Home » Reviews » Movie Review » Movie Review: Table No. 21

'टेबल नं 21'चा खेळ प्रेक्षकांना रुचला नाही

मयांक शेखर | Jan 05, 2013, 15:15 PM IST
'टेबल नं 21'चा खेळ प्रेक्षकांना रुचला नाही
Genre: सस्पेन्स, थ्रिलर
Director: आदित्य दत्त
Loading
Plot: सिनेमा बघून थिएटर बाहेर पडताना हा सिनेमा किती विचित्र होता, हाच विचार आपल्या मनात येतो.

या सिनेमातील मुख्य पात्र अर्थातच हीरो हिरोईन फिजीची ट्रीप जिंकतात. जणू या सिनेमाच्या निर्मात्यांनाही फिजीची ट्रीप पुरस्काराच्या रुपातच मिळाली असावी, म्हणून तर त्यांनी या पॅसिफिक आयलॅण्डवर हा थ्रिलर सिनेमा बनवण्याचे धाडस केले.

सिनेमातील हीरो-हिरोईन फिजीतील एका रिसोर्टमध्ये फुकटात सुटी घालवण्यासाठी कसे पोहचतात हे सिनेमात कुठेही स्पष्ट करण्यात आलेले नाही.

असो, सिनेमातील हीरो-हिरोईनला पाहून त्यांना सहज फसवता येईल असे वाटते. त्यांच्या लग्नाला पाच वर्षे झाली आहेत. हीरो बेरोजगार आहे. रिसोर्टचा मालक त्यांना एक इंट्रेस्टिंग खेळ खेळण्यासाठी तयार करतो. प्रत्येक प्रश्नाचे बरोबर उत्तर दिल्यास त्यांना एक कोटी देण्यात येणार असून बक्षिसाची एकूण रक्कम २१ कोटी इतकी असते.
एका कठिण कराराच्या रुपात हे दोघेही आपले सर्व अधिकार पणाला लावतात. या करारानुसार ते यावर न्यायालयिन खटला ठोकू शकत नाहीत. आता अडचण ही आहे की, ते या खेळातून बाहेरही पडू शकत नाही आणि त्यांना कोणत्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहे, हे सुद्धा ठाऊक नाही. या दोघांच्या प्रत्येक हालचाली कॅमे-यात बंदिस्त व्हायला सुरुवात होते.

सिनेमाचा हा भाग राजकुमार गुप्ताच्या 2008 साली रिलीज झालेल्या 'आमिर' सिनेमाची आठवण करुन देणारा आहे. 'आमिर' हा सिनेमा 'कॅविट' या फिलीपिनो सिनेमावर आधारित होता. तर 'टेबल नं 21' हा सिनेमा 'सच का सामना' या टीव्ही शोवर आधारित असल्याचे आपल्या लक्षात येते. 'सच का सामना' हा टीव्ही शो 'मोमेंट ऑफ द ट्रुथ' या प्रसिद्घ अमेरिकन सीरिजवर बेस्ड आहे.

टीना देसाई या सिनेमाची हिरोइन तर राजीव खंडेलवाल सिनेमाचा हीरो आहे. 'सच का सामना' या टीव्ही शोचा राजीव होस्ट होता. यावरुनच राजीव या सिनेमात का आहे हे आपल्या लक्षात येईल. या सिनेमात परेश रावलही महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे.

'सच का सामना' या टीव्ही शोमध्ये खरे बोला आणि पैसे कमवा असे होते. या शोमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न तुम्ही भूतकाळात काय केले यावर आधारित होते. मात्र सिनेमात तुम्ही कसा विचार करता यावर खेळ आधारित आहेत. हे थोडे कन्फ्यूजिंग आहे. मलासुद्धा 'सच का सामना' या शोमध्ये सहभागी होण्यासाठी विचारणा करण्यात आली होती. मात्र मी क्षणाचाही विलंब न लावता शोच्या निर्मात्यांना माझा नकार कळवला होता.

मात्र सिनेमातील खेळ खूपच अवघड आहे. या सिनेमातील खेळात हीरो-हिरोईन यांना खोटे बोलणे खूपच महागात पडू शकते. या खेळात तुम्हाला जीवे मारणे, अज्ञात लोकांकडून त्रास देणे, पोलिसांच्या ताब्यात देणे असे कठीण आव्हान देण्यात आले आहेत. हा खेळ इंटरनेटवर जवळपास 80 लाख लाईव्ह ऑडियन्स बघू शकतात.

सिनेमातील हीरो आपल्या पत्नीचा जीव वाचवण्यासाठी अर्धा लिटर रक्त डोनेट करतो. जेव्हा त्याच्या पत्नीला केस कापण्याचे सांगण्यात येते, तेव्हा हे दोघेही खेळापासून स्वतःची सुटका करण्याचा अतोनात प्रयत्न करतात.
जसजसा खेळ पुढे सरकतो, तसतसा तो अवघड होत जातो. मात्र सिनेमा बघून थिएटर बाहेर पडताना हा सिनेमा किती विचित्र होता, हाच विचार आपल्या मनात येतो.

(लेखक प्रख्यात चित्रपट समीक्षक आहेत.)

Email Print
0
Comment