Home » Feature » Celebrities Commercial Management

जाणून घ्या फिल्म स्टार्स आणि त्यांच्या सेक्रेटरीच्या नात्यातील सत्य

जयप्रकाश चौकसे | Jan 03, 2013, 13:18 PM IST
 • जाणून घ्या फिल्म स्टार्स आणि त्यांच्या सेक्रेटरीच्या नात्यातील सत्य

  माधुरी दीक्षित नेने आपल्या कुटुंबीयांबरोबर भारतात स्थायिक झाली. मात्र मुंबईत स्थायिक होताना तिने सत्तावीस वर्षांपासून तिचे सेक्रेटरी असलेल्या रिक्कू राकेशनाथ यांची कामावरुन हकालपट्टी केली. माधुरी भारतात स्थायिक झाल्यामुळे आपणच तिचे सेक्रेटरी राहू असे राकेशनाथ यांना वाटत होते. मात्र अमेरिकेत अनुभवी आणि कॉर्पोरेट कंपन्या कलाकारांचे काम सांभाळतात हे माधुरीने बघितले होते. त्यामुळे राकेशनाथ यांना डच्चू देत माधुरीने आपला सगळा कारभार सांभाळण्याची जबाबदारी रेशमा शेट्टी यांना दिली.

 • जाणून घ्या फिल्म स्टार्स आणि त्यांच्या सेक्रेटरीच्या नात्यातील सत्य

  रेशमा शेट्टीने चार वर्षांपूर्वी सलमान खानच्या बिझनेस मॅनेजरच्या रुपात काम सांभाळले होते. सोबतच कतरिना कैफ आणि करीना कपूर यांचेही काम ती बघते. रेशमा शेट्टीने या कलाकारांना अनेक फिल्म्स आणि जाहिराती मिळवून दिल्या. रेशमाची काम करण्याची पद्धत, व्यवहार कुशलता आणि कामातील पारदर्शकता यामुळे अनेक कलाकारांबरोबर करण जौहरनेही तिला आपले काम सोपवले. मात्र करणने अनाधिकृतपणे तिचे छायाचित्र मीडियाला दिल्यामुळे ती त्याच्यावर नाराज झाली. रेशमाला प्रसिद्धी आवडत नाही. ज्या लोकांचे कामच बोलतं, त्यांना प्रचाराची आवश्यकता नसते.

 • जाणून घ्या फिल्म स्टार्स आणि त्यांच्या सेक्रेटरीच्या नात्यातील सत्य

  तसे पाहता कलाकारांच्या सेक्रेटरींची कहाणी मोठी आहे. अनेक कलाकारांच्या सेक्रेटरींनी निर्मितीतही आपला हात आजमावला. मात्र ते या क्षेत्रात अयशस्वी ठरले. खुद्द माधुरी दीक्षितने रिक्कू राकेशनाथच्या तीन सिनेमांमध्ये काम केले. मात्र ते सिनेमे फारसे चालू शकले नाही.
  कलाकारांच्या बॉक्स ऑफिसवरील गणितानुसार त्यांचे सेक्रेटरी ओळखले जातात.
  करीनाने करिश्माचा सेक्रेटरी जाहिदला फक्त आपले कामच दिले नाही तर शाहीद कपूरचेही काम मिळवून दिले. कलाकारांच्या सेक्रेटरींना त्यांचा आर्थिक कारभार सांभाळण्याबरोबरच त्यांच्या प्रसिद्धीकडेही विशेष लक्ष द्यावे लागते.
  ज्येष्ठ अभिनेते प्राण यांचे सेक्रेटरी बाबूभाई खूपच साधे व्यक्ति होते. रेखाची सेक्रेटरी फरजानाचा वेगळाच दरारा राहिला आहे. फरजाना एकेकाळी सहायक दिग्दर्शिका म्हणून काम करत होती. मात्र रेखाबरोबर मैत्री झाल्यानंतर त्यांनी रेखाची सेक्रेटरी म्हणून काम बघायला सुरुवात केली. फरजाना आजही रेखाची सेक्रेटरी आहे.

 • जाणून घ्या फिल्म स्टार्स आणि त्यांच्या सेक्रेटरीच्या नात्यातील सत्य

  कलाकार आणि त्यांचे सेक्रेटरी एकमेकांशी सांकेतिक भाषेत बोलतात. कलाकारांना एखाद्या व्यक्तीबरोबर भेटायची इच्छा नाहीये हे लगेचच त्यांच्या सेक्रेटरीच्या लक्षात येतं. सेक्रेटरींना कलाकारांच्या प्रेमप्रकरणांचीही संपूर्ण माहिती असते.
  कुमार मंगत अजय देवगणचे सेक्रेटरी असून एक निर्माताही आहेत. शत्रुघ्न सिन्हा आणि अमिताभ बच्चन यांचा सेक्रेटरी म्हणून पवन सिन्हा काम बघत होते. मात्र नंतर अमिताभ यांनी शीतलची नियुक्ती त्यांच्या सेक्रेटरीच्या रुपात केली.
  सध्याच्या काळात कलाकारांच्या सेक्रेटरीचे काम आणि त्यांचे अधिकार मर्यादित झाले आहेत. आता बिझनेस मॅनेजर महत्त्वाचा असतो. त्यांचा स्वतंत्र चार्टर्ड अकाउंटंट असतो. पैसा इतर व्यवसायात कसा गुंतवायचा याचा सल्ला तो कलाकाराला देत असतो. आज कलाकार जणू स्वतंत्र उद्योग झाला आहे. कलाकाराचा पर्सनल फिजिकल ट्रेनर, फिजियोथेरिपिस्ट असतो. कलाकारांचे ऑफिस कॉर्पोरेट ऑफिससारखे आहेत.

Email Print
0
Comment