Home » Top Story » Akshay Kumar Wants To Contribute For The Country

'SPECIAL 26' बरोबर अक्षय दाखवणार आपली देशभक्ती

भास्कर नेटवर्क | Jan 25, 2013, 13:26 PM IST
 • 'SPECIAL 26' बरोबर अक्षय दाखवणार आपली देशभक्ती
  अभिनेता अक्षय कुमार लवकरच 'स्पेशल छब्बीस' या सिनेद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या सिनेमात अक्षय कुमार आपल्याला 26 लोकांच्या टीमबरोबर दिसणार आहे. हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित असून 26 लोकांचा समूह एका सराफा दुकानात छापा मारुन लाखोचा ऐवज कसा लंपास करतो याची कथा या सिनेमात पाहायला मिळणार आहे.
  26 जानेवारीच्या पार्श्वभूमीवर अक्षयने सांगितले की, ''ज्याप्रमाणे सिनेमात मी 26 लोकांचा समूह तयार केला आहे, त्याचप्रमाणे खासगी आयुष्यातदेखील मला 26 लोकांचा समूह तयार करायचा आहे. या 26 लोकांच्या मदतीने मला देशासाठी एक चांगले काम हाती घ्यायचे आहे.''
 • 'SPECIAL 26' बरोबर अक्षय दाखवणार आपली देशभक्ती

  अक्षयने प्रजासत्ताकदिनी देशवासियांना संदेश देताना म्हटले की, ''देशाला पुढे नेण्यासाठी आपण सगळ्यांनी भ्रष्टाचाराविरोधात लढा दिला पाहिजे. त्यामुळे येणारा काळ आपल्या सगळ्यांसाठी सुख आणि समाधान घेऊन येईल.''

 • 'SPECIAL 26' बरोबर अक्षय दाखवणार आपली देशभक्ती
  अक्षयचा 'स्पेशल छब्बीस' हा सिनेमा येत्या 8 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे.
Email Print
0
Comment