Home » Reviews » Movie Review » Movie Review: Zila Ghaziabad

'जिला गाजियाबाद'ला न गेलेलेच बरे !

मयांक शेखर | Feb 23, 2013, 15:32PM IST
Genre: अ‍ॅक्शन
Director: आनंद कुमार
Loading
Plot: या सिनेमात डोक सुन्न करणारी शिवीगाळ आहे. त्यामुळे हा सिनेमा बघताना जरा विचारच करुन जा.

सिनेमाच्या अगदी सुरुवातीच्या दृश्यात एक दाढीवाला माणूस हवेत उडताना दिसतो. तो आपल्या बुटांच्या ठोकराने बदमाशांच्या एका समुहाला ठिकाणावर लावतो. त्यानंतर तो आपला हात हलवतो आणि काही गुंड खाली कोसळतात. हा व्हिलन आहे अर्शद वारसी अर्थातच मुन्नाभाईचा सर्किट.

वयाच्या 44 व्या वर्षी स्वतःला अ‍ॅक्शन हिरोच्या रुपात सादर करण्यासाठी कदाचित अर्शदने ही भूमिका स्वीकारली असावी. मात्र या सिनेमात तो केवळ गोळ्या झाडतानाच दिसतो. अ‍ॅक्शन हिरोच्या रुपात स्वतःला प्रस्थापित करताना सुरुवातीच्या काळात हे करणेही थोडे नव्हे.

त्याचा सामना ज्या हिरोबरोबर होतो तोसुद्धा त्याच्यापेक्षा काही वेगळा नाहीये. हा हिरो विवेक ओबरॉय आहे. हा सिनेमा बघता मी पूर्णवेळ खुर्चीवर बसून होतो. हा सिनेमा बघताना तीन-तीन आयटम नंबर मला बघावे लागले. दबंगवरुन उचलेगिरी केलेली काही गाणीही झेलावी लागली. सोबतच रवि किशन, परेश रावल, चंद्रचुड सिंग, आशुतोष राणासह चार डझन क्रॉस-फायर दृश्यांना पचवावे लागले.

हे सारे लोक एकमेकांवर फक्त गोळ्या का झाडत आहेत, हे समजून घेण्यासाठी एवढा आटापिटा मला करावा लागला. खरं सांगायचे तर आत्तापर्यंत मला त्याचा उलगडा झालेला नाही.

सिनेमाच्या सुरुवातीला संपत्तीवरुन वाद असल्याचे मला आठवतं. गाजियाबाद नावाचा एक जिल्हा आहे. जेथे प्रत्येकजण कुणालाही केव्हाही जीवे मारु शकतो. येथे पोलिस रस्त्यांवर परेड करताना दिसतात. मात्र येथे एकच जण असा आहे, जो कायदेशीररित्या वागतो. तो आहे ठाकुर प्रताप सिंग नावाचा पोलिस ऑफिसर.

हा पोलिस ऑफिसर तरुणांचे लांब केस कापतो. संजय दत्तच्या खलनायक सिनेमातील नायकाप्रमाणे हा दिसतो.
प्रताप सिंग 'तम्मा तम्मा लोगे' या गाण्याचा दिवाना आहे. हे गाणे सतत पोलिस स्टेशनमध्ये वाजत असते. तो म्हणतो की, त्याला जर संजय दत्त भेटला तर तो त्याचेही केस कापेल.

हा 52 वर्षीय पोलिस ऑफिसरसुद्धा हवेत उडतो आणि गुंडाना ठिकाणावर आणतो. तो आपल्या शर्टाची वरची चार बटने उघडी ठेऊन स्वतःची छाती दाखवतो.

कदाचित हे पात्र सिनेमात विनोद निर्मितीसाठी ठेवण्यात आले आहे. ही भूमिका अभिनेता संजय दत्तने साकारली आहे. दुःखद गोष्ट म्हणजे हा सिनेमा स्वतः संजय दत्तवरच विनोद करतो. ज्यांच्यासाठी हा सिनेमा तयार करण्यात आला आहे, त्या सिंगल स्क्रिनच्या प्रेक्षकांनासुद्धा मुन्नाभाईविषयी वाईट वाटत .
या सिनेमात डोक सुन्न करणारी शिवीगाळ आहे. त्यामुळे हा सिनेमा बघताना जरा विचारच करुन जा.

Email Print
0
Comment