Home » Top Story » Raveena Doing Item Number In Her Upcoming Movie

आयटम नंबरवर थिरकणार रवीना

दिव्य मराठी वेब टीम | Feb 23, 2013, 10:56AM IST

रवीना टंडनचा ‘मोहरा’मधील ‘तू चीज बडी है मस्त मस्त’ या आयटम साँगने 90 च्या दशकात धमाल उडवली होती. 'बुढ्ढा होगा तेरा बाप'मध्ये सुद्धा रवीनाने एक आयटम साँग केले होते. आता पुन्हा एकदा रवीना आपली अदा दाखवणार आहे. शुदीबत्ता चट्टोपाध्याय यांच्या आगामी ‘शोभना 7 नाइट’ या सिनेमात ती श्रीमंत महिलेची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात धमाकेदार आयटम नंबर टाकण्याचा निर्णय टीमने घेतला. गोपनीय पद्धतीने या गाण्याचे शूटिंग करण्यात येणार आहे. ‘इस जिस्म से मुझे आझाद करो’ असे गाण्याचे बोल असून शिबानी कश्यप हिने हे गायिले आहे. सुरुवातीला रवीना आयटम नंबरसाठी तयार नव्हती, पण गाण्यात कोणतीही अश्लीलता आणि बीभत्सपणा नसल्याची हमी दिग्दर्शकाने दिल्यानंतर तिने होकार दिला. माझ्या कारकीर्दीत फक्त तीन आयटम नंबर केले आहेत. यापैकी ‘मोहरा’तील गाणे सर्वात जास्त गाजले. यात नृत्य आणि गाण्याला जास्त महत्त्व देण्यात आले होते. असाच प्रकार या गाण्यात असल्याचे रवीनाने स्पष्ट केले. सूत्रानुसार या गाण्यासाठी दिग्दर्शकाने रवीनाच्या सांगण्यावरून काही बदल केले. रवीना या गाण्यात अफलातून दिसत असून चित्रपटाच्या प्रमोशनसाठी याचा निश्चित फायदा होईल, असा दावा काहींनी केला.

Email Print
0
Comment