Home »Gossip» These Top Actresses Of Bollywood Were Once Vijay Mallyas Kingfisher Calender Girl

कॅटरीनापासून दीपिकापर्यंत, या अभिनेत्रींना मिळाला होता माल्याच्या कॅलेंडरमधून बिग ब्रेक

दिव्य मराठी वेब टीम | Apr 19, 2017, 10:18 AM IST

मुंबई - गेल्या 13 महिन्यापासून फरार असलेल्या विजय माल्याला अखेर लंडन येथून अटक करण्यात आली आहे. तसे पाहिले तर विजय माल्या त्याच्या बिझनेससोबत 'कॅलेडर गर्ल' मुळेही फार चर्चेत होता. बॉलिवूडमध्ये एंट्री करण्यासाठी बऱ्याचशा मॉडेलनी या कॅलेंडरचा आधार घेतला होता. माल्याची 'कॅलेंडर गर्ल' बनल्यानंतर अनेक मॉडेल्स बॉलिवूडमध्ये टॉपच्या अभिनेत्री बनल्या. त्यात कॅटरीना ते दीपिकाचाही समावेश आहे.
कॅटरीनाच्या कॅलेंडर गर्लचा प्रवास..
साल 2003 साली कैजाद गुस्ताद यांच्या 'बूम' चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करणारी कॅटरीना कैफ याचवर्षी किंगफिशर कॅलेंडर गर्ल बनली होती. आज कॅटरीनाची ओळख बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. रणबीर कपूर आणि सलमान खान यांच्यासोबत असलेल्या प्रेमसंबंधामुळे कॅटरीना जास्त प्रकाशझोतात आली. कॅटरीनाने 'नमस्ते लंडन', 'वेलकम', 'राजनिती', 'बँग बँग', 'धूम-3' आणि 'एक था टायगर' यांसारखे हिट चित्रपट दिले. कॅटरीना आता 'टायगर जिंदा है' आणि 'जग्गा जासूस' या आगामी चित्रपटात दिसून येणार आहे.
काय आहे किंगफिशर कॅलेंडर गर्ल
किंगफिशर कैलेंडर (स्विमसूट) विजय माल्याच्या यूबी ग्रुपद्वारा प्रकाशित केले जाते. भारतात याला मॉडेल्स आणि अभिनेत्रींसाठी बेस्ट लाँचिंग प्लॅटफॉर्म मानले जाते. याची सुरुवात 2003 साली झाली होती. फोटोग्राफर अतुल कस्बेकर अगोदरपासून या प्रोजेक्टमध्ये आहेत. 2010 पासून या कॅलेंडरसाठी मॉडेल हंट सुरु करण्यात आले. याची शूटिंग साऊथ आफ्रिका, मॉरीशस, थायलँड, फ्रांस आणि गोवासारख्या लोकेशन्सवर होते.
कॅटरीनाव्यतिरीक्त दीपिका पादुकोन, सयामी खैर, लीसा हेडन, नर्गिस फाक्री यांसारख्या अभिनेत्रींनी कॅलेंडर गर्ल बनल्यानंतर बी टाऊनमधेय डेब्यू केला.
अशाच 13 मॉडेल्सविषयी जाणण्यासाठी पुढच्या स्लाईडवर क्लिक करा.

Next Article

Recommended