Home »Gossip» When Esha Deol Slapped Amrita Rao In Pyare Mohan Movie Set

ईशाने अमृताला मारली होती थोबाडीत, इतरही अॅक्ट्रेसेसमध्ये आहे 36 चा आकडा

दिव्य मराठी वेब टीम | Jun 17, 2017, 09:09 AM IST

  • ईशा देओल आणि अमृता राव.
एंटरटेनमेंट डेस्क - बॉलिवूड अॅक्ट्रेसेसमध्ये ब्वॉयफ्रेंड आणि रिलेशनशिपमुळे नेहमी वाद होत असतात. पण अनेकदा हे प्रकरण एवढे चिघळते की, त्यांच्यात मारहाणही होत असते. 2006 मधील 'प्यारे मोहन' चित्रपटाच्या शुटिंगदरम्यानही असेच काही झाले होते. ईशा देओल आणि अमृता राव यांच्यात तेव्हा वाद झाला होता. त्यावेळी ईशा आणि अमृता एकमेकिंना सेटवर एवढा तिरस्कार करायच्या की, एकदा भांडणामध्ये ईशाने अमृताला सेटवरच थोबाडीत मारले होते.

असे होते पूर्ण प्रकरण..
- एका मुलाखतीत ईशाने कबूल केले होते की, तिने अमृताला रागात थोबाडीत मारले होते.
- ईशाने सांगितले की, नोव्हेंबर 2005ची ही गोष्ट आहे. पॅकअपनंतर अमृताने डायरेक्टर इंद्रकुमार आणि कॅमरामॅनसमोरच माझ्यावर कमेंट करत माझ्याबाबत वाईट बोलायला सुरुवात केली होती.
- त्याचा मला प्रचंड राग आला. मला वाटले याचे उत्तर देणे गरजेचे आहे. मी मागेपुढे पाहिले नाही आणि तिला एक थोबाडीत लगावली.
- मला मी जे काही केले त्याबाबत वाईट वाटले नाही. कारण तिने जे काही म्हटले होते, त्याचे उत्तर असेच असू शकते.
- अमृतालाही नंतर तिची चूक समजली आणि तिने माझी माफी मागितली आणि मीही तिला माफ केले.
- अमृताने एका मुलाखतीत सांगितले होते की, या प्रकरणासाठी ईशाला दोषी ठरवता येणार नाही आणि मलाही याबाबत फार काही बोलायचे नाही.

पुढील स्लाइड्सवर कधी रोल तर कधी बॉयफ्रेंडवरून भांडल्या अॅक्ट्रेसेस..

Next Article

Recommended