Home » Top Story » Dedh Isqkiya Shooting Start Soon

या महिन्यात सुरु होईल 'डेढ इश्किया'

दिव्य मराठी वेब टीम | Feb 09, 2013, 09:38AM IST

विशाल भारद्वाजच्या ‘डेढ इश्किया’ सिनेमात मुख्य भूमिका साकारणा-या माधुरी दीक्षितने या सिनेमाविषयी सांगितले की, या सिनेमाचे चित्रीकरण याच महिन्यात सुरू होणार आहे. सध्या ती अनुभव सिन्हाच्या ‘गुलाब गँग’ सिनेमात काम करत आहे. माधुरी म्हणाली की, 'गुलाब गँग'चे चित्रीकरण सुरू झाले आहे आणि 'डेढ इश्किया' सिनेमाच्या शूटिंगला मध्य फेब्रुवारीमध्ये सुरूवात होणार आहे. हा सिनेमा ‘इश्किया’चा सिक्वेल आहे. यात अरशद वारसी, नसीरुद्दीन शाहबरोबरच माही गिल आणि शिल्पा शुक्लासुद्धा दिसणार आहेत.

Email Print
0
Comment