Home »Bollywood »Marathi Cinekatta» Story About Sayali Patil From Marathi Serial

इंजिनीअर आहे 'अस्सं सासर..'मधली नवी 'जुई', पार्वतीच्या भूमिकेमुळे मिळाली ओळख

दिव्य मराठी वेब टीम | Aug 16, 2017, 11:35 AM IST

एंटरटेनमेंट डेस्क - कलर्स मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'अस्सं सासर सुरेख बाई' मधली जुईची भूमिका करणारी मृणाल दुसानीस हिच्या जागी मालिकेमध्ये लवकरच दुसरी अॅक्ट्रेस पाहायला मिळणार आहे. मृणालने कुटुंबाला वेळ देता यावा म्हणून मालिकेतून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तिच्या जागी कलर्सवरीलच गणपती बाप्पामध्ये पार्वती साकारणाऱ्या सायली पाटलीची वर्णी लागली आहे. सायली लवकरच अस्सं सासर.. मालिकेमध्ये जुईच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहे.

इंजिनीअर आहे सायली...
सायलीचा जन्म 6 ऑगस्ट ला झालेला असून सध्या ती विद्यालंकार इन्सिटीट्यूय ऑफ टेक्नॉलॉजी, वडाळा मधून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरींग करतेय. जर अॅक्टींगमध्ये आले नसते तर इंजिनीअर बनून एखाद्या आयटी कंपनीत कामाला असते, असे सायली म्हणते.

पुढील स्लाइड्सवर वाचा, सायली पाटील विषयीची काही माहिती...

Next Article

Recommended