Home » Top Story » Konkona Sen Sharma Divorce Ranvir Shorey?

कोंकणा सेन शर्मा आणि रणवीर शौरीचे वैवाहिक जीवन संपुष्टात?

दिव्य मराठी वेब टीम | Jan 07, 2013, 09:15 AM IST
 • कोंकणा सेन शर्मा आणि रणवीर शौरीचे वैवाहिक जीवन संपुष्टात?
  मुंबई- अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा आणि रणवीर शौरी यांचा विवाह जवळजवळ तुटल्यातच जमा आहे. कोंकणा सध्या आपल्या पतीपासून वेगळी राहत असून, मागील काही दिवसापूर्वी ती दुस-या अपार्टमेंटमध्ये राहण्यास गेली आहे.
  काही महिन्यापूर्वी कोंकणा आणि रणवीर यांच्यात संघर्ष झाल्याच्या बातम्या आल्या आहेत. मात्र, त्यावेळी कोंकणाने काहीही मत व्यक्त केली नव्हती. विशेष म्हणजे अनेक वर्ष 'लव इन रिलेशनशिप' मध्ये राहिल्यानंतर कोंकणाने तीन सप्टेंबर 2010 रोजी रणवीरसोबत विवाह केला होता. कोंकणाने दोन वर्षापूर्वी एका मुलाला जन्म दिला होता. मात्र आता दोघेही एकमेंकापासून वेगळे होणेस पसंत करीत आहेत.
  आमच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंकणा आपला मुलगा हारुनसोबत अंधेरीतील लोखंडवाला कॉम्‍प्‍लेक्‍समधील एका अपार्टमेंट राहायला गेली आहे. तर, दुसरीकडे रणवीर गोरेगाव-मालाडमधील आपल्या अपार्टमेंटमध्ये राहत आहे. असे असले तरी रणवीर आपला मुलगा हारुनसोबत रोज काही वेळ घालवतो.
 • कोंकणा सेन शर्मा आणि रणवीर शौरीचे वैवाहिक जीवन संपुष्टात?

  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रणवीर आणि कोंकणा यांच्यातील संबंध इतके ताणले गेले आहेत की, हा घटस्फोट टाळणे केवळ अशक्य आहे. कोंकणाने आपल्या जवळच्या मित्रांना आपण लवकरच घटस्फोटासाठी अर्ज दाखल करणार असल्याचे सांगितले आहे.

 • कोंकणा सेन शर्मा आणि रणवीर शौरीचे वैवाहिक जीवन संपुष्टात?

  काही महिन्यापूर्वी रणवीर-कोंकणाच्या वैवाहिक जीवनात समस्या असल्याची बातम्या आल्या होत्या. मे 2012 मध्ये जुहू मल्‍टीप्‍लेक्‍समध्ये झालेल्या चित्रपटाच्या स्क्रीनिंगला दोघेही वेगवेगळे आले होते. त्याचवेळी त्याच्यात तणाव झाल्याचे सांगण्यात आले होते.

Email Print
0
Comment