Home »Flashback» 25th Death Anniversary Of Actor Amjad Khan Read His Famous Dialogues

Remembrance : 'शोले'मुळे मिळाले होते स्टारडम, हे आहेत अमजद खान यांचे फेमस डायलॉग्स

दिव्य मराठी वेब टीम | Jul 27, 2017, 10:29 AM IST

मुंबई- 'कितने आदमी थे...' 'शोले' सिनेमातील हा डायलॉग ऐकूनच आपल्याला गब्बरची आठवण येते. 'शोले' सिनेमात गब्बरची भूमिका अमजद खान यांनी साकारली होती. या डायलॉगमुळे अमजद खान एका रात्रीतून स्टार झाले होते, असे म्हटले जाते. 'शोले' हा सिनेमा रिलीज होण्यापूर्वी पर्यंत अमजद खान यांना क्वचितच लोक ओळखत होते. मात्र या सिनेमातील गब्बरच्या भूमिकेने त्यांना स्टारडम मिळवून दिले. 12 नोव्हेंबर 1940 रोजी पेशावर, ब्रिटीश इंडिया (आता पाकिस्तान) मध्ये जन्मलेल्या अमजद यांचे 27 जुलै 1992 रोजी मुंबईमध्ये निधन झाले. त्यांचा मृत्यू होऊ 25 वर्षे उलटून गेलीत. आपल्या फिल्मी करिअरमध्ये त्यांनी 'शोले', 'परवरिश', 'मुकद्दर का सिकंदर', 'लावारिस', 'हीरालाल-पन्नालाल', 'सीतापुर की गीता', 'हिम्मतवाला' आणि 'कालिया'सारखे हिट सिनेमे दिले. जवळपास 130 सिनेमांत कारण करणा-या अमजद खान यांचे अनेक डायलॉग्स आजही आठवणीत आहेत.

divyamarathi.com तुम्हाला अमजद खान यांच्या काही सिनेमांतील हिट डायलॉग्स सांगत आहे, पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा अमजद यांचे लोकप्रिय डायलॉग्स...

Next Article

Recommended