Home » Top Story » Akshay Kumar 2000 Crore

अक्षयकुमारच्या चित्रपटांनी रचला इतिहास, कमविले 2000 कोटी रुपये

दिव्य मराठी वेब टीम | Feb 16, 2013, 20:17PM IST

बॉलिवूड स्‍टार अक्षयकुमारच्या चित्रपटांनी एक इतिहास रचला आहे. अक्षय भारतीय चित्रपटसृष्ठीतील पहिला कलाकार बनला आहे ज्याच्या चित्रपटांची कमाई 2000 कोटी रुपयांची झाली आहे. सोशल मीडियावर याबाबत खूप चर्चा सुरु आहे. मायक्रोब्‍लॉगिंग साईट ट्विटरवर #Akshay2000Crore टॉपवर ट्रेंड करीत आहे.

अक्षयकुमार भारतीय चित्रपटसृष्ठीतील असा एकमेव अभिनेता आहे ज्याने एकाच वर्षात तीन वेळा चार-चार चित्रपट हिट ठरले आहेत. यात खिलाड़ी 786, ओ माय गॉड, राऊडी राठौड़, सिंग इज किंग, नमस्‍ते लंडन, हमको दीवाना कर गए, ऐतराज, अजनबी, ये दिल्‍लगी, खिलाडी या चित्रपटाचा समावेश आहे. नुकत्याच आलेल्या 'स्‍पेशल 26' मध्ये अक्षयकुमारने नकली सीबीआय अधिका-याची भूमिका केली आहे ज्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Web Title: Akshay Kumar 2000 Crore
(News in Hindi from DainikBhaskar)
Email Print
0
Comment