Home » Top Story » Amit Kumar Sing Tha Thaiya Song

अमित कुमारने गायले किशोरदाचे गाणे

दिव्य मराठी वेब टीम | Feb 14, 2013, 16:49PM IST

80 च्या दशकातील ‘हिम्मतवाला’मधील ‘ता थैया.’ हे गाणे कोणी विसरलेले नाही. आजही गाणे ऐकताच पाय थिरकायला लागतात. भारतीय चित्रपटसृष्टीचा दिग्गज गायक किशोर कुमार यांनी हे गाणे गायले होते. त्यामुळे हे गाणे आजही लोकांच्या आठवणीत आहे. हे गाणे जितेंद्र आणि श्रीदेवीवर चित्रीत करण्यात आले होते.

साजिद खानने या सिनेमाचा रिमेक बनला आहे. यात अजय देवगण आणि तमन्ना मुख्य भूमिकेत आहेत. साजिदने ‘ता थैया..’ हे गाणे आपल्या सिनेमात घेतले आहे. रिमेकमध्ये या गाण्याला अमित कुमारने आवाज दिला आहे. अमित, किशोर कुमार यांचा मुलगा आहे. गायिका श्रेया घोषाल आहे.

अमित कुमार यांची निवड केल्याविषयी साजिद खान म्हणाला की, या गाण्याची पुन्हा रेकॉर्डिंग करणे म्हणजे इतिहास बनवण्यासारखे होते. 30 वर्षांनंतर वडिलांचे गाणे त्याच स्टाइलमध्ये मुलाने गायले आहे याआधी असे कधीच झाले नाही. अमित कुमारने हे गाणे अगदी किशोर कुमारांच्या स्टाइलमध्ये गायले आहे. जेव्हा हे गाणे रेकॉर्ड होत होते तेव्हा किशोर कुमार आमच्यासमोर असल्यासारखे वाटत होते. इंडस्ट्रीत एकच किशोर कुमार होते आणि एकच अमित कुमार राहणार आहे, असेही तो म्हणतो. नव्या काळाच्या या गाण्याला साजिद-वाजिदने संगीत दिले आहे.

Web Title: Amit kumar sing tha thaiya song
(News in Hindi from DainikBhaskar)
Email Print
0
Comment