Home » Reviews » Movie Review » Movie Review : RACE 2

'रेस 2' पैशांची की कलाकारांची !

मयांक शेखर | Jan 28, 2013, 13:29PM IST
Genre: अँक्शन, थ्रिलर
Director: अब्बास मस्तान
Loading
Plot: ‘रेस 2’ में तो हम तुम्हारे बाप लगते हैं, नाम है सैफ अली खान : या सिनेमात सैफने जॉनला हेच म्हणायला हवे.

‘रेस 2’ में तो हम तुम्हारे बाप लगते हैं, नाम है सैफ अली खान : या सिनेमात सैफने जॉनला हेच म्हणायला हवे. असो, तो असे तर म्हणत नाही. मात्र या ‘रेस’मधून तू मला काय बाहेर काढणार, या रेसमध्ये मी सुरुवातीपासूनच सामील आहे, हे सैफ जॉनला म्हणतो. आता या या संवादातून सैफला काय म्हणायचे आहे, हे आपल्यापर्यंत नक्की पोहचत.

सैफ या सिनेमाच्या पहिल्या भागातही होता. बजेटमध्ये हा सिनेमा 2008मध्ये रिलीज झालेल्या ‘रेस’ सिनेमाच्याही पुढे आहे. या सिक्वेलमध्ये सैफच्या वाट्याला उत्तम स्टंट्स आणि चेस सिन्स आले आहेत. तो बिल्डिंगवरुन उड्या मारताना दिसतो. मात्र त्याच्या चेह-यावर नेहमी उदास भाव दिसतात.

या तुलनेत सिनेमात जॉनची भूमिका फक्त शर्ट काढणे, हॅण्ड फाईट करणे किंवा मोर्टल कॉम्बैट ऑपरेशनमध्ये सहभागी होण्यापर्यंतच मर्यादित आहे. मात्र तरीदेखील दोन्ही अभिनेत्यांच्या भूमिकेला सारखे महत्त्व देण्यात आले आहे. या दोघांमधील रेस सारखी आहे. जॉनने या सिनेमात कॅसिनोची चेन असलेल्या मालकाची भूमिका साकारली आहे.

तर दुसरीकडे सैफ एक ठग असून तो श्रीमंतांना आपले लक्ष्य करत असतो. सैफचा उद्देश काय आहे हे जॉनला चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळे सैफ आपला उद्देश पूर्ण करु शकत नाही.

अब्बास-मस्तान यांचा ‘रेस’ हा सिनेमा 2008 साली रिलीज झाला होता. त्या सिनेमाची कहाणी कुणाच्या लक्षात असेल का ? हा मोठा प्रश्न आहे. ‘रेस’ हा सिनेमा 1998 साली रिलीज झालेल्या ‘गुडबाय लव्हर’ या हॉलिवूड सिनेमापासून प्रेरित होता. अब्बास मस्तान यांचा 2012 साली रिलीज झालेला ‘प्लेअर्स’ हा सिनेमाही ‘जॉब’ या इटालियन सिनेमाची कॉपी होता. मात्र ‘रेस 2’ ओरिजिनल आहे. मी असे यासाठी म्हणतोय कारण या सिनेमाची कहाणी इंटर्वलपर्यंत संपून जाते.

निर्मात्यांनी या सिनेमाच्या स्क्रिनप्लेवर अधिक लक्ष देण्यापेक्षा सिनेमावर कोटींच्या घरात रुपये खर्च करण्यातच धन्यता मानली आहे. ‘रेस’ हा सिनेमा हिट होता. मात्र ‘रेस 2’ हा सिनेमा तयार व्हायला खूप वेळ लागला. या सिनेमाच्या सिक्वेलला खूप आधीच रिलीज व्हायला हवे होते.

या सिनेमात तीन अभिनेत्री (दीपिका पदुकोण, जॅकलीन फर्नांडिस, अमिषा पटेल) आहेत. सिनेमात अमिषाची जोडी अनिल कपूरबरोबर आहे. अनिलने सिनेमात फ्रेंच कट ठेवली आहे. सिनेमात त्याचे काम केवळ विनोद निर्मिती करण्यापुरते मर्यांदित असल्याचे वाटते. तो टिफिन बॉक्समधून जेवण चोरतो. शिवाय आपल्या असिस्टंटबरोबर मिळून द्विअर्थी विनोद करतो. या सिनेमात आणखी काही पात्रांची आवश्यकता आहे, असे वाटत असताना गॉडफादर राजाची (आदित्य पंचोली) एन्ट्री सिनेमात होते. त्याच्या आजुबाजुला सुंदर मुलींचा घोळका आहे आणि तो अरब डॉलर सहज खर्च करु शकतो. तसेही या सिनेमात लाखो-करोडोंची काहीच किंमत नाहीये. तर मग या सिनेमात काय महत्त्वाचे आहे ? कारण सिनेमातील सगळेच पात्र पैशांच्याच मागे धावत आहेत आणि सिनेमाचे निर्मातेसुद्धा.

सैफला त्याच्या गर्लफ्रेंड (बिपाशा बसू)च्या हत्येचा सूड घ्यायचा आहे. हीच या सिनेमाची कथा आहे. तो सेकंदामध्ये हे काम करु शकतो. मात्र जर त्याने असे केले तर हेलिकॉप्टर शॉट्स, कार चेस, जर्मन ऑटो मेकर ऑडीची जाहिरात, आतिफ असलमची गाणी, पार्टी शॉट्स, डान्स याचे काय होणार ?

शेवटी प्रेक्षक हेच बघायला तर थिएटरमध्ये येतो. हा सगळा मिर्च मसाला असेल तर सिनेमा बघण्याची मजा आहे. फक्त थिएटरमधून बाहेर पडताना सिनेमाविषयी जास्त विचार करु नका.

(लेखक प्रख्यात चित्रपट समीक्षक आहेत.)

Web Title: Movie Review : RACE 2
(News in Hindi from DainikBhaskar)
Email Print
0
Comment