Home »Bollywood »Marathi Cinekatta» Aamir Khan And Kiran Rao In Chala Hawa Yeu Dya

'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर आमिरने उभारली गुढी, जाणून घ्या शोमध्ये हजेरी लावण्याचे कारण

दिव्य मराठी वेब टीम | Mar 15, 2017, 11:25 AM IST

मुंबईः 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमाची हवा बॉलिवूडमध्ये जोरात पसरली आहे. या मंचावर आजवर सलमान खान, जॉन अब्राहम, सोनम कपूर, कंगना रनोट, काजोल, अजय देवगण, इरफान खान, अक्षय कुमार, शाहरुख खान, गोविंदा यांसारख्या बॉलिवूडमधील सेलिब्रेटींनी त्यांच्या सिनेमांच्या प्रमोशनच्या निमित्ताने हजेरी लावली. आता या बॉलिवूड कलाकारांच्या यादीत मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानच्या नावाची नोंद झाली आहे. ​आमिर खानने नुकतीच पत्नी किरण रावसोबत 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमात हजेरी लावली आहे.

आमिरने त्याच्या वाढदिवशी म्हणजे 14 मार्च रोजी या खास भागाचे चित्रीकरण केले. पत्नी किरणसोबत आमिरने चला हवा येऊ द्याच्या मंचावर गुढी उभारली. आमिर खानने या कार्यक्रमात मजा मस्ती करण्यासोबतच त्याचा वाढदिवस 'चला हवा येऊ द्या'च्या टीमसोबत साजरा केला.
पाणी फाऊंडेशनसाठी लावली हजेरी...
आमिरने या रिअॅलिटी शोमधे सहभाग घेण्याचे खास कारण म्हणजे या मनोरंजन कार्यक्रमाच्या माध्यमातून पाणी फाऊंडेशनची माहिती व महती दूरवर पोहचावी. मालाडच्या पाठारे वाडीतील स्टुडिओत याचे चित्रण झाले. गुढीपाडवा विशेष म्हणून या खास भागाचे प्रक्षेपण होणार आहे.
आपल्या महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर पाण्याची प्रचंड समस्या आहे. त्यासाठीच पाणी फाऊंडेशन काम करते. किरण राव गेल्या अनेक महिन्यांपासून पाणी फाऊंडेशनचे काम पाहात आहे. तसेच सत्यजीत भटकळदेखील या कार्यक्रमात आवर्जून उपस्थित होते. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील विविध भागांमधून काही शेतकरीदेखील आले होते. त्यांनी त्यांचे अनुभव, त्यांच्या कथा या कार्यक्रमाद्वारे लोकांसोबत शेअर केल्या.

कसे काम करते पाणी फाऊंडेशन...
आमिर खानने गेल्या वर्षी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेअंतर्गत दुष्काळग्रस्त गावांना पाणी साठवण्याचे आवाहन करण्यात आले होते. महाराष्ट्रातल्या अनेक गावांनी यात सहभाग घेतला होता. 116 गावांनी या स्पर्धेत सहभागी झाले होते. या स्पर्धेच्या माध्यमातून जवळपास 1 कोटी 367 लाख लीटर पाण्याचा साठा जमा करण्याची क्षमता निर्माण झाली. हेच लक्षात घेता पाणी फाऊंडेशनने एक पाऊल पुढे टाकत आणखी लोकांमध्ये यासंबंधी जन जागृती निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षी 8 एप्रिल ते 22 मे रोजी ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेत विजयी होणाऱ्या पहिल्या गावाला 50 लाखांचे, दुसऱ्या गावाला 30 लाखांचे आणि तिसऱ्या गावाला 20 लाखांचे रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. आमिर आणि किरणने एक यासंबंधी जनजागृती करणार एका व्हिडिओ तयार केला आहे. या व्हिडिओला अजय- अतुल यांनी संगीतबद्ध केले आहे तर गुरु ठाकूर यांनी याचे शब्द दिले आहेत. किरण रावने या गाण्याला आपला आवाज दिला आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा, 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर क्लिक झालेली आमिर आणि किरण रावची खास छायाचित्रे..

Next Article

Recommended