Home » Top Story » Bollywood's Yesteryear Actresses Then And Now

SHOCKING: बॉलिवूडचा एक काळ गाजवणा-या या अभिनेत्री आता दिसतात अशा

दिव्य मराठी वेब टीम | Feb 20, 2013, 16:34 PM IST
 • SHOCKING: बॉलिवूडचा एक काळ गाजवणा-या या अभिनेत्री आता दिसतात अशा

  बॉलिवूडच्या जुन्या काळाबद्दल बोलायचे झाले तर त्या काळातील अभिनेत्रींचा विषय सहजच निघतो. साठ ते ऐंशीच्या दशकातील अभिनेत्रींच्या अदांवर प्रत्येकजण फिदा होता. या अभिनेत्रींनी आपल्या सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर अनेक वर्ष सिल्व्हर स्क्रिनवर राज्य केले. मात्र जुन्या काळातील या सौंदर्यवती आज कशा दिसतात हे तुम्हाला ठाऊक आहे का ?
  आज आम्ही तुम्हाला एक काळ गाजवणा-या अभिनेत्री आता कशा दिसतात हे छायाचित्रांच्या माध्यमातून दाखवत आहोत.
  (जुन्या काळातील अभिनेत्रींचे आताचे रुप बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...)

 • SHOCKING: बॉलिवूडचा एक काळ गाजवणा-या या अभिनेत्री आता दिसतात अशा

  वहिदा रहमान
  वहिदा रहमान यांना त्यांच्या सशक्त अभिनयासाठी ओळखले जाते. गाईड, कागज के फुल हे सिनेमे त्यांच्या अभिनय आणि सौंदर्याची नेहमीच आठवण करुन देणारे आहेत. वहिदा यांना बॉलिवूडच्या पार्टीजमध्ये नेहमीच बघितले जाते. त्यांचा शेवटचा सिनेमा 2009 साली रिलीज झालेला 'दिल्ली 6' हा होता.

 • SHOCKING: बॉलिवूडचा एक काळ गाजवणा-या या अभिनेत्री आता दिसतात अशा

  तनुजा
  तनुजा आपल्या काळातील सुंदर आणि चुलबुली अभिनेत्री होत्या. काजोलची आई असलेल्या तनुजा यांनी बॉलिवूडला अनेक सिनेमे दिले. तनुजा आता 69 वर्षांच्या आहेत. त्या अलीकडेच 'सन ऑफ सरदार' या सिनेमात झळकल्या होत्या.

 • SHOCKING: बॉलिवूडचा एक काळ गाजवणा-या या अभिनेत्री आता दिसतात अशा

  वैजयंती माला
  वैजयंती माला आता 76 वर्षांच्या आहेत. वैजयंती माला गायिका आणि भरतनाट्यम नृत्यांगणा आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून त्या चित्रपटसृष्टीपासून दूर आहेत.

 • SHOCKING: बॉलिवूडचा एक काळ गाजवणा-या या अभिनेत्री आता दिसतात अशा

  आशा पारेख
  सौंदर्याबरोबरच आशा पारेख यांना त्यांच्या नृत्यासाठीही ओळखले जाते. वाढत्या वयाबरोबर त्यांनी सिनेमापासून संन्यास घेतला. मात्र वयाच्या 70 व्या वर्षीसुद्धा त्यांनी नृत्याची साधना सुरु ठेवली आहे. त्या आता एक डान्स अ‍ॅकडमी चालवतात.

 • SHOCKING: बॉलिवूडचा एक काळ गाजवणा-या या अभिनेत्री आता दिसतात अशा

  सायरा बानो
  वयाच्या 16 व्या वर्षी सायरा बानो यांनी चित्रपटसृष्टीत आपले पाऊल ठेवले. 'जंगली' या सिनेमाद्वारे मोठ्या पडद्यावर झळकलेल्या सायरा बानो यांच्या सौंदर्याचे अनेक दिवाने होते. सायरा बानो दिलीप कुमार यांच्या पत्नी असून त्या 68 वर्षांच्या आहेत.

 • SHOCKING: बॉलिवूडचा एक काळ गाजवणा-या या अभिनेत्री आता दिसतात अशा

  बबिता
  रणधीर कपूर यांची पत्नी, राज कपूर यांची सून, करिश्मा आणि करीना कपूरची आई असलेल्या बबिताचाही मोठा चाहता वर्ग होता. आपल्या सौंदर्य आणि अभिनयाने एक काळ गाजवणा-या बबिता आज अशा दिसतात.

 • SHOCKING: बॉलिवूडचा एक काळ गाजवणा-या या अभिनेत्री आता दिसतात अशा

  टीना मुनीम
  'देस परदेस' या सिनेमाद्वारे आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात करणा-या टीना मुनीम आज टीना अबांनी आहेत.
  1978 साली टीना मुनीम यांनी अनिल अंबानीबरोबर लग्न केले होते. 'कर्ज' हा टीना मुनीम यांच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे. राजेश खन्ना यांच्याबरोबर त्यांचे अनेक वर्ष अफेअर होते. टीना मुनीम आणि राजेश खन्ना लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये होते. टीना यांनी आता चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला असून त्या अनेक सामाजिक संस्थांसाठी काम करतात.

 • SHOCKING: बॉलिवूडचा एक काळ गाजवणा-या या अभिनेत्री आता दिसतात अशा

  मुमताज
  1960 च्या काळात मुमताज यांना बॉलिवूडची फॅशनेबल हिरोइन म्हणून ओळखले जात होते. मुमताज यांनी मयूर माधवानीबरोबर लग्न केले. त्यांची मुलगी नताशा फरदीन खानची पत्नी आहे. सुपरस्टार राजेश खन्नाबरोबरची त्यांची जोडी ऑन स्क्रिनवरची हिट जोडी होती.

 • SHOCKING: बॉलिवूडचा एक काळ गाजवणा-या या अभिनेत्री आता दिसतात अशा

  रीना रॉय
  अभिनेत्री रीना रॉयने बॉलिवूडला अनेक हिट सिनेमे दिले आहेत. शत्रुघ्न सिन्हाबरोबर त्यांची जोडी खूप गाजली होती. शिवाय शत्रुघ्न सिन्हाबरोबर त्यांच्या अफेअरच्या बातम्याही चर्चेत होत्या. रीना रॉय आता 55 वर्षांच्या असून 'रिफ्यूजी' हा त्यांचा शेवटचा सिनेमा होता.

 • SHOCKING: बॉलिवूडचा एक काळ गाजवणा-या या अभिनेत्री आता दिसतात अशा

  जया प्रदा
  जया प्रदा यांनी हिंदी, तेलगु, कन्नड आणि मल्याळम सिनेमांमध्ये अभिनय केला आहे. चित्रपटसृष्टीपासून संन्यास घेतल्यानंतर जया प्रदा राजकारणात सक्रिय झाल्या आहेत.

 • SHOCKING: बॉलिवूडचा एक काळ गाजवणा-या या अभिनेत्री आता दिसतात अशा

  सलमा आगा
  पाकिस्तानी गायिका आणि अभिनेत्री सलमा आगा यांचा 'निकाह' हा सिनेमा खूप गाजला होता. सलमा आगा आता 54 वर्षांच्या आहेत.

Email Print
0
Comment