Home » Top Story » Amitabh Bachchan New Bunglow

बिग बींनी 50 कोटीला विकत घेतला पाचवा आलिशान बंगला

भास्कर नेटवर्क | Jun 27, 2013, 11:35 AM IST
 • बिग बींनी 50 कोटीला विकत घेतला पाचवा आलिशान बंगला


  नवी दिल्ली - बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी जुहू येथे नुकताच एक आलिशान बंगला खरेदी केला आहे. अमिताभ यांच्या जुहू स्थित जलसा बंगल्याशेजारीच हा नवा बंगला आहे. अमिताभ यांचा हा बंगला आठ हजार चौरस फूटांचा असून त्याची किंमत तब्बल 50 कोटी इतकी आहे. अमिताभ यांचा हा पाचवा बंगला आहे.

  अमिताभ बच्चन यांच्याकडे प्रतीक्षा, जलसा, जनक, वस्त असे यापूर्वीचे चार बंगले आहेत. नुकत्याच घेतलेल्या या नव्या बंगल्याचे अमिताभ यांनी अद्याप नाव ठेवलेले नाही. जलसाच्या मागील भागात हा बंगला आहे, जलसा आणि या नव्या बंगल्यामध्ये एकच भिंत आहे. ती पाडून दोन्ही बंगल्यांचा एकच विस्तीर्ण बंगला बनविण्याचा अमिताभ यांचा विचार असल्याचे समजते.

  खरं तर बी टाऊनच्या अनेक कलाकारांनी आपले बंगले बिल्डरांना विकून त्यांच्याकडून मोठी रक्कम मिळवली आणि त्यातून काही फ्लॅट्स विकत घेतले. अमिताभ बच्चन मात्र त्याला अपवाद आहेत. अमिताभ यांनी आपले जुने बंगले न विकता आपल्या बंगल्यांची संख्या वाढवली आहे.

  अमिताभ बच्चन यांचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. त्यांच्या लोकप्रियतेत दिवसेंदिवस वाढच होत आहे. या वयातही अमिताभ मोठ्या पडद्याबरोबरच छोट्या पडद्यावरही कार्यरत आहेत. दिग्दर्शक आर. बाल्की अमिताभ बच्चनची प्रमुख भूमिका असलेल्या एका रोमँटिक सिनेमाची तयारी करत आहेत. तर दिग्दर्शक सुधीर मिश्रासुद्धा यावर्षाच्या अखेरपर्यंत बिग बींना घेऊन 'मेहरुनिसा' या सिनेमाचे शूटिंग सुरु करणार आहेत. लवकरच त्यांचा 'सत्याग्रह' हा सिनेमाही रिलीज होणार आहे. अमिताभ बच्चन कमाईमध्ये आपल्या समवयीन कलाकारांना मागे टाकत आहेत. अमिताभ आपल्या प्रत्येक सिनेमासाठी जवळपास पाच ते सहा कोटींचे मानधन घेतात. मात्र त्यांच्या समवयीन कलाकारांना त्यांच्या तुलनेत कमी मानधन मिळतं.

  साठी पार केलेले ऋषी कपूर आणि मिथून चक्रवर्ती हे कलाकारदेखील सध्या खूप बिझी आहेत. मात्र या दोघांना बिग बींपेक्षा कमी मानधन मिळतं. ऋषी कपूर यांना आपल्या प्रत्येक सिनेमासाठी दोन कोटी इतके मानधन मिळतं. तर मिथून दा एका सिनेमासाठी एक कोटी रुपये घेतात.

  पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या बिग बींच्या बंगल्यांबद्दल...

 • बिग बींनी 50 कोटीला विकत घेतला पाचवा आलिशान बंगला

  जुहू परिसरात असलेला अमिताभ बच्चन यांचा हा पाचवा बंगला आहे. सध्या ते 'जलसा'मध्ये राहतात. 'जलसा' हा बंगला त्यांना 'सत्ते पे सत्ता' या सिनेमाच्या मानधनाच्या रुपात मिळाला होता. याच बंगल्यात ऋषिकेश मुखर्जी यांच्या 'चुपके-चुपके' या सिनेमाचे शूटिंग पार पडले होते. एकेकाळी शर्मिला टागोर यांची हा बंगला विकत घेण्याची इच्छा होती.
  जुहूमधील 'प्रतिक्षा' या बंगल्यानंतर बिग बींकडे 'जलसा' हा बंगला आला. त्यानंतर 2004 साली त्यांनी 'जनक' हा बंगला विकत घेतला आणि त्याचे रुपांतर आपल्या ऑफिसच्या रुपात केले. बच्चन कुटुंबीयांकडे आणखी एक बंगला असून त्याचे नाव 'वत्स' आहे. हा बंगला त्यांनी सिटी बँकेला भाड्याने दिला आहे. वांद्रातील कार्टर रोडवर बिग बींनी 'नैवेद्य' नावाचा बंगला अभिषेक बच्चनच्या नावाने खरेदी केला आहे. ऐश्वर्याबरोबर लग्नानंतर अभिषेक या बंगल्यात राहणार अशी त्यावेळी चर्चा होती.

  जुहू परिसरात राहणारे अमिताभ बच्चन यांचे समवयीन कलाकार धर्मेंद्रच असे एकमेव कलाकार आहेत, ज्यांनी आपला बंगला विकला नाही. शत्रुघ्न सिन्हा यांनी आपल्या जुहूतील 'रामायण' या बंगल्याचे रुपांतर एका मोठ्या इमारतीत केले आहे. येथेच त्यांचे संपूर्ण कुटुंब वास्तव्याला आहे. या इमारतीचे काम सुरु असताना शत्रुघ्न आपल्या कुटुंबीयांबरोबर अमृता सिंहच्या लोखंडवाला स्थित बंगल्यात शिफ्ट झाले होते.

 • बिग बींनी 50 कोटीला विकत घेतला पाचवा आलिशान बंगला

  हिरोईन्समध्ये वाढतोय फ्लॅट खरेदीचा ट्रेंड...
  दुसरीकडे बी टाऊनच्या अभिनेत्रींमध्ये फ्लॅट खरेदी करण्याचा ट्रेंड वाढत चाललाय. काही दिवसांपूर्वी पडलेल्या आयकर धाडीत अभिनेत्री प्रियांका चोप्राकडे मुंबईत नऊ फ्लॅट्स असल्याचे उघड झाले आहेत. वर्सोवा येथील राज क्लासिक इमारतीत तिच्या नावावर पाच फ्लॅट्स आहेत. याच इमारतीत ती वास्तव्याला आहे. अलीकडेच माधुरी दीक्षितनेसुद्धा याच इमारतीच्या अकराव्या मजल्यावर दोन फ्लॅट्स खरेदी केले आहेत. सध्या माधुरी आपल्या कुटुंबीयांबरोबर जुहूतील तिच्या जुन्या फ्लॅटमध्ये राहते.

 • बिग बींनी 50 कोटीला विकत घेतला पाचवा आलिशान बंगला

  कमाईत अव्वल आहेत अमिताभ...

  बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन वयाच्या 70 व्या वर्षीसुद्धा कमाईत सुपरस्टार्सना मात देत आहेत. यावर्षी फेब्रुवारीमध्ये फोर्ब्स इंडियाने प्रकाशित केलेल्या सर्वाधिक कमाई करणा-या कलाकारांच्या यादीत शाहरुख खान अव्वल असला तरीदेखील बिग बींचे नाव या यादीत मागे नाहीत. 116.3 कोटींचे मालक असलेले बिग बी या यादीत पाचव्या स्थानावर आहेत. या यादीत शाहरुखने सलमानला मागे टाकले आहे. सलमान आता तिस-या स्थानावर आला आहे. तर फोर्ब्सच्या या यादीत अक्षय कुमार दुस-या स्थानावर असून त्याच्या एकुण कमाईचा आकडा 179.85 कोटी इतका आहे.

  पुढे वाचा, केबीसी 7 घेऊन येत आहेत बिग बी...

 • बिग बींनी 50 कोटीला विकत घेतला पाचवा आलिशान बंगला

  केबीसी 7 घेऊन येत आहेत बिग बी...

  बिग बी पुन्हा एकदा केबीसीचा खेळ घेऊन येत आहेत. केबीसीचे सातवे पर्व लवकरच छोट्या पडद्यावर दाखल होणार आहे. यावर्षी ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यापर्यंत हा शो सुरु होणार आहे. गेल्या पर्वाप्रमाणेच हे पर्वही बिग बीच होस्ट करणार आहेत.

Email Print
0
Comment