Home » Top Story » Businessman Mukesh Ambani's Organise Party At Antilla For Niece Nayantara Wedding

PHOTOS : मुकेश अंबानींच्या पार्टीला तारे-तारकांची मांदियाळी

भास्कर नेटवर्क | Jan 07, 2013, 10:52AM IST
1 of 42

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांची पत्नी नीता अंबानी यांनी त्यांची भाची नयनताराच्या साखरपुड्याच्या आनंदात एक जंगी पार्टी आयोजित केली होती. 5 जानेवारीला मुंबईतील एंटीलिया या घरी ही जंगी पार्टी आयोजित करण्यात आली होती. रात्री 8.30 वाजता सुरु झालेली ही पार्टी उशीरा रात्री 2.15 वाजेपर्यंत चालली. या पार्टीला उद्योग, बॉलिवूड आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची हजेरी होती.

नयनताराचे मामा आणि मुकेश अंबानी यांचे छोटे भाऊ अनिल अंबानीसुद्धा आपल्या संपूर्ण कुटुंबाबरोबर या पार्टीला आले होते. धीरुभाई अंबानी यांच्या निधनानंतर अंबानी कुटुंबात होणारे हे पहिलेच लग्न आहे.

अंबानी आणि बिरला हे भारतातील प्रसिद्ध उद्योग घराणे आहे. मुकेश अंबानी यांची बहीण नीना कोठारी यांची मुलगी नयनताराचे लग्न के. के. बिरला यांचे नातू शमित भरतिया यांच्याबरोबर चेन्नईत होणार आहे. नयनतारा मुकेश आणि अनिल अंबानी यांची भाची आहे. नयनताराचे वडील श्याम कोठारी चेन्नईतील प्रसिद्ध उद्योगपती आहे. तर शमित उद्योगपती श्याम भरतिया आणि शोभना भरतिया यांचा मुलगा आहे.

जवळपास सहा तास चाललेल्या या पार्टीत अंबानी भावांनी मिळून पाहुण्यांचे स्वागत केले. या पार्टीला लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर, शाहरुख खान, विधु विनोद चोप्रा, सुभाष घई, विनोद खन्ना, प्रियांका चोप्रा, पूनम सिन्हा, राजू हिरानी, ऋषी कपूर, अनुपम खेर, करण जोहर, सोनम आणि रिया कपूर, रितेश देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर आले होते. या पार्टीत शाहरुख खानने खास परफॉर्मही केले.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा अंबानी यांच्या जंगी पार्टीची ही खास छायाचित्रे...

 
Email Print
0
Comment