Home » Top Story » John Abraham Wedding Priya

PHOTOS : 20 वर्षाच्या हिमाचली प्रिया रुचालसोबत लग्न करणार जॉन अब्राहम

दिव्य मराठी वेब टीम | Feb 19, 2013, 18:55PM IST
1 of 7

मुंबई- बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम आपली गर्लफ्रेंड प्रिया रुचाल हिच्याशी लग्न करणार आहे. याआधी जॉन आणि बॉलिवूडची हॉट बाला बिपाशा बसु यांच्यात सुमारे नऊ वर्षे 'रिलेशनशिप' होती. गेल्या वर्षी बिपाशाबरोबर जॉनचे 'ब्रेक अप' झाल्यानंतर जॉनचे इतर काही अभिनेत्रींसोबत नाव जोडले जात होते. मात्र आता जॉन आता लग्न करणार असल्याने या चर्चा थांबतील. जॉनने प्रिया रुचाल हीच आपली 'लेडी लव' असल्याचे जाहीर केले आहे. मूळची हिमाचल प्रदेशमधील मॅकलोडगंजची असणारी प्रिया आता अमेरिकन झाली आहे. 20 वर्षाची प्रिया फायनान्सियल अनालिस्‍ट आणि इन्‍वेस्‍टमेंट बॅंकर आहे.

वर्ल्‍ड बॅंकेच्या स्‍टाफवर काम करीत असलेली प्रिया सध्या लंडनमध्ये एमबीए करीत आहे. याबाबत सांगितले जात आहे की, प्रियाने आपले शिक्षण पूर्ण होईपर्यंत लग्नासाठी जॉनला वाट पाहण्यास सांगितले आहे. दोन वर्षात प्रियाचे एमबीए पूर्ण होईल. त्यानंतर हे दोघे लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. म्हणजेच 2015 मध्ये जॉन आणि प्रिया यांचे लग्न होण्याची शक्यता आहे.

जॉन आणि प्रियाचे फोटो पाहण्यासाठी पुढे क्लिक करा...........

 
Email Print
0
Comment