Home » Star Interview » Boldness Is Not Shedding Clothes Says Aditi Rao

PHOTOS : 'रिलेशनशिपमध्ये लोक KISSच करतात, CRICKET खेळत नाहीत'

भास्कर नेटवर्क | Feb 08, 2013, 17:00 PM IST
 • PHOTOS : 'रिलेशनशिपमध्ये लोक KISSच करतात, CRICKET खेळत नाहीत'

  आगामी 'मर्डर 3' या सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने अभिनेत्री आदिती राव हैदरी आणि सारा लॉरेन यांनी नुकतीच आमच्या मुंबई ऑफिसला भेट दिली. यावेळी दोघीही सिनेमाविषयी बिनधास्तपणे बोलल्या.
  पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या या दोघी काय काय म्हणाल्या...

 • PHOTOS : 'रिलेशनशिपमध्ये लोक KISSच करतात, CRICKET खेळत नाहीत'

  बोल्ड होणे म्हणजे कपडे काढणे नव्हे -

  'मर्डर 3' हा सिनेमा 'मर्डर' आणि 'मर्डर 2' प्रमाणेच बोल्ड आहे आणि आदितीची भूमिकासुद्धा. त्यामुळे तुझ्यावर बोल्ड अभिनेत्रीचा शिक्का लागला तर चालेला का ? असा प्रश्न आदितीला विचारला असता ती म्हणाली की, ''बोल्ड अभिनेत्री म्हणून प्रसिद्धी मिळवण्यात मला काहीच हरकत नाही. बोल्ड होण्याचा अर्थ फक्त अंगावरील कपडे काढणे नव्हे. तुमचा एटीट्यूड, संवाद बोलण्याची शैलीसुद्धा बोल्ड असायला हवी. बोल्ड भूमिकेसाठी किसींग किंवा बोल्ड सीन्स असतील तर माझी काहीच हरकत नाही. रिलेशनशिपमध्ये असलेली व्यक्ती किसच करेल ना, क्रिकेट तर खेळणार नाहीत.''

 • PHOTOS : 'रिलेशनशिपमध्ये लोक KISSच करतात, CRICKET खेळत नाहीत'

  मल्लिकाबरोब तुलना होऊ शकत नाही -

  आदितीची तुलना 'मर्डर' फेम मल्लिका शेरावतबरोबर केली जात आहे. मात्र यामुळे आदिती नाराज आहे. याविषयी आदिती म्हणाली की, ''माझी तुलना मल्लिकाबरोबर होऊ शकत नाही. मी एक डिग्निफाईड वुमन आहे.''

 • PHOTOS : 'रिलेशनशिपमध्ये लोक KISSच करतात, CRICKET खेळत नाहीत'

  प्रेम हव्यास नसून सुंदर फिलिंग आहे -

  आदितीला प्रेम म्हणजे काय ? असा प्रश्न विचारल्यावर ती म्हणाली की, ''माझ्यासाठी प्रेम म्हणजे खूप सुंदर फिलिंग आहे. प्रेम विश्वासावर टिकून राहतं. प्रेम वासना नाहीये. प्रेम अनेक अडचणींचा सामना करुनसुद्धा आपल्या ध्येयापर्यंत पोहोचतं.''

 • PHOTOS : 'रिलेशनशिपमध्ये लोक KISSच करतात, CRICKET खेळत नाहीत'

  आदितीचा मिस्टर राईट कसा असेल -

  मिस्टर राईट कसा असेल याची यादी खूप मोठी आहे.''तो वेल ड्रेस्ड आणि हॅण्डसम असायला हवा. कारण मला व्यक्तीचे लुक्स अपील करतात. शिवाय त्याचा सेन्स ऑफ ह्युमरसुद्धा चांगला असायला हवा.''

 • PHOTOS : 'रिलेशनशिपमध्ये लोक KISSच करतात, CRICKET खेळत नाहीत'

  सिनेमात सेकंड लीडमध्ये असेलली अभिनेत्री सारा लॉरेनने सांगितले की, ''सिनेमात बोल्ड सीन्स देताना मी कम्फर्टेबल नव्हते. मात्र नंतर सगळे काही नॉर्मल झाले. मला हिंदी बोलण्यातही अडचण आली नाही. कारण मला सुरुवातीपासूनच चांगली हिंदी बोलता येते आणि कॅमेरा फेस करायलाही मी घाबरली नाही.''

 • PHOTOS : 'रिलेशनशिपमध्ये लोक KISSच करतात, CRICKET खेळत नाहीत'

  बॉलिवूडचा सेक्सी हिरो कोण ? असा प्रश्न साराला विचारला असता तिने रणदीप हुड्डाचे नाव घेतले. रणदीप सर्वाधिक सेक्सी असल्याचे तिने म्हटले.

Email Print
0
Comment