Home »Bollywood »Marathi Cinekatta» Marathi Actress Manava Naik Tie The Knot With Sushant Tungare

Wedding Pix: मनवा नाईकचे झाले शुभमंगल सावधान! सुशांत तुंगारेसोबत चढली बोहल्यावर

दिव्य मराठी वेब टीम | Mar 20, 2017, 11:45 AM IST

‘चुकभूल द्यावी घ्यावी’ या मालिकेतून निर्मिती क्षेत्रात उतरलेली अभिनेत्री मनवा नाईक अलीकडेच लग्नाच्या बेडीत अडकली. निर्माता सुशांत तुंगारेची मनवाने जोडीदाराच्या रुपात निवड केली. अतिशय धुमधडाक्यात दोघांचे शुभमंगल झाले. त्यांच्या लग्नाला मराठी इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली होती. श्रेया बुगडे, नीना कुलकर्णी, सुकन्या मोने, आदिती सारंगधर, अमृता संत यांच्यासह अनेक जण मनवा आणि सुशांतला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा द्यायला पोहोचले होते. श्रेया बुगडेने मनवा आणि सुशांत यांच्या लग्नाचे काही फोटोज तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरसुद्धा शेअर केले आहेत.
निर्मिती क्षेत्रात येण्यापूर्वी मनवा अनेक सिनेमांतून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. ‘क्षणभर विश्रांती’, ‘शहाणपण देगा देवा’, ‘दम असेल तर’, ‘काकस्पर्श’, ‘नो एंट्री पुढे धोका आहे’, ‘कँडल मार्च’, ‘पिंडदान’ तसेच मागील वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘जाऊ द्या ना बाळासाहेब’ या चित्रपटात मनवा नाईकने लक्षवेधी भूमिका साकारली होती. मनवाच्या जोडीदार सुशांत तुंगारे हा निर्माता असून, अनेक मालिकांची निर्मिती त्याने केली आहे. सध्या छोट्या पडद्यावर सुरु असलेल्या ‘चुकभूल द्यावी घ्यावी’ ही मालिका मनवा नाईक आणि सुशांत तुंगारे यांची निर्मिती आहे. ‘सरस्वती’ या मालिकेची निर्मितीदेखील सुशांत तुंगारे यांचीच आहे. यापूर्वी मनवाचा मेहंदी कार्यक्रम पार पडला होता. मेहंदी कार्यक्रमासोबतच मनवासाठी ‘प्री वेडिंग बॅश’चे आयोजन तिच्या मैत्रिणींनी केल्याचे पाहायला मिळाले होते. क्षिती जोग, क्रांती रेडकर, चिन्मयी सुमीत यांच्यासह मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक जणी मनवाच्या प्री वेडिंग बॅशमध्ये सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले होते.

पुढील स्लाईड्सवर बघा, मनवा आणि सुशांत यांच्या लग्नाचे खास फोटोज...

Next Article

Recommended