Home » Top Story » Real Life Bollywood Chain Smoker Celebrties

PHOTOS : शाहरुख-सलमानसह हे आहेत बी टाऊनचे चेन स्मोकर

भास्कर नेटवर्क | Feb 23, 2013, 11:21 AM IST
  • PHOTOS : शाहरुख-सलमानसह हे आहेत बी टाऊनचे चेन स्मोकर

    वैधानिक इशारा - धूम्रपान आरोग्यासाठी हानीकारक आहे. www.divyamarathi.com या बातमीच्या माध्यमातून फक्त बॉलिवूड सेलिब्रिटींच्या स्मोकिंग सवयीबद्दल सांगत आहे. आम्ही कोणत्याही प्रकारच्या ध्रूम्रपानाचे समर्थन करत नाही.

    सिल्व्हर स्क्रिनवर सिगारेट ओढणारे सगळेच स्टार्स स्मोकर नाहीत. मात्र काही स्टार्स असे आहेत, ज्यांची ही सवय जगापासून लपलेली नाही. अनेकदा सिगारेट ओढण्याच्या सवयीमुळे अनेक सेलिब्रिटी अडचणीत सापडले आहेत. आज आम्ही तुम्हाला बॉलिवूडच्या काही प्रसिद्ध सेलिब्रिटींबद्दल सांगत आहोत, जे फक्त पडद्यावरच नव्हे तर आपल्या खासगी आयुष्यातही मोठ्या प्रमाणात सिगारेट ओढतात.

    पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा बी टाऊनचे चेन स्मोकर...

  • PHOTOS : शाहरुख-सलमानसह हे आहेत बी टाऊनचे चेन स्मोकर

    अभिनेता शाहरुख खान चेन स्मोकर आहे. शाहरुख मालबोरो लाइट सिगारेट ओढतो. सर्जरीनंतर डॉक्टरांनी त्याला सिगारेटची सवय सोडून देण्याचा सल्ला दिला होता. मात्र शाहरुख आपली ही सवय सोडू शकला नाही.

  • PHOTOS : शाहरुख-सलमानसह हे आहेत बी टाऊनचे चेन स्मोकर

    बॉलिवूडचा दबंग सलमान खानलासुद्धा मालबोरो सिगारेट आवडते. मात्र आपल्या या सिगारेट प्रेमाने त्याला अनेकदा अडचणीत टाकले आहे. 2009 साली मोहालीत एका शुटिंगदरम्यान ट्रेनच्या बोगीत सिगारेट ओढल्यामुळे त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली होती.

  • PHOTOS : शाहरुख-सलमानसह हे आहेत बी टाऊनचे चेन स्मोकर

    अजयसुद्धा बी टाऊनच्या चेन स्मोकरपैकीच एक आहे. 2010 साली दिलेल्या एका मुलाखतीत अजयने सांगितले होते की, त्याची ड्रिंकिंग आणि स्मोकिंगची सवय त्याला फिट ठेवते.

  • PHOTOS : शाहरुख-सलमानसह हे आहेत बी टाऊनचे चेन स्मोकर

    ऋतिक रोशन ब-याच काळापासून आपली सिगारेटची सवय सोडण्याच्या प्रयत्नात होता. एका प्रसिद्ध वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत ऋतिकने सांगितले होते की, त्याला सिगारेट ओढण्याची सवय सोडायची होती. मात्र काही केल्या त्याला हे शक्य होत नव्हते.
    ऋतिकने सांगितले की, एलेन कैर यांचे इजी वे टू स्टॉप स्मोकिंग हे पुस्तक त्याने वाचले. हे पुस्तक पूर्ण वाचून झाल्यानंतरच त्याची सिगारेट ओढण्याची सवय तुटली. तेव्हापासून त्याने सिगारेटला स्पर्श केलेला नाही.

  • PHOTOS : शाहरुख-सलमानसह हे आहेत बी टाऊनचे चेन स्मोकर

    अर्जुन रामपाल राजनिती सिनेमाच्या रिलीजपूर्वीच सिगारेट सोडल्याचा दावा करतो. अर्जुनने आपल्या मुलाच्या जन्मावेळी सिगारेट सोडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आपल्या मित्रांमुळे तो सिगारेटची सवय सोडू शकला नव्हता.

  • PHOTOS : शाहरुख-सलमानसह हे आहेत बी टाऊनचे चेन स्मोकर

    फरदीन खानसुद्धा भरपूर सिगारेट ओढायचा. एका मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत फरदीनने सांगितले होते की, स्मोकिंगमुळे मी स्वतःलाच मारत होतो. स्मोकिंगमुळेच मी माझ्या वडिलांना गमावले. मी स्मोकिंग सोडण्याचा निर्णय घेतला. दिवसाला तीस सिगारेट पिणा-या फरदीनने स्मोकिंग सोडले आहे.

  • PHOTOS : शाहरुख-सलमानसह हे आहेत बी टाऊनचे चेन स्मोकर

    अभिनेता इरफान खानने त्याच्या पहिल्या नाटकाच्या प्रयोगाच्या वेळी पहिल्यांदा सिगारेट ओढली होती. इरफानला स्मोकिंगची सवय सोडायची आहे. मात्र अद्याप त्याला यश मिळालेले नाही.

  • PHOTOS : शाहरुख-सलमानसह हे आहेत बी टाऊनचे चेन स्मोकर

    रोनित रॉय बॉलिवूडच्या चेन स्मोकर्सपैकीच एक आहे. रोनित एका दिवसात वीस ते पंचवीस सिगारेट ओढतो.

Email Print
0
Comment