Home »Gossip» Jumma Chumma Girl Kimi Katkar Sizzling Yesteryear Actress Looks Like Now

दीर्घ काळानंतर दिसली BIG B सोबत झळकलेली ही अॅक्ट्रेस, आता ओळखणेही आहे कठीण

दिव्य मराठी वेब टीम | Jul 15, 2017, 10:16 AM IST


एन्टरटेन्मेंट डेस्कः अमिताभ बच्चन यांच्या 'हम' सिनेमातील 'जुम्मा चुम्मा दे दे' या गाण्याने प्रसिद्ध झालेली अभिनेत्री किमी काटकर आठवतेय का तुम्हाला... एकेकाळी बॉलिवूडमध्ये बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणून किमीला ओळखले जायचे. ब-याच वर्षांनी एका इव्हेंटमध्ये किमीने हजेरी लावली होती. अभिनेत्री पूनम ढिल्लनने किमी काटकरसोबतचा फोटो इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. किमी या फोटोत मराठमोळ्या लूकमध्ये दिसतेय. एवढ्या वर्षांत तिचा लूक एवढा बदलाल, की यावेळी तिला ओळखणेही कठीण झाले आहे.

'हम' सिनेमातील 'जुम्मा चुम्मा...' गाण्यामुळे झाली होती हिट...
1991 साली किमीला अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'हम' सिनेमात झळकण्याची संधी मिळाली. हा किमीच्या करिअरमधील हिट सिनेमा होता. या सिनेमात तिने जुम्मा नावाच्या मुलीची भूमिका साकारली होती. या सिनेमातील 'जुम्मा चुम्मा...' हे गाणे सुपरहिट ठरले होते. या सिनेमातील 'जुम्मा चुम्मा...' हे गाणं बरंच गाजलं होतं. सुदेश भोसलेबरोबर कविता कृष्णमुर्तीने या गाण्याला स्वरसाज चढवला होता.

पुढे वाचा, आता कुठे आहे किमी काटकर, का नव्हती तिला बॉलिवूडची रीत पंसत आणि बरंच काही...

Next Article

Recommended