Home » Star Interview » There Is No Vulgarity In Intimacy: Chetan Bhagat

चेतन भगत म्हणाले, 'INTIMACY म्हणजे अश्लीलता नव्हे'

दिव्य मराठी वेब टीम | Jan 05, 2013, 12:52 PM IST
 • चेतन भगत म्हणाले, 'INTIMACY म्हणजे अश्लीलता नव्हे'

  बॉलिवूडचा आगामी 'कोई पो छे' हा सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येतोय. हा सिनेमा चेतन भगत यांच्या प्रसिद्ध 'थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ' या कादंबरीवर आधारित आहे. या सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने चेतन भगत आणि दिग्दर्शक अभिषेक कपूर यांनी नुकतीच आमच्या मुंबई ऑफिसला भेट दिली.

  तरुणाईला डोळ्यांसमोर ठेऊन हा सिनेमा तयार करण्यात आला आहे. यामध्ये राजकुमार यादव, अमित साध, सुशांत सिंग राजपुत आणि अमृता पुरी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

  पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या या मुलाखतीत चेतन आनंद आणि अभिषेक कपूर यांनी कोणकोणत्या विषयांवर गप्पा मारल्या.

 • चेतन भगत म्हणाले, 'INTIMACY म्हणजे अश्लीलता नव्हे'

  'रॉक ऑन' हा हिट सिनेमा दिग्दर्शित करणारे अभिषेक कपूर यांनी 'काई पो छे' या शीर्षकाचा अर्थ सांगितला. गुजरातमध्ये पतंगबाजी करताना पतंग कापल्यानंतर काई पो छे असे ओरडून जल्लोष साजरा केला जातो. हा सिनेमा गुजरातच्या पार्श्वभूमीवर आधारित असल्यामुळे सिनेमाचे शीर्षक 'काई पो छे' असे ठेवले असल्याचे अभिषेक कपूर यांनी सांगितले.

 • चेतन भगत म्हणाले, 'INTIMACY म्हणजे अश्लीलता नव्हे'

  अभिषेक कपूर यांनी पुढे सांगितले की, ''मध्यमवर्गीय तरुण लवकरात लवकर पैसा, यश, प्रसिद्धी आणि गर्लफ्रेंड मिळवण्याच्या प्रयत्नात असतात. माझा सिनेमा गुजरातच्या पार्श्वभूमी आधारित आहे. या तिघांकडेही नोकरी नसते. शिवाय नोकरी करण्यातही त्यांना रस नसतो. त्यांच्याजवळ कमी वेळात भरपूर पैसा कसा येतो आणि त्यानंतर त्यांच्या आयुष्यात काय काय घडतं हे मी सिनेमात रेखाटले आहे.''

 • चेतन भगत म्हणाले, 'INTIMACY म्हणजे अश्लीलता नव्हे'

  अभिषेक यांनी सांगितले की, ''हा सिनेमा मनोरंज करणारा आहे. मात्र या सिनेमात एकही आयटम नंबर चित्रीत करण्यात आलेला नाही.''

 • चेतन भगत म्हणाले, 'INTIMACY म्हणजे अश्लीलता नव्हे'

  चेतन भगत यांच्या कादंबरीमध्ये काही ठिकाणी स्टोरीत अश्लीलता आहे. त्यामुळे सिनेमातही काही बोल्ड कंटेट पाहायला मिळणार आहे का ? असा प्रश्न आम्ही चेतन भगत यांना विचारला असता, त्यांनी सांगितले की, असे नाहीये. माझ्या नॉवेलमध्ये व्यक्तिरेखांमध्ये काही जागी इंटीमेसी दाखवण्यात आली आहे. मात्र इंटीमेसी म्हणजे अश्लीलता असल्याचे मी समजत नाही.

 • चेतन भगत म्हणाले, 'INTIMACY म्हणजे अश्लीलता नव्हे'

  चेतन यांनी सांगितले की, अभिषेक यांनी त्यांच्या पद्धतीने सीन्स बसवले आहेत. मी माझ्या आईबरोबर तर अभिषेक त्यांच्या बहिणीबरोबर हा सिनेमा बघणार आहे. या सिनेमात अश्लीलता नाहीये.

Email Print
0
Comment