Home »Party» Arbaaz Khan Birthday Bash: Malaika Arora-Sunny Leone And Salman Family In Party

अरबाजच्या पार्टीत पोहोचली Ex-वाइफ मलायका, सनी लिओनीसह दिसले हे सेलेब्स

दिव्य मराठी वेब टीम | Aug 05, 2017, 17:53 PM IST

  • मलायका अरोरा, सनी लिओनी, युलिया वंतूरसोबत सोनाक्षी सिन्हा
मुंबईः शुक्रवारी अभिनेता सलमान खानचा धाकटा भाऊ अरबाज खानने त्याचा 50 वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने एका खास पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत अरबाजची पुर्वाश्रमीची पत्नी मलायका अरोरा व्हाइट कोर्ट टॉप अँड शॉर्ट स्कर्टमध्ये दिसली. पार्टीत सनी लिओनी तिच्या नव-यासोबत दाखल झाली. यावेळी सनी शायनी ग्रीन अँड ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये गॉर्जियस लूकमध्ये दिसली. तर सलमान खानची तथाकथित गर्लफ्रेंड युलिया वंतूर आणि अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा एकत्र दिसल्या.
आई हेलन आणि वडील सलीम खान पोहोचले पार्टीत...
- या पार्टीत अरबाजचा भाऊ सोहेल खान, आई हेलन आणि वडील सलीम खान सहभागी झाले होते.
- कुटुंबातील इतर सदस्यसुद्धा पार्टीत दिसले. सोहेलची पत्नी सीमा खान आणि मुलगा निर्वाण, बहीण अलविरा आणि तिचे पती अतुल अग्निहोत्री, मुलगी एलिजा अग्निहोत्री पार्टीत पोहोचले होते.
- तर अरबाजची धाकटी बहीण अर्पिता आणि तिचा पती आयुष मात्र पार्टीत दिसले नाही.
- सलमान खानसुद्धा या पार्टीत हजर होता.
- पार्टीत बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी दिसले. अमृता अरोड़ा, शकील लडक, सोनल चौहान, संजय कपूर, सूरज पंचोली, ईशा गुप्ता, बॉबी देओल, संजय कपूर, डेनियल वीवर, हिमांश कोहलीसह अनेक सेलेब्स अरबाजला बर्थडे विश करायला पोहोचले होते.

पुढे बघा, पार्टीचे PHOTOS...

Next Article

Recommended