Home »Bollywood »Marathi Cinekatta» Story About New Song Of Adarsh Shinde

गणेशोत्सवानिमित्त चाहत्यांसाठी खास आदर्श शिंदे-आनंदी जोशीच्या आवाजातील गीत

दिव्य मराठी वेब टीम | Aug 13, 2017, 15:06 PM IST

एंटरटेनमेंट डेस्क -आदर्श शिंदे हे नाक काही आपल्याला नवी नाही. मराठी चित्रपटांमध्ये आपण आदर्शच्या आवाजाची जादू अनुभवली आहे. आता गणेशोत्सवाच्या तोंडजावर पुन्हा एकदा आपल्याला आदर्शच्या आवाजाच गणरायाचे एक खास गाणे ऐकायला मिळणार आहे. आदर्श आणि आनंदी जोशी यांच्या आवाजातील 'मोरया तुझ्या नामाचा गजर' हे गाणे यू ट्यूबवर रिलीज करण्यात आले असून, त्याला रसिकांची पसंती मिळत आहे. या गाण्याच्या व्हिडीओमध्ये आपल्याला मेघा घाडगे यांनाही पाहता येईल.
आशिष मोरे यांनी या गाण्याचे संगीत दिग्दर्शन केले आहे, तर सप्तसूर म्युझिक कंपनीचे सर्वेसर्वा मंगेश मोरे यांनी निर्मिती केली आहे. 'कुलदैवत महाराष्ट्राचे' हा सप्तसूर म्युझिक कंपनीचा पहिला म्युझिक अल्बम असून यात 15 भक्ती गीते आहेत. 'मोरया -तुझ्या नामाचा गजर' या गाण्याचे रेकॉर्डिंग एन्झी स्टुडिओ येथे करण्यात आले. गणेश सातार्डेकर यांनी संगीत संयोजन केले आहे. गणपतीची स्तुती करणाऱ्या या गाण्यात आदर्श शिंदे यांच्यासोबत आनंदी जोशी यांचादेखील आवाज ऐकायला मिळणार आहे. दुनियादारी, डबल सीट, पिंडदान, नारबाची वाडी यांसारख्या सिनेमातून आनंदी जोशींचा आवाज आपण ऐकला आहे. आशिष मोरे यांनी शान, कुणाल गांजावाला, जावेद अली, सुरेश वाडकर, अमृता फडणवीस यांसारख्या दिग्गज गायकांबरोबर काम केले आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, गाण्याच्या व्हिडीओतील काही स्क्रीनशॉट्स आणि अखेरच्या स्लाइडवर पाहा, व्हिडीओ...

Next Article

Recommended