Home >> Mukt Vyaspith

Mukt Vyaspith

 • शिक्षणासोबत उद्योजकतेचेही मार्गदर्शन हवे
  भारताच्या स्टार्टअप इकोसिस्टिमची मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे. याबाबतीत भारताचे स्थान जगातील तीन अग्रणी देशांमध्ये आहे. पण देशात मोजक्याच संस्थांमध्ये उद्योजकतेचा अभ्यासक्रम आहे, ही मूळ समस्या आहे. देशातील ७७ विद्यापीठांमध्ये उद्योजकतेचे अभ्यासक्रम आहेत. यातील बहुतांश अभ्यासक्रम आयआयटी, आयआयएमसारख्या बड्या संस्थांमध्येच आहेत. स्टार्टअप सुरू करणाऱ्या भारतीयांचा विचार केल्यास, यापैकी बहुतांश बड्या संस्थांमधील पदवीधर विद्यार्थी आहेत. शहरी आणि ग्रामीण परिसरातील अनेक...
  January 25, 03:00 AM
 • जागतिकीकरणाच्या अंतास सुरुवात
  डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची शपथ घेतली आहे. आजवर राजकारणात कधीही सहभागी न झालेल्या ट्रम्प यांचा हिलरी क्लिंटन यांच्यावर विजय हा इतिहासात एक अनपेक्षित धक्का म्हणून गणला जाईल. अनपेक्षित का? ट्रम्प यांनी केवळ डेमोक्रेटिक पार्टीचाच नव्हे तर रिपब्लिकन पार्टीला तीव्र विरोध केला, म्हणूनच ते विजयी झाले. एका अर्थाने त्यांनी राजकारणातील मुख्य प्रवाहाच्या विरोधात जाऊन निवडणूक जिंकली आहे. १९८० मध्ये राष्ट्राध्यक्ष रेगन यांच्या कार्यकाळापासून रिपब्लिकन आणि डेमोक्रेटिक...
  January 24, 03:00 AM
 • झायराची माघार देशासाठी अपमानास्पद
  १६ वर्षांची काश्मिरी कन्या मोठ्या मुश्किलीने आई-वडिलांची परवानगी मिळवते आणि ऑडिशन दिल्यानंतर दंगल चित्रपटात काम करण्यासाठी निवडली जाते. उत्तम अभिनयाच्या जोरावर तरुणांसाठी आदर्शही ठरते. परंतु एक दिवस अचानक फेसबुकवर मिळालेल्या धमक्यांसमोर माघार घेते. सार्वजनिकरीत्या माफी मागते व म्हणते, मला रोल मॉडेल वगैरे बनायचे नाही. मी कुणासाठीही आदर्श नाही, कुणीही माझे अनुकरण करू नये. अशा प्रकारचे वक्तव्य करताच झायरावर चहुबाजूंनी टीका सुरू होते. कुणीही १६ वर्षांच्या या अल्पवयीन मुलीच्या मनात...
  January 23, 03:00 AM
 • ई-कॉमर्स कंपन्यांमुळे रिटेल क्षेत्राचे नुकसान
  मागील काही दशकांपासून शॉपिंग मॉलच्या कोपऱ्यावरील जागेवर डिपार्टमेंटल स्टोअर्स असत. अमेरिकेतील मेसिजसारख्या चेन स्टोअर्सची यात भरभराट झाली. मात्र आता ट्रेंड बदलत आहे. एकेकाळी आधार असलेले हे स्टोअर्स आता मॉलसाठी ओझे बनत आहेत. ई-कॉमर्स कंपन्या आणि टीजे मॅक्ससारख्या डिस्काउंट स्टोअर्सचा यांना चांगलाच फटका बसत आहे. रिटेल क्षेत्रात हा बदल झपाट्याने होत आहे. त्यामुळे बड्या रिटेल कंपन्यांनी सावध होण्याची ही वेळ आहे. मेसिज स्टोअर सध्या कमी खर्चात कपात करत आहे. सिअर्स बोल्डिंग्स हा रिटेल...
  January 10, 03:11 AM
 • निवडणूक हॅकिंग : गुप्तचर यंत्रणेचे अपयश
  रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी अमेरिकेतील अध्यक्षपदाच्या निवडणुका हॅक करून त्या प्रभावित केल्याचा आरोप अमेरिकेतील संरक्षण संस्थांनी केला आहे. यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. सर्वात गंभीर प्रश्न म्हणजे हॅकिंग होत असताना संरक्षण संस्थांना कळले कसे नाही? दुसरा प्रश्न म्हणजे ओबामा प्रशासनाने उत्तर देण्यासाठी १६ महिन्यांचा कालावधी का घेतला? संरक्षण संस्थांनी नुकत्याच दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, संस्था अजूनही यावर काम करत आहेत. यात डिजिटल प्रणालीचा संघर्षही...
  January 10, 03:10 AM
 • नव्या वर्षात असाही संकल्प करता येईल...
  २०१६ या वर्षखेरीस विमुद्रीकरणाच्या पार्श्वभूमीवर अनेक घडामोडी घडल्या. वैयक्तिक आयुष्यातही आपण काही गोष्टी गमावल्या असतील, तर काही गोष्टी कमावल्या असतील. देश या पातळीवरही आपण अनेक अनुभव घेतले. नव्या संकल्पांसह नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी आपल्यापैकी अनेक जण सज्जही असतील. अनेकांनी नव्या वर्षातील काही योजनांचाही विचार केला असेल. नव्या वर्षाच्या स्वागताला पुढील काही संकल्पांचाही विचार करता येईल. उपेक्षित, दुर्लक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काय करता येईल, याचा विचार करू...
  December 31, 03:00 AM
 • लष्करप्रमुखांच्या नियुक्तीवर राजकारण नको
  नव्या वर्षात विपिन रावत यांची लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती होईल. विरोधी पक्ष, विशेषत: काँग्रेसने आक्षेप घेऊनही तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सेवाज्येष्ठतेकडे दुर्लक्ष करत रावत यांना लष्करप्रमुख पद देण्यात आले आहे. इंदिरा गांधींनी १९८३ मध्ये लेफ्टनंट जनरल ए. के. सिन्हा यांना डावलून लेफ्टनंट जनरल ए. एस. वैद्य यांना लष्करप्रमुख पद दिले होते. तेव्हा लष्करप्रमुखाची नियुक्ती हा सरकारचा विशेषाधिकार अाहे आणि यावरून राजकारण करू नये, असे बोलले जात होते. २०१४ मध्ये मनमोहनसिंह सरकारनेदेखील...
  December 30, 03:00 AM
 • गोंधळलेल्या वर्षाखेरीत ग्रामीण ऊर्जा प्रेरणादायी
  २०१६ या आर्थिक वर्षातील अखेरचे तीन महिने प्रचंड नाट्यमय आणि गोंधळाचे ठरले. त्याची सुरुवातच डिमॉनिटायझेशनने अर्थात नोटाबंदीने झाली आणि अखेर दंगलने होत आहे. दोन्ही टोकांच्या अखेरीस डीआहे. या दोन्ही डीमध्ये प्रचंड जोखीम उचलत प्रवाहाविरुद्ध बंड पुकारून आपले स्वप्न साकार करण्याची शक्ती आहे. स्वप्न सत्यात उतरवण्याची महत्त्वाकांक्षा, त्यासाठी सामाजिक बंधने झुगारून आव्हानांचा सामना करणे, जिद्द, मेहनत आणि देशभक्तीच्या जोरावर लैंगिक भेदभावाला सामोरे जात ध्येय गाठणे, हे फोगट भगिनींचे...
  December 29, 03:00 AM
 • महिलेच्या पेहरावाला धर्माची जोड देणे चुकीचे
  आपण स्त्री-पुरुष समानतेच्या गप्पा मारतो, स्त्रियांना आरक्षण देतो; पण अंमलबजावणी करताना कारभार मात्र पुरुषांच्या हातात देतो. शर्ट काढून सिक्स पॅक अॅब्स दाखवणाऱ्या अभिनेत्यांचे केवळ कौतुक करत नाही, तर अनुकरणही करतो; पण स्त्रियांच्या पोशाखावर मात्र हरकत घेतो. हे सर्व आपल्या पुरुषी मानसिकतेचे दर्शन घडवते. मोहंमद शमीच्या पोस्टवरून सोशल मीडियावर कल्लोळ माजला आहे. काहींनी तर तू मुस्लिम आहेस, बायकोच्या कपड्यांकडे लक्ष दे, इथपर्यंत आणि काहींनी तर त्याहीपेक्षा खालच्या पातळीला जाऊन आपली...
  December 28, 03:00 AM
 • सुशिक्षित समाजच राेखू शकताे दलितांचे शाेषण
  भारतातील अनुसूचित जाती अाणि जमातींच्या शाेषणाविषयी अालेल्या अहवालातून शासकीय व्यवस्थेचे अपयश उघड झाले अाहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे लाेटली अाहेत; परंतु दलित अाणि शाेषितांवर हाेत असलेले अत्याचार काही कमी झालेले नाहीत किंवा ते पूर्ण रूपाने स्वतंत्र झाले नाहीत. दलितांच्या संरक्षणासाठी बनवण्यात अालेल्या कायद्यांची अंमलबजावणीही सक्षमपणे हाेत नाही, राजकीय हस्तक्षेपामुळे त्यांना न्याय मिळत नाही. दुसरीकडे केंद्र अाणि राज्य सरकारांकडून गठीत करण्यात अालेले अायाेग तसेच अन्य...
  December 27, 03:00 AM
 • माेदी जगातील प्रमुख नेत्यांमधील एक नाव! (नितीन गडकरी )
  ज्ञा न, विज्ञान, तंत्रज्ञान अाणि संशाेधन याबाबी अर्थनीतीशी जाेडत पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी मेड इन इंडिया, मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, स्टार्ट अप इंडिया अशा अनेक गाेष्टींना प्राेत्साहन दिले. देशात जलदगतीने अर्थव्यवस्थेत बदल घडत अाहेत. मुक्त अर्थव्यवस्थेचे समर्थन करताना त्यांनी गरिबांचा विचार केला. प्रधानमंत्री जनधन याेजनेतून २१ काेटी ८० लाख बँक खाती उघडलीत, याअाधी केवळ साडेतीन लाख बँक खाती हाेती. या सर्व खातेधारकांना जीवन विमा मिळाला. पंतप्रधान पीक विमा याेजनेद्वारे त्यांनी...
  September 18, 01:55 AM
 • Birthday special नरेंद्र मोदींमध्ये प्रेरित करणारे नेतृत्वगुण (देवेंद्र फडणवीस)
  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते प्रचंड फोकस आहेत आणि चौफेर नजर असल्याने प्रत्येक गोष्टीची लहानातील लहान बाबही त्यांना माहीत असते. त्यांच्या कामाची पद्धत ऑब्जेक्टिव्ह आहे. म्हणजेच ते रिझल्ट ओरिएंटेड काम करण्यावर भर देतात. त्यांच्या काम करण्याच्या या पद्धतीचा अनुभव आम्हाला अनेकदा आला आहे. गेली १५ वर्षे नवी मुंबई विमानतळाचे काम मार्गी लागले नव्हते. याकरिता केंद्र सरकारकडून आठ एनओसी येणे बाकी होते. व्हिडिअो कॉन्फरन्सिंग घोषणा होताच १५ दिवसांत सात एनओसी मिळाले आणि...
  September 17, 02:10 AM
 • विश्वनिर्माता प्रभू विश्वकर्मा (प्रकटदिन विशेष)
  विश्वकर्मा म्हणजे देवतांचा करागीर आहे. अशी एक समजूत सर्वसामान्यांमध्ये आढळून येते. पांचाल समाजबांधवही त्याला अपवाद नाही. विश्वकर्मा वंशज म्हणून ज्या पाच समाजांची ओळख आहे, ते सुतार, लोहार, सोनार, ताक्रकार व शिल्पकार हे पाचही समाजबांधव महाराष्ट्रात पांचाल म्हणून ओळखले जातात. दक्षिण भारतात हाच समाज विश्वब्राह्मण म्हणून, तर उत्तर भारतात विश्वकर्मा समाज म्हणून सुपिरिचित आहे. हा समाज प्रामुख्याने कारागिरी करणारा आहे. त्यामुळे भगवान विश्वकर्माबाबत देवतांचा कारागीर हे संबोधन रुढ होत गेले....
  September 15, 02:00 AM
 • 'देवेन्द्र म्हणाले नारदमुनी...!' कवितेतून जाणून घ्‍या महाराष्‍ट्रातील राजकीय परिस्‍थ‍िती
  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला. दरम्यान, शिवसंग्रामचे विनायक मेटे वगळता इतर मित्र पक्षांना लाल दिवा दिला. तसेच पक्षातील पूर्वीच्या मंत्र्यांचे खातेपालट करून अधिकार कमी केले. या सर्व घडामोडीवर ख्यातर्कीत कवी तथा सखे साजणीकार ज्ञानेश वाकुडकर यांनी कवितेतून केलेले भाष्य खास divyamarathi.com च्या वाचकांसाठी... देवेन्द्र म्हणाले नारदमुनी...! देवेंद्र म्हणाले, नारदमुनी स्वाभिमान वाले उरले का कुणी? असल्यास त्यांची सिक्रेट धुणी अहवाल सादर करावा !...
  July 11, 01:08 PM
 • नाथाभाऊ, खरंच आज मुंडे साहेब असते तर?  (नामदेव खेडकर)
  एमआयडीसीमधील जमीन खरेदी, लाचेच्या प्रकरणात अडकले कथित पीए, दाऊदशी संपर्क अशा वेगवेगळ्या आरोपानंतर एकनाथ खडसेंनी अखेर मंत्रिपदाचा राजीनामा दिला. तत्पूर्वी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त खडसे यांनी मुंबईत लावलेले होर्डिंग्ज, वर्तमानपत्रे आणि दुरचित्रवाणीवरून दिलेल्या जाहिराती बरेच काही सांगून जातात. मुंडे साहेब, आज तुम्ही असता तर... असा स्पष्ट आणि सूचक मथळा त्यात होता. नाथाभाऊ, तुम्ही संघाच्या नव्हे तर गोपीनाथरावांच्या मुशीत वाढल्याचे वेळोवेळी कबुल केलेत....
  June 6, 01:06 PM
 • बदलत्या ऋतुंमधील ठराविक आजार, सांगताहेत बॉम्बे हॉस्पिटलचे डॉ. गौतम भन्साली
  बरेच आजार हे ऋतूमानानुसार उद्भवतात. मात्र वेळीच काळजी घेतली तर निदान योग्य होऊ शकते. येथे तुम्हाला लेप्टोस्पायरोसीस या पावसाळ्यात उद्भवणा-या आजाराविषयी सांगणार आहोत. तर चला जाणून घेऊयात बॉम्बे हॉस्पिटलचेजनरल फिजिशियनडॉ. गौतम भन्साली यांच्याकडून.... लेप्टोस्पायरोसीस हा पाळीव व वन्य प्राण्यांमुळे होणारा रोग आहे. हा रोग लेप्टोस्पायरा नावाच्या जिवाणूमुळे होतो म्हणून त्याला लेप्टोस्पायरोसीस असे म्हणतात. ग्रीक भाषेत लेप्टोस ह्या शब्दाचा अर्थ बारीक किंवा नाजूक असा होतो आणि latin मध्ये...
  May 26, 01:22 PM
 • तुमचे जीवन तुमच्या हाती (अमृत साधना)
  कल्पना करा, एखाद्या सकाळी तुम्ही जागे होणार आणि तुम्हाला विश्वास वाटू लागेल की तुम्ही वास्तवात तुमचे जीवन निर्मित करू शकता. अगदी तुमच्या मनाजोगे. आता कोणत्याही नशीब किंवा प्रारब्धाच्या हाती तुमचा दोर नाही. तुम्ही कठपुतळी नाहीत. याचा अर्थ तुम्ही निवड करू शकता. सुखी राहा अथवा दु:खी. सृजनात्मक वा विध्वंसक. यशस्वी वा अपयशी. किती मोठी सुवार्ता असेल ही! आता तुम्हाला वाटू लागेल की, हे नजीकच्या भविष्यात तरी शक्य नाही अथवा पुढच्या जन्मीच हे शक्य आहे. पुढच्या जन्मीची स्वप्ने पाहू नका. हे आजच शक्य आहे....
  March 20, 02:04 AM
 • आत्मविश्वास वाढवणारे पोशाखच लोकप्रिय  (अस्मिता अग्रवाल)
  फॅशन जगतात १० वर्षांपूर्वी डिझायनर अनुपमा दयाल यांनी पाऊल ठेवले. आज सुंदर पोशाखांच्या दुनियेत त्यांनी आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. या दशकभराच्या वाटचालीला त्या आनंदाचा प्रवास म्हणतात. नुकताच त्यांच्याशी संवाद साधला. येणारा प्रत्येक दिवस आपल्यासाठी वरदान असतो, असे त्या मानतात. आपण स्वावलंबी आहोत आणि कुटुंबाला चांगले आयुष्य देण्यात यशस्वी झालो आहोत हा सर्वात मोठा आनंद असल्याचे त्यांनी सांगितले. जगभरातील महिलांकडून मिळणारे प्रेम आणि सन्मान माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचे अाहे....
  March 20, 02:02 AM
 • नवी मुंबई असेल स्मार्ट सिटीची प्रेरणा    (डॉ. मोहन निनावे)
  का ही दिवसांपूर्वी स्मार्ट सिटी योजनेच्या प्राथमिक टप्प्यात देशभरातून ९८ शहरांची निवड करण्यात आली व नंतर निवडक २० शहरांची यादी जाहीर झाली त्यात महाराष्ट्रातील पुणे आणि सोलापूर या दोनच शहरांचा समावेश करण्यात आला. नवी मुंबईसारखी अनेक शहरे पहिल्या फेरीतून बाद झाली. याचा अर्थ त्यांचे स्मार्ट सिटीचे आव्हान संपुष्टात आले, असे चित्र रंगवले गेले. मात्र वस्तुस्थिती अशी आहे की, सिडकोने जाहीर केलेल्या नवी मुंबई दक्षिण स्मार्ट सिटी या स्पर्धेत नव्हती तरी हे शहर स्मार्ट सिटीची मानके कित्येक...
  March 15, 02:23 AM
 • डॉ. आंबेडकर विद्यापीठ की हिंदुत्ववादी विद्यापीठ ?
  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सुमारे पन्नास एकर जागेवर ३०० कोटी रुपये खर्चून गोपीनाथ मुंडे यांच्या नावे एक संशोधन संस्था उभारण्याचे घाटत आहे. या संदर्भातील एक प्रस्ताव विद्यापीठाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केल्याचे वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाले आहे. गोपीनाथ मुंडे मराठवाड्याचे भूमिपुत्र होते म्हणून त्यांचे स्मारक उभारण्यात काहीही गैर नाही, पण औरंगाबाद शहरात सरकारी जागेवर गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक होऊ घातले असताना विद्यापीठातील पन्नास एकर...
  February 23, 03:00 AM
 
जाहिरात
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
जाहिरात
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 

हास्ययात्रा