Home »Gossip» Alia Bhatt Turn 25 Today

आलिया@24 : बोल्ड आणि बिनधास्त आहे महेश भट यांची कन्या, फोटोशूटसाठी झाली होती न्यूड

दिव्य मराठी वेब टीम | Mar 15, 2017, 15:20 PM IST


करण जोहरची निर्मिती असलेल्या 'स्टुडंट ऑफ द इअर' या सिनेमातून छाप सोडणारी महेश भट आणि सोनी राजदान यांची कन्या आलिया भट आता 24 वर्षांची झाली आहे. 15 मार्च रोजी आलियाने वयाच्या 25व्या वर्षांत पदार्पण केले आहे. 'स्टुडंट ऑफ द इयर' या पहिल्याच सिनेमातून बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी आलिया केवळ पडद्यावरच नव्हे तर खासगी आयुष्यातदेखील बोल्ड आणि बिनधास्त आहे.
पडद्यावर इंटिमेट सीन्स करण्यास कसलीही अडचण नाही, असे तिने अनेकदा आपल्या मुलाखतींमध्ये सांगितले आहे. 'स्टुडंट ऑफ द इयर' या सिनेमात आलियाने केवळ बिकिनीच नव्हे तर लिपलॉक सीनसुद्धा दिला होता. याशिवाय गेल्यावर्षी रिलीज झालेल्या 'टू स्टेट्स' या सिनेमातदेखील अभिनेता अर्जुन कपूरसोबत तिने स्मूच सीन दिले होते. नुकताच तिचा बद्रीनाथ की दुल्हनिया हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दाखल झाला असून सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आहे.
सिल्व्हर स्क्रिनवर बिनधास्त दिसणा-या आलियाने फोटोशूटसाठीदेखील बोल्ड पोज दिल्या आहेत. प्रसिद्ध फोटोग्राफर डबू रत्नानींच्या सेलिब्रिटी कॅलेंडरमध्ये आलियाने चक्क न्यूड पोज दिली होती. तिच्या या फोटोशूटची खूप चर्चादेखील झाली होती. ''बहीण पूजा भटने अनेक सिनेमात बोल्ड भूमिका केल्या आहेत. त्यामुळे घरच्या मंडळीकडून आम्हाला कामाबाबत विरोध होत नाही. माझे निर्णय मीच घेते. मला स्वत:वर विश्वास असल्यामुळे मी पापांकडून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी काहीही मदत घेतली नाही. भविष्यात त्यांच्या सिनेमातही काम करण्यास आपल्याला आवडेल'', असे अलियाने एका मुलाखतीत म्हटले.
'संघर्ष'पासून प्रवास सुरू
1999 मध्ये आलिया भटने तनुजा चंद्रा यांच्या 'संघर्ष' या सिनेमात बालकलाकाराची भूमिका केली होती. नरबळी या विषयावर हा सिनेमा आधारित होता. त्या वेळी तिच्या छोटेखानी भूमिकेचे सर्वांनी कौतुक केले होते. त्यानंतर तिने अभिनयाचे धडे गिरवण्यास सुरुवात केली.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, आलियाचे यापुर्वी कधीही न पाहिलेले रुप....

Next Article

Recommended