Home »Bollywood »Marathi Cinekatta» Marathi Actress Manava Naik Wedding Album

मनवाने शेअर केले आयुष्यातील खास क्षण, बघा मनवा-सुशांतचा Wedding Album

दिव्य मराठी वेब टीम | Mar 25, 2017, 18:21 PM IST

‘चुकभूल द्यावी घ्यावी’ या मालिकेतून निर्मिती क्षेत्रात उतरलेली अभिनेत्री मनवा नाईक अलीकडेच म्हणजे 19 मार्च रोजी लग्नाच्या बेडीत अडकली. निर्माता सुशांत तुंगारेची मनवाने जोडीदाराच्या रुपात निवड केली. मनवा आणि सुशांत यांनी कुटुंबिय आणि मित्रमंडळींच्या उपस्थित रजिस्टर्ड मॅरेज केले. लग्नानंतर मनवाने आज (25 मार्च) लग्नाचे खास फोटोज स्वतःच्या फेसबुक पेजवर शेअर केले आहेत. या फोटोजमध्ये मनवाचे मेंदी, संगीत, लग्नाचे खास क्षण बघायला मिळतात.
या लग्नाला मराठी इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली होती. श्रेया बुगडे, नीना कुलकर्णी, सुकन्या मोने, आदिती सारंगधर, अमृता संत यांच्यासह अनेक जण मनवा आणि सुशांतला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा द्यायला पोहोचले होते.
निर्मिती क्षेत्रात येण्यापूर्वी मनवा अनेक सिनेमांतून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. ‘क्षणभर विश्रांती’, ‘शहाणपण देगा देवा’, ‘दम असेल तर’, ‘काकस्पर्श’, ‘नो एंट्री पुढे धोका आहे’, ‘कँडल मार्च’, ‘पिंडदान’ तसेच मागील वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘जाऊ द्या ना बाळासाहेब’ या चित्रपटात मनवा नाईकने लक्षवेधी भूमिका साकारली होती. मनवाच्या जोडीदार सुशांत तुंगारे हा निर्माता असून, अनेक मालिकांची निर्मिती त्याने केली आहे. सध्या छोट्या पडद्यावर सुरु असलेल्या ‘चुकभूल द्यावी घ्यावी’ ही मालिका मनवा नाईक आणि सुशांत तुंगारे यांची निर्मिती आहे. ‘सरस्वती’ या मालिकेची निर्मितीदेखील सुशांत तुंगारे यांचीच आहे.
पुढील स्लाईड्सवर बघा, मनवाने शेअर केलेला लग्नाचा अल्बम...
(फोटो सौजन्यः मनवा नाईक फेसबुक पेज)

Next Article

Recommended