Home »Bollywood »Marathi Cinekatta» Rutvik Kendre Will Be Debut From Marathi Movie Dry Day

'ड्राय डे' सिनेमातून डेब्यू करणार ऋत्विक, वडिल आहेत रंगभूमीवरील दिग्गज नाव

दिव्य मराठी वेब टीम | Aug 13, 2017, 15:36 PM IST

एंटरटेनमेंट डेस्क - सुप्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक वामन केंद्रे आणि अभिनेत्री गौरी केंद्रे यांचा मुलगा ऋत्विक केंद्रे लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. पांडुरंग जाधव दिग्दर्शित 'ड्राय डे' या चित्रपटातून तो मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. तरुणाईवर आधारित असलेला हा सिनेमा 3 नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

या चित्रपटाबाबत बोलताना, ऋत्विक म्हणाला, सिनेमा माझ्यासाठी खूप खास असून, त्यासाठी फार उत्सुक आहे. छोट्या पडद्यापासून सुरुवात केल्यानंतर अभिनयात अधिक सुधारणा करण्यासाठी ऋत्विकने काही दिवसांचा ब्रेक घेतला होता. तसेच या सिनेमात काम करण्याआधी स्वतःमध्ये अनेक चांगले बदलही घडवून आणले होते. मार्शल आर्ट्सचे शिक्षण घेऊन, स्वतःमधील कलाकाराला अधिक चालना देण्याचा प्रयत्न केल्याचेही ऋत्विक म्हणाला.
सिनेमाचे लेखन दिग्दर्शक संजय पांडुरंग जाधव यांनीच केले असून, नितीन दीक्षित यांनी पटकथा व संवाद लिहिले आहेत. सिनेमात कैलाश वाघमारे, योगेश माधव सोहनी, पार्थ घाटगे, चिन्मय कांबळी, आयली घिए हे तरुण कलाकार आणि अरुण नलावडे, जयराम नायर हे कलावंतदेखील असणार आहेत.
पुढील स्लाइड्सवर पाहा, ऋत्विकचे काही PHOTOS...

Next Article

Recommended