Home » Top Story » How Dev Anand And Suraiyya Love Ends At The Tragic End

PHOTOS: आजीमुळे झाला होता सुरैया-देव आनंद यांच्या लव्ह स्टोरीचा 'THE END'

भास्कर नेटवर्क | Feb 14, 2013, 14:17 PM IST
 • PHOTOS: आजीमुळे झाला होता सुरैया-देव आनंद यांच्या लव्ह स्टोरीचा 'THE END'

  आज व्हॅलेंटाइन डे आहे. या दिवशी देव आनंद साहेबांची आठवण होणार नाही, असे बरं कसे होईल. देव साहेब रोमँटिक व्यक्ती होते. म्हणूनच देव साहेबांचा विषय निघाला की, त्यांच्या लव्ह लाईफबद्दल चर्चा होतेच. देव साहेब आणि गायिका सुरैया यांचे अफेअर खूपच गाजले होते. सुरैयाबरोबरच्या प्रेमसंबंधांचा खुलासा देव आनंद यांनी त्यांच्या 'रोमांसिंग विथ लाईफ' या आत्मकथेत केला आहे.
  आज आम्ही तुम्हाला देव साहेबांच्या लव्ह स्टोरीबद्दल सांगत आहोत...

 • PHOTOS: आजीमुळे झाला होता सुरैया-देव आनंद यांच्या लव्ह स्टोरीचा 'THE END'

  देव आनंद यांनी त्यांच्या 'रोमांसिंग विथ लाईफ' या आत्मकथेत गायिका सुरैय्याबरोबरच्या त्यांच्या प्रेमप्रकरणाचा उल्लेख केला आहे. देव आनंद यांनी त्यांच्या आत्मकथेत सांगितल्याप्रमाणे, सुरैयाबरोबर त्यांचे प्रेमसंबंध चार वर्षांपर्यंत (1948-51) राहिले होते. मात्र दोघे लग्न करु शकले नाही. त्यांचा धर्म त्यांच्या लग्नात अडसर ठरला. देव आनंद हिंदू होते तर सुरैया मुस्लिम होत्या. यामुळे या दोघांचे लग्न होऊ शकले नाही.

 • PHOTOS: आजीमुळे झाला होता सुरैया-देव आनंद यांच्या लव्ह स्टोरीचा 'THE END'

  देव साहेब आणि सुरैया यांची पहिली भेट एका रेल्वे प्रवासादरम्यान झाली होती. देव आनंद नेहमी मुंबई ते पुणे असा प्रवास करायचे.

 • PHOTOS: आजीमुळे झाला होता सुरैया-देव आनंद यांच्या लव्ह स्टोरीचा 'THE END'

  एकदा सुरैया ज्या कंपार्टमेंटमध्ये चढल्या होत्या तेथे देव आनंद हजर होते. सुरैया यांना बघताच देव साहेब त्यांच्या प्रेमात पडले होते. त्यावेळी देव आनंद यांचा चित्रपटात येण्यासाठी संघर्ष सुरु होता. तर सुरैया प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री होत्या. या दोघांनी सात चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.

 • PHOTOS: आजीमुळे झाला होता सुरैया-देव आनंद यांच्या लव्ह स्टोरीचा 'THE END'

  बरेच दिवस यांचे प्रेमप्रकरण लपून राहिले. मात्र १९५१च्या दरम्यान सुरैया यांचे कुटुंबिय त्यांच्यावर पाळत ठेऊ लागले. 'अफसर' चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान या दोघांच्या प्रेमप्रकरण जगापुढे आले. तेव्हा या दोघांना विरोधाला सामोरे जावे लागले होते.

 • PHOTOS: आजीमुळे झाला होता सुरैया-देव आनंद यांच्या लव्ह स्टोरीचा 'THE END'

  सुरैया आणि देव आनंद यांच्या लग्नाला सुरैया यांच्या आजीचा प्रचंड विरोध होता. त्यांच्यामुळेच या दोघांचे लग्न होऊ शकले नव्हते. देव साहेब जेव्हाही सुरैयाला भेटण्यासाठी त्यांच्या घरी जाण्याचा प्रयत्न करायचे तेव्हा पहारेकरी दारावर उभे असायचे.

 • PHOTOS: आजीमुळे झाला होता सुरैया-देव आनंद यांच्या लव्ह स्टोरीचा 'THE END'

  देव आनंद यांना फोनवरुनही सुरैया यांच्याबरोबर संपर्क साधता येत नव्हता. देव साहेब जेव्हा सुरैया यांच्याबरोबर फोनवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न करायचे तेव्हा सुरैया यांची आजी फोन उचलून देव आनंद यांना रागवायची.

 • PHOTOS: आजीमुळे झाला होता सुरैया-देव आनंद यांच्या लव्ह स्टोरीचा 'THE END'

  अखेर या दोघांनीही कायमचे वेगळे होण्याचा निर्णय घेतला आणि देव आनंद यांनी आपले लक्ष अभिनयावर केंद्रित केले. मात्र सुरैया यांनी देव आनंद यांच्याबरोबरचे नाते संपुष्टात आल्यानंतर नेहमीसाठी गाणे आणि अभिनयाला रामराम ठोकला.

Email Print
0
Comment