Home » Hollywood » Tough Competition In Oscar Awards Ceremony

OSCARSच्या या इंट्रेस्टिंग गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत का ?

ज्योत्सना पंत | Feb 23, 2013, 15:07PM IST
 • OSCARSच्या या इंट्रेस्टिंग गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत का ?

  सुरुवातीच्या काळात ऑस्कर नाईटविषयी सस्पेन्स राहात नव्हता. कारण विजेत्याच्या नावाची घोषणा तीन महिन्यांपूर्वीच केली जात होती. हळूहळू यात बदल होत गेला. विजेत्यांच्या नावाची घोषणा आधी करण्याऐवजी अवॉर्ड नाईटच्याच दिवशी केली जाऊ लागली. मात्र सगळ्या मीडिया हाऊसला याची माहिती रात्री अकरापर्यंत पाठवून दिली जात होती. 1940 पर्यंत ही पॉलिसी चालली. मात्र 1940 साली लॉस एंजिलिस टाईम्सने अवॉर्ड नाईटच्यापूर्वीच आपल्या इव्हिनिंग एडीशनमध्ये विजेत्यांच्या नावाची यादी प्रकाशित केली होती. त्यामुळे अवॉर्ड सोहळ्याचे सस्पेन्सवर पाणी फिरले. तेव्हापासून विजेत्यांची नावे बंद लिफाफ्यात ठेवली जातात आणि लाईव्ह प्रोग्राममध्येच विजेत्यांच्या नावाची घोषणा केली जाऊ लागली. 1941 सालापासून तब्बल 2600 हून अधिक विजेत्यांच्या नावाचे लिफाफे गोळा झाले आहेत.

  पहिला ऑस्कर अवॉर्ड सोहळा 16 मे 1929 रोजी हॉलिवूडच्या रुजवेल्ट हॉटेलच्या बँक्वेट हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता. या पहिल्या अवॉर्ड सोहळ्यात जवळपास 270 लोक सहभागी झाले होते. येथे येणा-या पाहुण्यांना पाच डॉलरचे तिकिट खरेदी करावे लागले होते. यामध्ये 15 ऑस्कर ट्रॉफी वितरीत करण्यात आल्या होत्या. पहिला ऑस्कर जिंकणारे जर्मनीचे ट्रॅजेडी किंग एमिल जॅनिंग होते. दुस-या वर्षीच ऑस्कर अवॉर्डला एवढी प्रसिद्धी प्राप्त झाली की लॉस एंजिलिसच्या रेडिओ स्टेशनवर पूर्ण कार्यक्रम एक तास लाईव्ह प्रसारित करण्यात आला होता.

  ऑस्कर सोहळ्यात सहभागी होणा-या पाहुण्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली होती. त्यामुळे 16 वा ऑस्कर अवॉर्ड सोहळा बँक्वेट हॉलऐवजी पहिल्यांदा ग्रॉमॅनच्या चायनीज थिएटरमध्ये आयोजित करण्यात आला. 1953 साली पहिल्यांदा हा अवॉर्ड सोहळा टीव्हीवर टेलिकास्ट झाला. अमेरिका आणि कॅनडाच्या लाखो प्रेक्षकांनी घरबसल्या हा अवॉर्ड सोहळा बघितला होता. अवॉर्ड सोहळ्याचे कलर ब्रॉडकास्टिंग 1966 मध्ये झाले आणि 1969 साली हा अवॉर्ड सोहळा आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसारित करण्यात आला होता.

  ऑस्करविषयीची अधिक रोचक माहिती जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

 • OSCARSच्या या इंट्रेस्टिंग गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत का ?

  यंदाच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या विभागात 10 चित्रपट

  चित्रपट - लिंकन, अर्गो, लेस मायजरेबल्स, लाईफ ऑफ पाय, आमोर, डीजंगो अनचेन्ड, सिल्व्हर लाईनिंग प्लेबुक, जीरो डार्क थर्टी, बीस्ट्स ऑफ द साउदर्न वाइल्ड.

  या दहा चित्रपटांपैकी अर्गो, आमोर आणि लिंकन या सिनेमांमध्ये टफ कॉम्पिटीशन आहे. लिंकनला 12 विभागात ऑस्कर नामांकन मिळाले आहे.

 • OSCARSच्या या इंट्रेस्टिंग गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत का ?

  ट्विटरवर ऑस्कर अवॉर्ड्सचे 2,56,522 फॉलोअर्स आहेत.

 • OSCARSच्या या इंट्रेस्टिंग गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत का ?

  अ‍ॅकडमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट्स अ‍ॅण्ड साइंसेज ऑस्करच्या वोटिंग कॅम्पेनसाठी तब्बल 50,00,000 डॉलर इतका खर्च करते.

 • OSCARSच्या या इंट्रेस्टिंग गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत का ?

  अवॉर्ड सोहळ्यादरम्यान एका जाहिरातीसाठी 15,00,000 डॉलर इतका खर्च करावा लागतो.

 • OSCARSच्या या इंट्रेस्टिंग गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत का ?

  ऑस्कर अवॉर्ड विजेत्याला पैशांच्या रुपात बक्षिस दिले जात नाही. फक्त ट्रॉफी दिली जाते.

 • OSCARSच्या या इंट्रेस्टिंग गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत का ?

  ऑस्कर ट्रॉफी

  3.5 इंच उंच आणि 8.5 पाऊंड वजनाची ऑस्कर ट्रॉफी असते. एक ट्रॉफी बनवण्याचा खर्च 500 डॉलर इतका असतो. अशा 50 ट्रॉफी बनवण्यासाठी तीन ते चार आठवड्यांचा कालवधी लागतो. ऑस्कर ट्रॉफी तयार करण्याची जबाबदारी शिकागोच्या आरएस ओवस अ‍ॅण्ड कंपनीकडे आहे. ट्रॉफीला मेट्रो गोडवायन मेयरच्या डायरेक्टर सेड्रिक गिब्सन यांनी डिझाइन केले आहे. या ट्रॉफीत एक व्यक्ती तलवार घेऊन चित्रपटाच्या रिलवर उभा आहे. चित्रपटाचे रिल अ‍ॅकडमीच्या पाच शाखा अर्थातच अ‍ॅक्टर्स, डायरेक्टर्स, प्रोड्युसर्स, टेक्निशिअन्स आणि रायटर्सचे प्रतिक आहे. 85व्या ऑस्कर अवॉर्ड ची ट्रॉफीला पहिल्या ऑस्कर नॅशनल टूरच्या अंतर्गत अमेरिकेच्या दहा शहरांमध्ये फिरवली जाते. येथे चाहत्यांना ट्रॉफीबरोबर छायाचित्रे काढण्याची संधी मिळते.

Email Print
0
Comment