Home »News» Mamta Kulkarni Controversial Journey From Bollywood To Spirituality

या प्रसिद्ध अॅक्ट्रेसच्या आयुष्याला आहे वादाची किनार, ग्लॅमरस आयुष्य सोडून बनली साध्वी

दिव्य मराठी वेब टीम | Apr 20, 2017, 00:00 AM IST

ममता कुलकर्णीचा जन्म 20 एप्रिल 1972ला मुंबईमधील एका मराठी कुटुंबात झाला. ममताला लाडाने राणी म्हणून बोलवत. बालपणी ती आपल्या मिथिला आणि मोलिना या दोन बहिणांसोबत मुंबईच्या यारी रोड वर्सोवा अंधेरी वेस्टमध्ये राहत होती. ममताला बालपणीपासूनच सिनेमांचे वेध होते. जवळपास 19 वर्षांच्या वयातच तिने सिनेमात काम करण्यास सुरूवात केली. 'डोंगा पुलिस' या तेलगू सिनेमामधून तिने आपल्या फिल्मी करिअरची सुरूवात केली.
बॉलिवूडमध्ये निर्माण केली खास ओळख...
ममता कुलकर्णी बॉलिवूडच्या एक अशी अभिनेत्री आहे, जिच्या अदांनी लाखो लोक घायल होत असे. वयाच्या 19 व्या वर्षी ममताने फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले होते. हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये तिने 1992 मध्ये 'तिरंगा'मधून आपल्या करिअरची सुरूवात केली. या सिनेमापासूनच लोक तिच्या सौंदर्यांचे दिवाने झाले होते. तिच्याकडे अनेक सिनेमांचे ऑफर यायला लागल्या होत्या. 1993 च्या 'आशिक आवारा' या सिनेमाने ममताला स्टार बनवले. या सिनेमासाठी तिला फिल्मफेअरचा न्यू फेस अवॉर्ड मिळाला. त्यानंतर 'वक्त हमारा है', 'क्रांतीवीर', 'करण अर्जुन', 'बाजी' या सिनेमांमध्ये ती झळकली. 2002 मध्ये आलेला 'कभी तुम कभी हम' हा तिचा शेवटचा सिनेमा होता.

पुढे वाचा, राजकुमार संतोषींवर लावला होता लैंगिक शोषणाचा आरोप...
- आईवडिलांची होती राणी...
- ड्रग माफियासोबत लग्न...
- इश्वरावर आहे आता पहिले प्रेम... यांसह ममताविषयी बरेच काही...

Next Article

Recommended