Home » Top Story » Curtain Raiser, Blenders Pride Bangalore Fashion Week

EXCLUSIVE: बंगळुरुमध्ये 'ब्लेंडर्स प्राईड फॅशन वीक'चा जलवा!

दिव्य मराठी वेब टीम | Jan 25, 2013, 21:08PM IST
1 of 9
द ब्लेंडर्स प्राईड बंगळुरु फॅशन वीक पुन्हा परतलाय. हा फॅशन वीक दक्षिण भारताची राजधानी बंगळुरुत होत असून, हे शहर त्याची आतुरतेने वाट पाहते आहे. अखेर बंगळुरुकरांची आतुरता आता संपली असून बंगळुरु फॅशन वीक (बीएफडब्ल्यू) आजपासून सलग चार दिवस चालणार आहे. द ब्लेंडर्स प्राईडने याचे आयोजन केले असून, यंदा 'समर एंड शोव्हर' ही थीम असेल. या फॅशन शोमध्ये अनेक नामवंत फॅशन डिझायनर्स आपले डिझाईनर आऊटफिट सादर करणार आहेत. यात रिना ढाका, अभिषेक दत्ता आणि निकी महाजन यासारखे जगप्रसिद्ध डिझायनर्स आपल्या वेगवेगळ्या थीमवर आऊटफिट सादर करणार आहेत. तर, ग्रँण्ड फिनालेला रितू कुमारसारखी नामवंत डिझायनर्स आपली फॅशन कला सादर करील.
बंगळुरु हे शहर फॅशनमधील एक प्रमुख शहर म्हणून उदयाला आले आहे. मुंबई, दिल्लीपाठोपाठ या शहराने फॅशन जगतात अल्पवधीत नाव कमावले आहे. आशिया खंडात सर्वाधिक वेगाने या शहरात फॅशन ट्रेंड वाढत चालला आहे. त्यामुळे साहजिकच येथे फॅशनप्रेमींना राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय डिझानयर्सकडून नक्कीच सुपर-डुपर कलेक्शन पाहायला, अनुभवायला मिळेल, असा विश्वास आहे.
आम्ही www.divyamarathi.com वर या फॅशन शोबाबत नक्कीच खास क्षणचित्रे देणार आहोत. द ब्लेंडर्स प्राईड बँगलोर फॅशन वीकच्या 'समर एंड शोव्हर' या थीमवरील 2013 मधील आठव्या आवृत्तीच्या फॅशन शोचे वेळापत्रक असे आहे...
वेळापत्रक पाहण्यासाठी पुढे क्लिक करा...
 
Email Print
0
Comment