Home » Top Story » Box Office Update On ABCD And Special 26

फ्रायडे रिलीज: अक्षयकुमारच्या 'Special 26'ला वरचढ ठरला प्रभूदेवाचा 'ABCD'

दिव्य मराठी वेब टीम | Feb 08, 2013, 16:16 PM IST
  • फ्रायडे रिलीज: अक्षयकुमारच्या 'Special 26'ला वरचढ ठरला प्रभूदेवाचा 'ABCD'

    मुंबई- एकता कपूरचा नवा चित्रपट 'एक थी डायन'च्या प्रमोशनला कुंभनगरीत 'नो एंट्री' सांगितल्याने अडचणीत सापडली आहे. दरम्यान, आज बॉलिवूडच्या रिलीज झालेल्या 'ए बी सी डी' आणि 'स्‍पेशल 26' या दोन चित्रपटांना प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. प्रसिद्ध डान्स डायरेक्‍टर आणि अभिनेता प्रभुदेवा याने बनवलेल्या देशातील पहिली थ्री डी मूव्ही 'ए बी सी डी' ला जोरदार ओपनिंग मिळाली. तर, अक्षय कुमारच्या 'स्‍पेशल 26' ला बॉक्‍स ऑफिसवर तुलनेने कमी प्रतिसाद मिळाला.

    ट्रेड एनलिस्‍ट तरण आदर्श यांच्या म्हणण्यानुसार, 'ए बी सी डी' ला 'स्‍पेशल 26' च्या तुलनेत चांगली ओपनिंग मिळाली आहे. मात्र, 'स्‍पेशल 26' ला काही मल्‍टिप्‍लेक्‍समध्ये जबरदस्त प्रतिसाद मिळाला. मात्र यात 'ए बी सी डी' ने बाजी मारल्याचे दिसत आहे. 'ट्रॅडिशनल चित्रपटाचा बिजनेस कमी होत चालला आहे. खेळ बदलला आहे. असा असे वाटते की, हा बदलाची चिंगारी फिल्‍म इंडस्‍ट्रीसाठी उपयुक्तच ठरेल.

    मसाला फिल्‍म असलेली 'स्‍पेशल 26' रिलीजपूर्वी खूपच चर्चेत होची. मात्र, सिंगल थिएटरमध्ये या चित्रपटाला ओपनिंग मिळाली नाही. मात्र या चित्रपटाचा दोन-तीन दिवसानंतर बिझनेस वाढेल.

  • फ्रायडे रिलीज: अक्षयकुमारच्या 'Special 26'ला वरचढ ठरला प्रभूदेवाचा 'ABCD'

    'स्‍पेशल 26' च्या तुलनेत 'ए बी सी डी' मध्ये कोणी मोठा स्‍टार अभिनेता नाही. तरीही स्पेशल 26 च्या तुलनेत चांगले ओपनिंग मिळाले. सिंगल थिएटरमध्ये ए बी सी डी ला उत्तम प्रतिसाद मिळाला. तर, मल्‍टिप्‍लेक्‍समध्येही या चित्रपटाने गर्दी खेचली.

Email Print
0
Comment