Home »News» Birthday Of Film Actress Babita

B'day: कधीकाळी अशी दिसत होती करीना-करिश्माची आई, आता बदलला LOOK

दिव्य मराठी वेब टीम | Apr 20, 2017, 12:32 PM IST

मुंबई- एकेकाळी लाखो कॉलेज गर्लच्या फॅशन आयकॉन असलेल्या अभिनेत्री बबिता यांची वेगळी ओळख सांगण्याची गरज नाही. त्यांचा टाइट चुडीदार कुर्ता, हूप इअर रिंग्स आणि गो-गो आय ग्लासेस आजही तरुणी विसरलेल्या नाहीत. एखाद्या परदेशी बालासारख्या दिसणा-या बबिता आज 69 वर्षांच्या झाल्या आहेत. 20 एप्रिल 1948 रोजी त्यांचा जन्म मुंबईमध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव हरि शिवदासानी असून ते सिंधी होते आणि आई फ्रेंच महिला होती. आपल्या फिल्मी करिअरमध्ये केवळ 19 सिनेमांमध्ये काम करणा-या बबिता यांनी 1966मध्ये आलेल्या 'दस लाख' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यांना सिनेमामध्ये निर्माता जीपी सिप्पी यांनी मोठा ब्रेक दिला. त्यांच्या सिनेमाचे नाव होते 'राज'. या सिनेमामध्ये बबिता यांच्या अपोझिट दिवंगत सुपरस्टार राजेश खन्ना होते. मात्र हा सिनेमा कमाल दाखवू शकला नाही. परंतु या सिनेमानंतर बबिता यांना काम मिळत गेले.
सुरुवातीला अपयशी सिनेमांनंतर बबिता यांनी चाखला यशाचा स्वाद-
त्यानंतर जितेंद्र यांच्यासोबत बबिता यांचा 'फर्ज' सिनेमा आला, या सिनेमाचे चर्चा एकवटली. सिनेमाच्या यशाने बबिता यांना स्टारडम म्हणून ओळख मिळाली. अशाप्रकारे बबिता यांना यशोशिखरावर पोहोचवले. त्यादरम्यान त्यांचे अनेक अविस्मरणीय सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीस आले होते. त्यामध्ये ‘किस्मत’, ‘तुमसे अच्छा कौन है’, ‘हसीना मान जाएगी’, ‘अनजाना’, ‘कब क्यूं और कहां’ आणि ‘पहचान’ हे सिनेमे सामील आहेत.

1971मध्ये बबिता यांच्या करिअरमधील एक 'कल आज और कल' हा सिनेमा महत्वाचा ठरला. कारण या सिनेमात त्यांचा प्रियकर आणि भावी पती रणधीर कपूर होते. रणधीर यांचा हा पहिला सिनेमा होता आणि याचे दिग्दर्शनसुध्दा त्यांनीच केले होते.

रणधीर यांच्यावर केले प्रेम, दोघांमधील लव्हस्टोरी 'कल आज और कल' सिनेमाच्या शूटिंगदरम्यान सुरु झाली होती. बबिता रणधीर यांना मिळवण्यासाठी आपले करिअर संपुष्टात आणायला निघाल्या होत्या. 6 नोव्हेंबर 1971 रोजी बबिता यांनी रणधीर कपूर यांच्याशी विवाह केला आणि तेव्हा ठरले, की बबिता आता सिनेमांमध्ये काम करणार नाहीत. कारण कपूर घराण्यातील कोणतीच मुलगी किंवा सून सिनेमांत करू शकत नव्हती. अखेर बबिता यांनी आपल्या करिअरला अलविदा म्हटले. लग्नानंतर बबिता यांनी 25 जून 1974 रोजी करिश्मा आणि 21 सप्टेंबर 1980 रोजी करीना कपूरला जन्म दिला. यादरम्यान बबिता आणि रणधीर यांच्यात खटके उडायला लागले. याचा परिणाम त्यांच्या वैवाहिक आयुष्यावर झाला आणि दोघे विभक्त झाले. बबिता आपल्या दोन्ही मुलींना घेऊन वेगळ्या राहू लागल्या. परंतु दोघांना ना दुसरे लग्न ना घटस्फोट घेतला.

ऋषी कपूर यांच्या मुलीच्या लग्नात उपस्थित नव्हत्या बबिता, करिश्मा आणि करीना-
असे सांगितले जाते, की बबिता यांचे ऋषी कपूर यांच्या कुटुंबीयांशी घट्ट नाते नाहीये. याचे उदाहरण 2006मध्ये ऋषी कपूर यांची मुलगी रिध्दीमा कपूरच्या लग्नात पाहायला मिळाले. या लग्नात बबितासह त्यांच्या दोन मुली करिश्मा आणि करीना सामील झाल्या नव्हत्या.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा बबिता यांची खास छायाचित्रे...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

Next Article

Recommended