Home »Bollywood »Marathi Cinekatta» Akash Thosar First Look In FU Movie

नव्या सिनेमात असा आहे 'परश्या' चा लूक, रिलीज झालंय पोस्टर

दिव्य मराठी वेब टीम | Apr 15, 2017, 08:31 AM IST

‘सैराट’ फेम आकाश ठोसर म्हणजेच परशाचा नवा सिनेमा एफयूचं पोस्टर रिलीज झालं आहे. यामध्ये आकाश ठोसरचा पहिला लूक समोर आला आहे. यापूर्वी सलमान खानच्या हस्ते सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला होता.
महेश मांजरेकर दिग्दर्शित आकाशच्या नवीन सिनेमाचे नाव आहे 'FU'. आता 'FU' या शीर्षकात नेमके दडले तरी काय हा प्रश्न साहजिकच तुमच्या मनात डोकावला असेल ना... 'FU'चा अर्थ आहे Fun Unlimited. अर्थात हे आहे आकाशच्या नवीन सिनेमाचे नाव. हा सिनेमा तरूणाईवर आधारित असल्याचे महेश मांजरेकर सांगतात. या सिनेमात चार मित्रांची गोष्टी आहे. महेश मांजरेकर सांगतात, की याच्या इनिशियल्समधून त्याचा अर्थ उघड होतो. मात्र सेन्सॉर बोर्डासाठी या सिनेमाचे नाव ‘फन अनलिमिटेड’ आहे. आम्हाला वाद नकोय, असे मांजरेकर उपहासाने म्हणाले. 2 जून रोजी आकाशचा हा नवा सिनेमा रिलीज होणार आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहा फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

Next Article

Recommended