Home >> Mukt Vyaspith
 • स्वागतार्ह फतवा !
  फसवा फतवा! (२० मे) संपादकीय आवडले. माझ्या मते त्याचे स्वागत केले पाहिजे. भारतासह जगाला भाजून काढत असलेल्या अतिरेकी संघटनांना मुस्लिम राष्ट्रांनी चिरडून टाकावे, असा फतवा अतिरेक्यांचे उगमस्थान असलेल्या पाकिस्तानातून आणि तोही २०० मौलवींच्या लाहोर परिषदेतून निघाला आहे. तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान, अल-कायदा, आयएसआयएस, बोको हराम आणि इतर कथित जिहादी संघटनांचे तत्त्वज्ञान सामान्य नागरिकांची दिशाभूल करत आहे. त्यांचे काम इस्लामविरोधी आहे, असेही त्या फतव्यात म्हटले आहे. पाकिस्तानी लष्कर, आयएसआय...
  May 21, 03:00 AM
 • काँग्रेस-राष्ट्रवादीला धोक्याची घंटा
  औरंगाबाद महापालिका निवडणुकीत मुस्लिमांची मते मजलिस-ए- इत्तेहादुल मुसलमिन (एमआयएम) पक्षाच्या उमेदवारांना मिळाल्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा धुव्वा उडाला. मुस्लिमांच्या मतांच्या फुटीचा फायदा आपल्याला होईल, असे काँग्रेसच्या नेत्यांना वाटत होते, पण सारे धुळीस मिळाले. गेली २८ वर्षे सत्तेवर असलेल्या युतीच्या कारभार्यांनी औरंगाबाद शहराचा विकास घडवला नसल्याने मतदारांत नाराजीची भावना होती. औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीत या पक्षाच्या उमेदवारांनी मारलेली मुसंडी...
  May 19, 03:27 AM
 • पाण्याची नासाडी थांबवा
  चार-पाच दिवसांपूर्वीच वर्तमानपत्रामध्ये बातमी वाचली की, मागील वर्षापेक्षा यंदा जायकवाडीमधील पाण्याची स्थिती चांगली असून जुलै महिन्यापर्यंत चिंतेचे कारण नाही आणि गुरुवार, १४ मे रोजीच्या वृत्तपत्रात बातमी होती की, उपसा घटला! पाणी संकट गंभीर महापालिका प्रशासनाला हा अचानक साक्षात्कार कसा झाला? त्याच बातमीत पाणी कपातीचे संकेतही दिलेले आहेत. दर महिन्यातून चार- पाच वेळा फुटणाऱ्या जलवाहिन्या, त्यामुळे लाखो लिटर पाण्याची होणारी नासाडी, तसेच शहराच्या अनेक भागांत असलेल्या अनधिकृत नळ...
  May 16, 01:34 AM
 • वाहनांवर मोबाइल क्रमांक असावा
  वाहने पार्किंगची सुविधा नसल्यास लोक दुकानात जात नाहीत. वाहनचालक दुकानासमोर कशाही पद्धतीने वाहने पार्क करतात. त्यामुळे वाहतूक खोळंबते. यासाठी पार्किंगचे सुयोग्य व्यवस्थापन असणे गरजेचे आहे. रस्त्यावरील नो पार्किंगमधील वाहनांना जॅमर लावण्याच्या मोहिमेवर भर द्यावा. चारचाकी वाहनावर संबंधिताचा मोबाइल क्रमांक असावा. म्हणजे त्याच्याशी संपर्क साधून वाहनकोंडी सोडवण्यासाठी मदत होईल. तसेच अपघात झाला तर या माेबाइलचा उपयोग होतोच. एखादा वाहनाचा चालक दारू पिऊन बेदरकारपणे गाडी चालवत असल्यास...
  May 15, 12:58 AM
 • प्रेक्षकांना मूर्ख बनवण्याचा उद्योग
  उन्हाळा सुरू आहे. मुलांच्या परीक्षा संपल्या आहेत. आता टीव्हीसमोर बसून आयपीएल पाहणे हा मोठा खेळ? प्रत्यक्षात मुलांना खेळण्यासाठी मैदाने नाहीत. शहरात तर गल्लीत कधी तरी क्रिकेट खेळले जाते. त्यात घरांच्या काचा फुटतात. जुने खेळ इतिहासजमा होण्याच्या वाटेवर आहेत. आयपीएलला प्रचंड प्रतिसाद, महागडी तिकिटे, स्टेडियमपर्यंत जाणे-येणे, महागडे खाद्यपदार्थ, वेळ यांचा विचार करता या गोष्टी कोणाला परवडतात? दैनंदिन समस्यांनी हैराण लोक मात्र टीव्हीपुढे विरंगुळा म्हणून पाहतात. प्रचंड श्रीमंत खेळाडू,...
  May 14, 12:35 AM
 • डाेंगराची काळी मैना अदृश्य होते आहे..!
  गाता गळा, शिंपता मळा आणि लिहिता हातावळा हे कविवर्य बा. भ. बाेरकर यांचे सुवचन पुढे नेऊन आस्वादता रसना असे म्हणता येईल. स्वर, कर प्रतिभा त्याचप्रमाणे रुचकर पदार्थांचा आस्वाद घेण्याची रसिकता या वृत्ती मनुष्याच्या ठायी असल्याच पाहिजेत. आपल्याकडे ऋतुमानाप्रमाणे विविध फळांची रेलचेल असते. जळगावची मेहरुणची केळी व बाेरे, डहाणू व घोलवडचे चिकू, पुण्याचे अंजीर, सीताफळे व विदर्भाची संत्री सुप्रसिद्ध आहेत. क जीवनसत्त्व असणारी काळी करवंदे उन्हाळ्यात येतात. डाेंगरदऱ्यातील आदिवासी बांधव...
  May 13, 02:07 AM
 • शालेय शिक्षणात सोयी-सुविधांचा अभाव
  देशातील केंद्रीय विद्यालयांमध्ये जवळपास एक तृतीयांश प्राचार्यांची पदे रिक्त आहेत, तसेच टीजीटी, पीजीटी आणि प्राथमिक शिक्षकांची जवळपास ७ हजार पदे रिक्त असल्याची माहिती मानव संसाधन विकास मंत्रालयाशी संबंधित संसदेच्या स्थायी समितीच्या अहवालात दिली आहे. जे. डी. नड्डा अध्यक्ष असलेल्या या समितीने अलीकडे संसदेत सादर केलेल्या त्यांच्या अहवालात हे म्हटले आहे. या अहवालात जवळपास ४०० शाळांमध्ये कायमस्वरूपी इमारत नसल्याविषयी चिंता व्यक्त करण्यात आली असून यासाठी केंद्रीय विद्यालय संघटनेला...
  April 30, 12:04 AM
 • अमेरिकेतील आरोग्य खात्यातील महाशल्यचिकित्सक (सर्जन जनरल) या सर्वोच्च पदावर भारतीय वंशाच्या ३७ वर्षीय विवेक हल्लेगेरे मूर्ती यांची नेमणूक झाली आहे. भारतीय वंशाच्या अधिकाऱ्याला मिळालेले ओबामा प्रशासनातील हे सर्वोच्च पद आहे. त्यांनी नुकतीच या पदाची शपथ घेतली. मूर्ती यांनी हिंदू धर्मातील श्रीमद् भगवद्गीता या पवित्र ग्रंथावर हात ठेवून शपथ घेतली. भगवद्गीतेवर टीका करणाऱ्या भारतातील पुरोगाम्यांना ही सणसणीत चपराक आहे. पाश्चात्त्य संस्कृतीच्या आहारी जाऊन स्वतःच्या धार्मिक ग्रंथांची...
  April 28, 12:28 AM
 • काळा पैसा कुठे गेला?
  देशात भाजप पक्षाला केंद्रातली सत्ता मिळाल्यास स्वित्झर्लंड आणि परदेशी बँकात भारतीयांनी ठेवलेला ७३ लाख कोटी रुपयांचा काळा पैसा देशात परत आणू, अशी ग्वाही भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकांच्या प्रचारात दिली होती. हा सर्व काळा पैसा भारतात आल्यास देशावरचे कर्जही फिटेल, असेही ते सांगत होते. पण, मागील नऊ महिन्यांत परदेशातला लाखो कोटी रुपयांचा तो काळा पैसा काही भारतात आलेला नाही. मोदी आणि जेटली परदेशातल्या काळ्या पैशाबाबत शब्दही काढायला तयार...
  April 10, 04:00 AM
 • अण्णा, मुस्लिमांसाठीही लढा!
  अण्णा हजारे यांनी जनलोकपाल विधेयकासाठी मोठा लढा दिला. जनआंदोलनाच्या रेट्याच्या दबावामुळे सरकारला अखेर झुकावे लागले. जनलोकपाल विधेयक मंजूर झाले. त्यामुळे अण्णा हजारे यांना प्रतिगांधी म्हटले जाते. आपल्या लढ्यामुळे लोकांना न्याय मिळतो, असा विश्वास आमच्या मनात निर्माण झाला आहे. तरी मुस्लिम समाजास न्याय मिळवून देण्यासाठी अण्णा, तुम्ही आता पुढाकार घ्यावा. केंद्रातले मोदी सरकार आणि फडणवीस सरकार दूजाभाव करते आहे. हिंदू व मुस्लिमांमध्ये बंधुभाव आहे; गायीला हिंदू समाजात माता मानतात. आम्हाला...
  April 7, 02:02 AM
 • जनतेची दिशाभूल करणे थांबवा
  ३० आणि ३१ मार्च या दोन्ही दिवशी पूर्ण वेळ ग्राहकांसाठी बँका सुरू होत्या. त्यानंतर एक एप्रिल रोजी वार्षिक हिशेबासाठी बँकांना सुटी असून दोन एप्रिल रोजी महावीर जयंतीनिमित्त आणि तीन एप्रिल रोजी गुड फ्रायडेनिमित्त बँकांना सुटी आहे. म्हणजे या आठवड्यात फक्त तीन दिवस बँका बंद असणार आहेत. मात्र, टी. व्ही. चॅनलवाल्यांनी तर बँका आठवडाभर बंद असल्याचा अपप्रचार करून लोकांची दिशाभूल चालवलेली आहे. या अशा अपप्रचारामुळे टीव्ही चॅनल्स स्वत:ची विश्वासार्हता गमावत आहेत, हे त्यांना कसे कळत नाही? केंद्र...
  April 1, 07:00 AM
 • निवडणुका आल्या
  औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकांची धामधूम सुरू झाली आहे. गेल्या जानेवारी महिन्यापासूनच निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. इच्छुक उमेदवारांच्या वाॅर्डातील नागरिकांच्या भेटीगाठी वाढल्या होत्या. शिवजयंती, गजानन महाराज पालखी सोहळा, रामनवमी असे उत्सव दणक्यात साजरे झाले. कधी न दिसणारे राजकीय कार्यकर्ते रस्त्यावर अवतरले. गळ्यात भगवे, निळे उपरणे घालून चेहऱ्यावर हास्य आणि दिसेल त्याला हात जोडण्याची पद्धत पाहिली की हा उमेदवार आहे असे कळायचे. एरवी आमच्या भागातील रस्त्यावर किती...
  March 30, 02:00 AM
 • गुरुजनांशी असे वागता ?
  पुण्यातील मुक्तांगण संस्थेमार्फत आयोजित कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी आजच्या शिक्षण पद्धतीबाबत बोलताना, कानफटात मारणारे मास्तर आता राहिले नाहीत, अशी खंत व्यक्त केली हाेती. आैरंगाबादेतील देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयात नुकत्याच घडलेल्या एका घटनेवरून आज नानांच्या बोलण्याचे स्मरण झाले. प्राचार्य उल्हास शिऊरकर यांनी एका विद्यार्थ्याच्या कानफटात मारली. मात्र, भारतीय विद्यार्थी सेनेने या निषेधार्थ महाविद्यालय बंद पाडले. याचे वृत्त दिव्य सिटी (२६ मार्च)च्या...
  March 28, 12:46 AM
 • इतर खेळांनाही स्थान द्यावे
  देशाला क्रिकेटने वेड लावले आहे. त्यात सध्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धा सुरू असल्याने सर्वच माध्यमे केवळ क्रिकेटचा उदोउदो करत आहे. जगात इतरही खेळ आहेत, हे बहुतेक विसरले आहे वाटते. विश्वचषकादरम्यान भारताची स्टार बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवालने इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत फायनलमध्ये प्रवेश करून इतिहास रचला. यात ती उपविजेती ठरली. या महत्त्वाच्या स्पर्धेला प्रसार माध्यमांनी हवी तेवढी प्रसिद्धी दिली नाही, हे चुकीचे आहे. सर्व माध्यमांनी क्रिकेटसह इतर खेळांनादेखील तेवढाच सन्मान दिला...
  March 27, 01:36 AM
 • कुऱ्हाडीचा दांडा...
  राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या यादीत मराठी चित्रपटांचा टक्का वाढत असल्याबद्दल मला मनस्वी आनंद होत आहे. त्यासाठी चाकोरीबाहेरचे विषय घेऊन आशयघन मराठी चित्रपट निर्मिती प्रक्रियेत गुंतलेल्या सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन. चित्रपट, संगीत, साहित्य इत्यादी क्षेत्रांतील कल्पक नवनिर्मिती समाजाची अभिरुची संपन्न करत असते आणि त्या त्या भाषेचा स्तरही उंचावत असते. तथापि मराठी चित्रपटांची चित्रविचित्र अमराठी नावे ही बाब मात्र खटकल्या शिवाय राहत नाही. कोर्ट ? फँड्री ? एलिझाबेथ एकादशी? ...?...
  March 26, 06:34 AM
 • 'आप'ला ग्रहण
  आम आदमी पक्षाच्या नेत्यांमधील बातम्या सध्या लक्ष वेधून घेत आहेत. रोज नवनवे गौप्यस्फोट होत आहेत. एकमेकांच्या कुलंगड्यांची लक्तरे चव्हाट्यावर धुतली जात आहेत. प्रसिद्धी माध्यमे त्यात महत्त्वाची भूमिका वठवत आहेत. जन्मापासून हा पक्ष सतत प्रसिद्धीच्या झोतात राहिला आहे. त्यामुळे कौतुकाचा विषय ठरलेला आप सध्या सर्वांच्या कुचेष्टेचा विषय बनला आहे. काही विद्वान मंडळी आणि प्रसारमाध्यमे हा पक्ष इतरांपेक्षा वेगळा नसल्याचा निष्कर्ष काढू लागले आहेत. पक्षात वैचारिक मतभेद होणे, हा इतिहास आहे....
  March 25, 03:03 AM
 • शेतकऱ्यांनो, जागे व्हा!
  भारत हा कृषिप्रधान देश अाहे. काेट्यवधी जनतेच्या हाताला काम देणारा शेती हा एकमेव शाश्वत व्यवसाय अाहे. काळाच्या अाेघात शेतीमध्ये अनेक सुधारणा झाल्या असून, अाधुनिक तंत्रज्ञान, बी-बियाणे अाले असून, नांगराची जागा ट्रॅक्टरने घेतली अाहे. असे असले तरी शेतकरी काही बाबतीत अडाणीच राहिला अाहे. कारण शेतीविषयक कायद्याचे ज्ञान कमी असल्याने अनेक वेळेस ताेटा सहन करावा लागताे. संकट अाल्यावर काेर्टाची पायरी चढण्याची वेळ येऊन वादविवाद जिंकण्यासाठी धावाधाव हाेते. यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले...
  March 24, 12:41 AM
 • विकासाभिमुख-रोजगारवृद्धीसाठी पूरक अर्थसंकल्पाचा अरुणोदय
  माेदी सरकारचा विकासलक्षी अर्थसंकल्प अर्थमंत्री अरुण जेटली यांनी संसदेत सादर करून भारतीयांना अार्थिकदृष्ट्या विकासाचा अरुणाेदय झाल्याची ग्वाही देणारा ठरेल असा विश्वास व्यक्त केला. अर्थसंकल्पात प्रामुख्याने अायकरदाते यांच्या अायकर रचनेत बदल झालेला नाही. पगारदार अायकरदात्यांना ट्रान्सपाेर्ट अलाउन्समध्ये दुप्पट वाढ दिली असून ही वाढ ८०० वरून १६०० रुपये दरमहा इतकी केलेली अाहे. अायकर कलम ८० सीसीडी (टॅक्स फ्रि इन्फ्रास्ट्रक्चर बाॅंड) मध्ये ५०००० रुपयांची वाढ दिली अाहे....
  March 7, 05:41 AM
 • गलथान कारभार
  २८ फेब्रुवारी रोजी झालेल्या बारावी परीक्षेतील गणिताच्या प्रश्नपत्रिकेत दोन प्रश्नांत चुका झाल्याचे बोर्डाने मान्य केले. दिव्य मराठीनेच (४ मार्च ) हा प्रकार उघडकीस आणला आहे. विद्यार्थ्यांची मानसिकता खच्ची करण्याचा झालेला प्रयत्न संतापजनक आहे. गणिताचा पेपर बर्याच विद्यार्थ्यांना अवघड गेला. त्याचा परिणाम दुसर्या पेपरवरही होऊ शकतो, हे समजण्याइतपत बोर्डाचे अधिकारी दुधखुळे नक्कीच नाहीत. मात्र, घडलेला प्रकार प्रिंटिंग मिस्टेक असल्याचा बिनदिक्कत खुलासा अधिकारी करतात. हा गलथानपणा नव्हे...
  March 5, 04:00 AM
 • बेजबाबदार वक्तव्य
  जम्मू़-काश्मीरमध्ये भाजपच्या पाठिंब्यावर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीचे ज्येष्ठ नेते मुफ्ती महंमद सईद मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले; पण शपथविधी सोहळ्यादरम्यान मुफ्ती महंमद सईद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत निवडणुका शांततेत पार पाडल्याचे श्रेय पाकिस्तान आणि हुरियत या दहशतवादी संघटनेस दिले. ही धक्कादायक घटना आहे. भारतीय निवडणूक आयोग, काश्मीरची जनता आणि भारतीय पोलिस तसेच सैन्यदलाची ही कामगिरी असताना त्यांचे अभिनंदन करण्याचे सोडून पाकला आणि हुरियतला श्रेय देण्याचे...
  March 4, 02:00 AM
 
जाहिरात
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
जाहिरात
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 

हास्ययात्रा