Home »Bollywood »Marathi Cinekatta» Tuzhyat Jiv Rangala Fem Actress Dhanashree Kadgaonkars Birthday

B'day :‘तुझ्यात जीव रंगला’ फेम नंदिता वहिणी म्हणजेच धनश्री काडगांवकर @29

दिव्य मराठी वेब टीम | Apr 06, 2017, 10:34 AM IST

छोट्या पडद्यावरील ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेत गायकवाड घराण्याची धाकटी सून नंदिता वहिनीची व्यक्तीरेखा साकारणारी धनश्री काडगांवकर अल्पावधीत घराघरात सुपरिचित झाली. राणा व अंजलीच्या प्रेमात नेहमी अडथळा आणणारी ही नंदिता वहिनी म्हणजे धनश्री काडगांवकरचा आज वाढदिवस आहे. सिरियलमध्ये मराठमोठ्या भूमिकेत दिसणार धनश्री ख-या आयुष्यात ग्लॅमरस आहे. आज 29 वर्षांची झाली आहे.
लवकरच दिसणार नवीन चित्रपटात
अनेक मालिका व चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारणारी धनश्री ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील निगेटिव्ह भूमिकेमुळे चांगलीच चर्चेत आली. ‘ब्रेव्हहार्ट’ चित्रपटात तिची वेगळी भूमिका प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. निर्माते सच्चिदानंद गोपीनाथ कारखानीस व संतोष यशवंत मोकाशी निर्मित ‘ब्रेव्हहार्ट’ चित्रपटाचे दिग्दर्शन दासबाबू यांनी केलंय. धनश्री
काडगांवकर ‘ब्रेव्हहार्ट’ चित्रपटात अभिनेता संग्राम समेळ याच्यासोबत झळकणार आहे. धनश्री, संग्राम सोबत अरुण नलावडे, अतुल परचुरे, सुलभा देशपांडे, किशोर प्रधान, डॉ. विलास उजवणे, विजय चव्हाण, इला भाटे, अभय कुलकर्णी, शमा निनावे, अथर्व तळवेलकर, स्वामीकुमार बाणावलीकर, प्रदिप भिडे आदी कलाकार यात एकत्र आले आहेत. सत्यघटनेवर आधारित ‘ब्रेव्हहार्ट’ ची पटकथा-संवाद व गीते श्रीकांत बोजेवार यांनी लिहिली असून अर्नब चटर्जी यांनी संगीत तर पार्श्वसंगीत अमर मोहिले यांनी दिलं आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहा नंदिताचे काही ग्लॅमरस PHOTOS....

Next Article

Recommended