. यंदा तब्बल लाख ११ हजार ६६५ हेक्टर क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या झाल्या. तथापि, आता उभी पिके जळू लागल्याने शेतकऱ्यांच्या संकटात भर पडली आहे. जिल्ह्यात जूनच्या पहिल्या...
  August 19, 12:10 PM
 • शिर्डीत कॅसिनाेवर छापा; 24 ताब्यात, 9 लाख जप्त, हायटेक जुगार
  शिर्डी - जगभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या व सध्या अागामी अागामी साईबाबा शताब्दी महाेत्सवाची तयारी सुरू असलेल्या शिर्डीत अवैध धंद्यांनीही कळस गाठला अाहे. हत्या, भाविकांची लूटमार, साई भक्तनिवासात कुलपे ताेडून हाेणाऱ्या चाेऱ्या, यात भरीस भर म्हणून गाेव्याच्या धर्तीवर तेथे अाॅनलाइन कॅसिनाेच्या रूपाने जुगारही सुरू झाले अाहेत. त्याची माहिती मिळताच शहरातील वेगवेगळ्या ठिकाणच्या ऑनलाइन कॅसिनाे अड्ड्यांवर शिर्डी पोलिसांनी गुरुवारी सायंकाळनंतर छापे टाकून नऊ लाख ४५ हजार...
  August 19, 07:44 AM
 • निळवंडेसाठी राधाकृष्ण विखेंना एक रुपयाही मिळवता आला नाही, आमदार तांबे यांची टीका
  संगमनेर- तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात आणि मधुकर पिचड या दोघांच्या प्रयत्नांतून निळवंडे धरणाची निर्मिती झाली. अन्य कोणत्याही नेत्याचे यात योगदान नाही. योगदान देणाऱ्यांनी शिर्डी संस्थानच्या पाचशे कोटींच्या घाेषणेच्यावेळी केवळ प्रसिद्धी आणि खोट्या श्रेयासाठी मुख्यमंत्र्यांसमवेत फोटो काढले. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांना अद्याप एक रुपयाही धरणासाठी मिळवता आला नाही. त्यांचे धरण आणि कालव्यांसाठी योगदान काय, असा प्रश्न करत आमदार थोरात यांच्यावरील आरोप म्हणजे...
  August 18, 11:33 AM
 • घरकुल योजनेंतर्गत झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या 693 कुटुंबांना हक्काचे घर
  नगर- महापालिकेने राबवलेल्या घरकुल प्रकल्पांतर्गत ६९३ कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात आले. कोठी रस्ता, मणियार झोपडपट्टी, पंचशीलवाडी, इंद्रानगर, माळीवाडा आदी ठिकाणच्या झोपडपट्ट्यांमधील ही कुटुंबे आता या घरकुलांमध्ये रहायला गेली आहेत. प्रत्येक कुटुंबाला २६९ चौरस फुटांचे हक्काचे घर मिळाले आहे. माजी महापौर शिला शिंदे यांच्या कार्यकाळातील हा सर्वात महत्त्वाचा प्रकल्प होता. त्यांनी पुढाकार घेतल्याने हा प्रकल्प मार्गी लागून सातशे कुटुंबांच्या घरांची स्वप्नपूर्ती झाली. केंद्र राज्य...
  August 18, 11:26 AM
 • काेपर्डी खटला सुरू असताना मराठा मोर्चाला परवानगी कशी? आरोपीच्‍या वकीलांचा कोर्टात अर्ज
  नाशिक/ नगर - कोपर्डी प्रकरणाचा खटला अहमदनगर सत्र न्यायालयात सुरू असताना, त्यातील संशयित आरोपींना फाशी द्यावी या प्रमुख मागणीसाठी ९ ऑगस्ट रोजी मुंबईत निघालेल्या मराठा क्रांती मोर्चाला परवानगी दिली कशी? याबाबतची कारणे दाखवा नोटीस राज्याचे गृह सचिव आणि पोलिस महासंचालक यांना काढण्यात यावी या मागणीचा अर्ज या प्रकरणातील आरोपी नितीन भैलुमेचे वकिलांनी गुरुवारी नगरच्या सत्र न्यायालयात केला. त्यावर ३० ऑगस्ट रोजी सरकारी पक्ष न्यायालयात म्हणणे मांडणार आहे, अशी माहिती विशेष सरकारी वकील अॅड....
  August 18, 05:58 AM
 • बलात्काराचा गुन्हा दाखल असलेल्या मामाने केला भाचीच्या 5 वर्षीय चिमुकलीवर आत्याचार
  श्रीगोंदे- मामाने भाचीच्या पाच वर्षांच्या मुलीला खाऊसाठी पैशाचे आमिष देऊन अपहरण केले. नंतर या बालिकेवर अत्याचार केला. याप्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपीस गजाआड केले. ऑगस्टला अपहरणाची घटना घडली. १० ऑगस्टला फिर्यादी महिलेचा मामा असलेल्या ४० वर्षांच्या आरोपीच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीचा शोध घेण्यासाठी दोन पोलीस पथके तातडीने रवाना करण्यात आली. आरोपी अनेक दिवसांपूर्वी शिरूर...
  August 17, 10:06 AM
 • संकटात सापडलेल्या महिला, मुलींना आता तत्काळ मदत
  नगर- महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण वाढत असताना दिलासा कक्षाच्या माध्यमातून आता त्यांच्या अडचणींवर मात करता येईल. गुन्ह्यांचे स्वरुप बदलत असताना पोलिसांचा तपासही आधुनिक पद्धतीने होणे गरजेचे आहे. त्यासाठी सायबर पोलीस ठाण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी केले. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील सायबर पोलीस ठाणे, तसेच दिलासा सेलचे (वन स्टॉप सेंटर) उदघाटन करताना ते बोलत होते. यावेळी महापौर सुरेखा कदम, जिल्हाधिकारी अभय महाजन, जिल्हा पोलीस अधीक्षक...
  August 17, 09:56 AM
 • शिर्डीजवळच्या कॅनोलमध्ये तरंगत होता महिलेचा मृतदेह, पतीने सांगितले हे कारण...
  अहमदनगर - नगर-औरंगाबाद रोडवर घोडगावात असलेल्या मुळा कालव्यात बुधवारी स्थानिकांनी एका महिलेचा तरंगता मृतदेह पाहिला. डेड बॉडी पाहून स्थानिकांची भंबेरी उडाली. त्यांनी वेळीच पोलिसांना घटनास्थळी बोलावले. त्यानंतर संबंधित महिलेचे नाव अश्विनी अजय मुळे (वय 22, पुणे) असल्याचे समोर आले. 48 तासांपूर्वी तिने आपल्या पतीसोबत साई दर्शन घेतले होते. तेथूनतच परत येत असताना कॅनॉलजवळ तिचा पाय घसरला असा दावा पतीने केला आहे. पीडितेचा पती म्हणाला... - अश्विनी गृहिणी असून तिचा पती अजय जिममध्ये इस्ट्रक्टर...
  August 17, 09:18 AM
 
जाहिरात
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
जाहिरात
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 

हास्ययात्रा