Home >> Mukt Vyaspith
 • धान्यापेक्षा साखर महत्त्वाची का ?
  डाळीला बोनसचा तडका या दिव्य मराठीतील (२० जून) अग्रलेखाद्वारे शेती पिकांचे किती निकृष्ट नियोजन आहे ते दाखवून दिले आहे. मागील दहा वर्षांत अनेकदा दुष्काळ पडला तरी साखरेचे अन् तांदळाचे विक्रमी उत्पादन होत आहे अन् तृणधान्य आणि कडधान्य यांचे मात्र फारच कमी उत्पादन होत आहे. ऊस अन् तांदळासारख्या पिकाला जास्त पाणी लागते, यावर शेतकर्यांनी पिकांचे नियोजन करण्याची गरज आहे. कमी पाण्यावर येणारी पिके घेतल्यास शेतकर्यांना आर्थिक फायदा होतो आणि दुष्काळाचा सामनाही करता येतो. त्याचप्रमाणे सर्व...
  June 26, 03:00 AM
 • योगाचा स्तुत्य उपक्रम
  जागतिक योग दिनाच्या निमित्ताने देशभरात सकाळीच देशबांधवांनी उत्स्फूर्तपणे योगाची प्रात्यक्षिके केली. मुस्लिम बांधवांचा विरोधही मावळलेला दिसून आला. काँग्रेसने मात्र नरेंद्र मोदी योगाचे मार्केटिंग करत असल्याचा आरोप केला, पण मायलेकरे कुठे गायब झाली होती? ते तेथे किंवा दररोज योग करतात का? ते मात्र समजू शकले नाही. भारताची प्राचीन परंपरा असलेला योग आता जगभरात साजरा होतोय, याचा निदान अभिमान तरी बाळगावा. देशात मोठ्या प्रमाणावर कुपोषण चालू आहे, मजुरांना योगाची काय गरज? वगैरे संदेश...
  June 23, 04:00 AM
 • कालाय तस्मै नम:
  माजी गृहमंत्री तसेच उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची अवस्था ना घर का ना घाट का अशी झाली आहे. एक सर्वसामान्य भाजी विक्रेता ते उपमुख्यमंत्री अशी त्यांची वाटचाल थक्क करणारी आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक सामान्य शिवसैनिकांना संधी दिली, त्यात भुजबळांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाईल. त्यांची बेदरकार वृत्ती आणि शरद पवारांनाही आव्हान देण्याचे धार्ष्ट्य गोत्यात येण्यास कारणीभूत ठरले. शिवसेनेची लफडी, कुलंगडी बाहेर काढण्यात अग्रेसर असणाऱ्या भुजबळांची अवस्था दयनीय बनली आहे. आता...
  June 20, 12:40 AM
 • मुंडे यांच्या स्मारकासाठी समन्वय हवा
  स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकावरून वाद म्हटल्यापेक्षा विचार, चर्चा चालू आहे. मूळ विचार स्मारक आणि त्याला पर्याय ट्रॉमा हॉस्पिटल अशा दोन बाजू आहेत. माझ्या मते यात वाद होण्याऐवजी समन्वय व्हावा. दोघांनाही एकत्र करून एका बाजूला मूळ स्मारक आणि दुसऱ्या बाजूला ट्रॉमा हॉस्पिटल असे बहुउद्देशीय आणि बहुपयोगी असे एक चिरंतन स्मारक करावे. मध्यभागी मुंडे यांचा भव्य पुतळा उभारण्यात यावा. शिवाय दोन्हीकडे छायाचित्रे लावण्यात यावीत. असे स्मारक चिरंतन व वैशिष्ट्यपूर्ण होईल. भाजप, पंकजा मुुंडे आणि...
  June 19, 01:27 AM
 • लेकरांनो, जरा जपून
  महिलांनी प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या पुढे जायचेच, असा ठाम निर्धार केला आहे की काय, अशी शंका येते. रचनात्मक आणि सकारात्मक क्षेत्रात महिला पुरुषांच्या पुढे गेल्या तर त्यातून समाजाचे हितच होईल; परंतु नारीशक्ती जेव्हा आधुनिकतेच्या भ्रामक कल्पनांच्या आहारी जाते तेव्हा त्याचे समर्थन करता येत नाही. स्त्रीच जर बिघडली तर तिचे कुटुंब, तो समाज बिघडायला फार वेळ लागत नाही. म्हणूनच मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे वाहन चालवून गोंधळ घालणाऱ्या मुंबईतील जान्हवी गडकर आणि शिवानी बाली या धनाढ्य आणि...
  June 18, 01:16 AM
 • माहिती अधिकारावरही घाला!
  महाराष्ट्र राज्याच्या माहिती आयुक्तांच्या घरावर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने धाडी टाकल्याचे, त्यात बेहिशेबी मालमत्ता सापडल्याचे वृत्त सर्वत्र प्रसिद्ध झाले. ओघाने माहिती आयुक्त पदालाही गालबोट लागले. वास्तविक सदर धाडी विद्यमान माहिती आयुक्त दीपक देशपांडे सार्वजनिक बांधकाम सचिव असताना तत्कालीन घोटाळ्यांसंदर्भात होत्या. त्यामुळे प्रसिद्ध झालेल्या वृत्तांत तत्कालीन सार्वजनिक बांधकाम सचिवांच्या घरावर छापे असे अधोरेखित व्हायला हवे होते. मात्र, त्यांची माहिती आयुक्त पदावर नेमणूक...
  June 17, 02:14 AM
 • इंग्रजी आवश्यकच!
  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. बी. ए. चोपडे यांनी संभाव्य कुलसचिवांचे इंग्रजीचे ज्ञान तपासण्यासाठी २५ जूनला लेखी परीक्षेचा निर्णय घेतला आहे. तो योग्यच आहे. परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम संबंधित उमेदवारांना उपलब्धही करून देण्यात आला आहे. मात्र, स्वत:च्या नावापुढे डॉक्टरेटची पदवी लावणाऱ्या उच्चशिक्षित उमेदवारांनी कुलगुरूंच्या या निर्णयाविरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करावी हे हास्यास्पद आहे. उमेदवारांच्या ज्ञानाबद्दल ती शंका निर्माण करणारी आहे....
  June 15, 01:01 AM
 • ब्राह्मणी वृत्तीला विरोध
  या प्रवृत्तींना कोण आवरणार? या ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या लेखावर केदार कुलकर्णी यांचा प्रतिवाद (१० जून) वाचला. या पत्रात कुलकर्णी असे म्हणतात की, ब्राह्मण जातीचे नाव बदनाम करण्यासाठी ब्राह्मणी वृत्ती, आक्रमक ब्राह्मणशाही या शब्दांचा निष्कारण वापर करून वाद उकरण्याचा वागळेंचा प्रयत्न दिसतो आहे. आपल्या देशात ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय, शूद्र अशी जातींची उतरंड होती. या उतरंडीचे समर्थन करणाऱ्या ब्राह्मणांमधील काही जातीयवादी ब्राह्मणी वृत्तींना फुले- शाहू-आंबेडकर, प्रबोधनकार...
  June 13, 12:33 AM
 • साखरसम्राटांचे फावले!
  शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन मोदी सरकारने देशभरातील साखर कारखान्यांना ६ हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज द्यायचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यांवर १५०० कोटी थेट जमा होणार आहेत आणि उर्वरित २२०० कोटी थकबाकी साखर कारखान्यांकडून अपेक्षित आहे. प्रश्न असा पडतो की अप्पासाहेब काडादी, नागनाथअण्णा नाईकवाडी, गोपीनाथ मुंडे यांचे कारखाने कधी अडचणीत आले नाहीत, तर मग इतर साखर कारखाने कसे काय अडचणीत येऊ शकतात? साखरसम्राटांनी कारखाने लुटायचे आणि शेतकऱ्यांना...
  June 12, 12:59 AM
 • विनायक मेटे गप्प का?
  ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी अरबी समुद्रातील शिवछत्रपतींच्या स्मारकाला सद्हेतूने केलेला विरोध सहन न झाल्याने आमदार विनायक मेटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केतकर यांच्या घरावर दगडफेक केली होती. त्यावरून बराच गदारोळही झाला. कालांतराने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी शिवस्मारकांसाठी लागणारा पैसा गरजूंना घरे पुरवणे इत्यादी चांगल्या कामासाठी केला जावा, अशी भूमिका घेतली व शिवस्मारकास जाहीर विरोध दर्शवला; परंतु मेटे यांनी साधा निषेधही नोंदवला नाही. आता...
  June 10, 12:13 AM
 • डिवचण्याचे उद्योग
  दिव्य मराठी (९ जून) मध्ये ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचा प्रसिद्ध झालेला लेख वाचला. आक्रमक धर्मांध ब्राह्मणशाहीकडे सरकारने लक्ष दिले पाहिजे, असे त्यांचे मत आहे. एखाद्या वाईट प्रवृत्तीला विशिष्ट जातीचे नाव देणे कितपत योग्य आहे? निखिल वागळे यांनी जातीयवादी मंडळींच्या दुष्ट प्रवृत्तीला आक्रमक धर्मांध ब्राह्मणशाही असे संबोधले आहे. ब्राह्मण जातीचे नाव वाईट प्रवृत्तीला देऊन जातीयवादाचा अधिक ऊहापाेह करणे योग्य नाही. ब्राह्मण जातीचे नाव बदनाम करण्यासाठी ब्राह्मणी वृत्ती, आक्रमक...
  June 9, 10:36 PM
 • स्वागतार्ह फतवा !
  फसवा फतवा! (२० मे) संपादकीय आवडले. माझ्या मते त्याचे स्वागत केले पाहिजे. भारतासह जगाला भाजून काढत असलेल्या अतिरेकी संघटनांना मुस्लिम राष्ट्रांनी चिरडून टाकावे, असा फतवा अतिरेक्यांचे उगमस्थान असलेल्या पाकिस्तानातून आणि तोही २०० मौलवींच्या लाहोर परिषदेतून निघाला आहे. तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान, अल-कायदा, आयएसआयएस, बोको हराम आणि इतर कथित जिहादी संघटनांचे तत्त्वज्ञान सामान्य नागरिकांची दिशाभूल करत आहे. त्यांचे काम इस्लामविरोधी आहे, असेही त्या फतव्यात म्हटले आहे. पाकिस्तानी लष्कर, आयएसआय...
  May 21, 03:00 AM
 • काँग्रेस-राष्ट्रवादीला धोक्याची घंटा
  औरंगाबाद महापालिका निवडणुकीत मुस्लिमांची मते मजलिस-ए- इत्तेहादुल मुसलमिन (एमआयएम) पक्षाच्या उमेदवारांना मिळाल्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा धुव्वा उडाला. मुस्लिमांच्या मतांच्या फुटीचा फायदा आपल्याला होईल, असे काँग्रेसच्या नेत्यांना वाटत होते, पण सारे धुळीस मिळाले. गेली २८ वर्षे सत्तेवर असलेल्या युतीच्या कारभार्यांनी औरंगाबाद शहराचा विकास घडवला नसल्याने मतदारांत नाराजीची भावना होती. औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीत या पक्षाच्या उमेदवारांनी मारलेली मुसंडी...
  May 19, 03:27 AM
 • पाण्याची नासाडी थांबवा
  चार-पाच दिवसांपूर्वीच वर्तमानपत्रामध्ये बातमी वाचली की, मागील वर्षापेक्षा यंदा जायकवाडीमधील पाण्याची स्थिती चांगली असून जुलै महिन्यापर्यंत चिंतेचे कारण नाही आणि गुरुवार, १४ मे रोजीच्या वृत्तपत्रात बातमी होती की, उपसा घटला! पाणी संकट गंभीर महापालिका प्रशासनाला हा अचानक साक्षात्कार कसा झाला? त्याच बातमीत पाणी कपातीचे संकेतही दिलेले आहेत. दर महिन्यातून चार- पाच वेळा फुटणाऱ्या जलवाहिन्या, त्यामुळे लाखो लिटर पाण्याची होणारी नासाडी, तसेच शहराच्या अनेक भागांत असलेल्या अनधिकृत नळ...
  May 16, 01:34 AM
 • वाहनांवर मोबाइल क्रमांक असावा
  वाहने पार्किंगची सुविधा नसल्यास लोक दुकानात जात नाहीत. वाहनचालक दुकानासमोर कशाही पद्धतीने वाहने पार्क करतात. त्यामुळे वाहतूक खोळंबते. यासाठी पार्किंगचे सुयोग्य व्यवस्थापन असणे गरजेचे आहे. रस्त्यावरील नो पार्किंगमधील वाहनांना जॅमर लावण्याच्या मोहिमेवर भर द्यावा. चारचाकी वाहनावर संबंधिताचा मोबाइल क्रमांक असावा. म्हणजे त्याच्याशी संपर्क साधून वाहनकोंडी सोडवण्यासाठी मदत होईल. तसेच अपघात झाला तर या माेबाइलचा उपयोग होतोच. एखादा वाहनाचा चालक दारू पिऊन बेदरकारपणे गाडी चालवत असल्यास...
  May 15, 12:58 AM
 • प्रेक्षकांना मूर्ख बनवण्याचा उद्योग
  उन्हाळा सुरू आहे. मुलांच्या परीक्षा संपल्या आहेत. आता टीव्हीसमोर बसून आयपीएल पाहणे हा मोठा खेळ? प्रत्यक्षात मुलांना खेळण्यासाठी मैदाने नाहीत. शहरात तर गल्लीत कधी तरी क्रिकेट खेळले जाते. त्यात घरांच्या काचा फुटतात. जुने खेळ इतिहासजमा होण्याच्या वाटेवर आहेत. आयपीएलला प्रचंड प्रतिसाद, महागडी तिकिटे, स्टेडियमपर्यंत जाणे-येणे, महागडे खाद्यपदार्थ, वेळ यांचा विचार करता या गोष्टी कोणाला परवडतात? दैनंदिन समस्यांनी हैराण लोक मात्र टीव्हीपुढे विरंगुळा म्हणून पाहतात. प्रचंड श्रीमंत खेळाडू,...
  May 14, 12:35 AM
 • डाेंगराची काळी मैना अदृश्य होते आहे..!
  गाता गळा, शिंपता मळा आणि लिहिता हातावळा हे कविवर्य बा. भ. बाेरकर यांचे सुवचन पुढे नेऊन आस्वादता रसना असे म्हणता येईल. स्वर, कर प्रतिभा त्याचप्रमाणे रुचकर पदार्थांचा आस्वाद घेण्याची रसिकता या वृत्ती मनुष्याच्या ठायी असल्याच पाहिजेत. आपल्याकडे ऋतुमानाप्रमाणे विविध फळांची रेलचेल असते. जळगावची मेहरुणची केळी व बाेरे, डहाणू व घोलवडचे चिकू, पुण्याचे अंजीर, सीताफळे व विदर्भाची संत्री सुप्रसिद्ध आहेत. क जीवनसत्त्व असणारी काळी करवंदे उन्हाळ्यात येतात. डाेंगरदऱ्यातील आदिवासी बांधव...
  May 13, 02:07 AM
 • शालेय शिक्षणात सोयी-सुविधांचा अभाव
  देशातील केंद्रीय विद्यालयांमध्ये जवळपास एक तृतीयांश प्राचार्यांची पदे रिक्त आहेत, तसेच टीजीटी, पीजीटी आणि प्राथमिक शिक्षकांची जवळपास ७ हजार पदे रिक्त असल्याची माहिती मानव संसाधन विकास मंत्रालयाशी संबंधित संसदेच्या स्थायी समितीच्या अहवालात दिली आहे. जे. डी. नड्डा अध्यक्ष असलेल्या या समितीने अलीकडे संसदेत सादर केलेल्या त्यांच्या अहवालात हे म्हटले आहे. या अहवालात जवळपास ४०० शाळांमध्ये कायमस्वरूपी इमारत नसल्याविषयी चिंता व्यक्त करण्यात आली असून यासाठी केंद्रीय विद्यालय संघटनेला...
  April 30, 12:04 AM
 • अमेरिकेतील आरोग्य खात्यातील महाशल्यचिकित्सक (सर्जन जनरल) या सर्वोच्च पदावर भारतीय वंशाच्या ३७ वर्षीय विवेक हल्लेगेरे मूर्ती यांची नेमणूक झाली आहे. भारतीय वंशाच्या अधिकाऱ्याला मिळालेले ओबामा प्रशासनातील हे सर्वोच्च पद आहे. त्यांनी नुकतीच या पदाची शपथ घेतली. मूर्ती यांनी हिंदू धर्मातील श्रीमद् भगवद्गीता या पवित्र ग्रंथावर हात ठेवून शपथ घेतली. भगवद्गीतेवर टीका करणाऱ्या भारतातील पुरोगाम्यांना ही सणसणीत चपराक आहे. पाश्चात्त्य संस्कृतीच्या आहारी जाऊन स्वतःच्या धार्मिक ग्रंथांची...
  April 28, 12:28 AM
 • काळा पैसा कुठे गेला?
  देशात भाजप पक्षाला केंद्रातली सत्ता मिळाल्यास स्वित्झर्लंड आणि परदेशी बँकात भारतीयांनी ठेवलेला ७३ लाख कोटी रुपयांचा काळा पैसा देशात परत आणू, अशी ग्वाही भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकांच्या प्रचारात दिली होती. हा सर्व काळा पैसा भारतात आल्यास देशावरचे कर्जही फिटेल, असेही ते सांगत होते. पण, मागील नऊ महिन्यांत परदेशातला लाखो कोटी रुपयांचा तो काळा पैसा काही भारतात आलेला नाही. मोदी आणि जेटली परदेशातल्या काळ्या पैशाबाबत शब्दही काढायला तयार...
  April 10, 04:00 AM
 
जाहिरात
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
जाहिरात
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 

हास्ययात्रा