Home » Top Story » Amitabh Bachchan Reacted On Afzal Guru's Execution

अफजलच्या फाशीवर बिग बींनी बोलण्यास आधी दिला नकार, नंतर म्हणाले...

भास्कर नेटवर्क | Feb 09, 2013, 13:11 PM IST
अफजलच्या फाशीवर बिग बींनी बोलण्यास आधी दिला नकार, नंतर म्हणाले...

2001 साली संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माईंड अफजल गुरुला शनिवारी सकाळी फासावर लटकवण्यात आले. तिहार तुरुंगात अतिशय गुप्तपणे त्याला फाशी देण्यात आली. ही बातमी येताच सगळ्या क्षेत्रातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

अमिताभ बच्चन यांनी मुलींच्या हितासाठी काम करणा-या एका एनजीओला सपोर्ट करण्यासाठी आपल्या जलसा बंगल्यावर आज एक पत्रकार परिषद आयोजित केली होती.

साहजिकच यावेळी मीडिया बिग बींची अफजल गुरुच्या फाशीसंदर्भातील प्रतिक्रिया जाणून घेण्यास उत्सुक होता. मात्र बिग बींनी दहशतवाद आणि अफजलच्या प्रश्नांना उत्तर देण्यास टाळले. विशेषतः जया बच्चन याविषयी बोलण्यास मुळीच उत्सुक दिसल्या नाही. जया बच्चन यांनी म्हटले की, गर्ल चाईल्ड आणि अफजल गुरु या विषयांना एकत्र करु नका. ही पत्रकार परिषद आम्ही गर्ल चाईल्डला पाठिंबा देण्यासाठी आयोजित केली आहे.

मात्र मीडियाच्या विनंतीवरुन बिग बींनी आपले मौन तोडले आणि ते म्हणाले की, ''अफजलला कायदेशीररित्या फासावर लटकवण्यात आल्यामुळे मी खूप आनंदी आहे. जी व्यक्ती असा गुन्हा करेल तिला शिक्षा ही मिळालीच पाहिजे. मी अफजलला फासावर लटकवण्यात आल्यामुळे आपला आनंद व्यक्त करतो.''

Email Print
0
Comment