Home » Top Story » After GoW Manoj Bajpai Gets International Film Offers

देशी चित्रपटातून मिळाली हॉलि‍वूडची वाट

दिव्य मराठी वेब टीम | Jan 25, 2013, 10:59AM IST

‘गँग्स ऑफ वास्सेपूर’ मध्ये जोरदार भूमिका करणार्‍या मनोज बाजपेयीला या चित्रपटामुळे हॉलि‍वूडच्या ऑफर मिळू लागल्या आहेत. मनोजने सांगितले की, मला हॉलि‍वूडच्या काही ऑफर्स मिळाल्या आहेत. मात्र, अजून काही फायनल झाले नाही. सध्या मी स्क्रिप्ट वाचत आहे. हॉलि‍वूडमध्ये जाण्याची माझी खूप इच्छा होती. आँग लीच्या चित्रपटातसुद्धा मला काम करण्याची इच्छा होती. मी तब्बूला बोललो होतो की, मला या चित्रपटात एक दृश्य करायला मिळाले असते तर मी केले असते. काही का असेना अनुराग कश्यपच्या या चित्रपटाने माझ्यासाठी हॉलि‍वूडची वाट मोकळी केली आहे.

Web Title: After GoW Manoj Bajpai gets international film offers
(News in Hindi from DainikBhaskar)
Email Print
0
Comment