Home »Top Story» Haryanvi Boy Randeep Hudda Personal Life Facts

'मर्डर 3'मध्ये दोन अभिनेत्रींबरोबर हॉट सीन देणारा हा हरियाणवी मुलगा होता वेटर !

भास्कर नेटवर्क | Jan 09, 2013, 12:35 PM IST

गेल्या वर्षी रिलीज झालेल्या आणि ब-याच गाजलेल्या 'जिस्म 2' या सिनेमात सनी लियोनीबरोबर झळकणारा अभिनेता म्हणजे रणदीप हुड्डा. तसे पाहता रणदीप हा बी टाऊनमधील परिचयाचा चेहरा आहे. हरियाणाच्या रोहतक जिल्ह्यातील दसेया या छोट्या गावात जन्मलेला रणदीप ब-याच हिंदी सिनेमांमध्ये झळकला आहे. आता रणदीप 'जिस्म 2'नंतर पुन्हा एकदा भट्ट कॅम्पच्या सिनेमात झळकणार आहे. रणदीपच्या आगामी सिनेमाचे नाव आहे 'मर्डर 3'. या सिनेमात रणदीपबरोबर अदिती राव आणि मोनालिजा या दोन अभिनेत्री झळकणार आहेत.

रणदीपने आपल्या करिअरची सुरुवात 2001 साली केली. रणदीपची फिल्मी करिअरची सुरुवात दमदार झाली नाही. मात्र 2010 साली रिलीज झालेला 'वन्स अपॉन टाईम इन मुंबई' हा सिनेमा रणदीपच्या करिअरमध्ये टर्निंग पॉईंट ठरला. विशेष म्हणजे चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी हा हरियाणवी मुलगा रेस्टॉराँमध्ये वेटरचे काम करत होता.

हरियाणाची पार्श्वभूमी असेलल्या रणदीप हु़ड्डाच्या जीवनातील इंट्रेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढच्या फोटोवर क्लिक करा...

Next Article

Recommended